‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’, राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप, तुळजापुरात घोषणाबाजी

आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही जुंपल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

'प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद', राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप, तुळजापुरात घोषणाबाजी
Follow us
| Updated on: Oct 09, 2020 | 1:10 PM

उस्मानाबाद : मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) सुप्रीम कोर्टातून स्थगिती मिळाल्यानंतर राज्यात मराठा समाज पेटून उठला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यासाठी राजकीय नेत्यांमध्येही जुंपल्याचं पाहायला मिळालं. यावरून आता वातावरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे. तुळजापूर इथल्या मराठा क्रांती ठोक मोर्चात प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. ‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’ अशा घोषणा दिल्या जात असल्याची माहिती देण्यात आली आहे. (Maratha Kranti Thok Morcha in Tuljapur chanted against Prakash Ambedkar)

राज्यसभा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosle) आणि संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati) या दोघांबाबत वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याचा निषेध म्हणून मराठा समाजाने मोर्चाच्यावेळी आंबेडकरांविरोधात घोषणाबाजी केली. खरंतर, आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे डॉ. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv Gunaratna Sadavarte) यांच्याविरोधात साताऱ्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

प्रकाश आंबेडकर काय म्हणाले होते? मराठा आरक्षणाला पाठिंबा जाहीर करताना पुण्यात प्रकाश आंबेडकरांनी दोन्ही राजेंवर टीका केली होती. ‘एक राजा (उदयनराजे) तर बिनडोक आहे, असं मी म्हणेन. दुसरे संभाजीराजे आहेत, त्यांनी मराठा आरक्षण प्रकरणी भूमिका घेतली हे बरोबर आहे. पण ते आरक्षणापेक्षा इतर गोष्टींवर भर देत आहेत, असं मला दिसतंय’ असं प्रकाश आंबेडकर काल (8 ऑक्टोबर) पुण्यात म्हणाले होते. तुम्ही उदयनराजेंना अंगावर घेताय का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ‘मी अंगावर घ्यायला कोणालाच भ्यायलेलो नाही. ज्या माणसाला घटना माहिती नाही… आम्हाला आरक्षण मिळालं नाही, तर सगळ्यांचं आरक्षण रद्द करा, असं ते म्हणतात. भाजपने यांना राज्यसभेवर कसं पाठवलं तेच कळत नाही’ असं म्हणत प्रकाश आंबेडकरांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.

(Maratha Kranti Thok Morcha in Tuljapur chanted against Prakash Ambedkar)

गुणरत्न सदावर्ते यांचीही टीका मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना गुणरत्न सदावर्ते यांनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला होता. सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्येही गुन्हा दखल करण्यात आला. छत्रपती संभाजीराजे यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने गुणरत्न सदावर्तेंविरोधात कोल्हापुरात संताप व्यक्त करण्यात आला. उत्तरेश्वर पेठ तरुण मंडळाकडून गुणरत्न सदावर्ते यांच्या पोस्टरला कोल्हापुरी चप्पल मारून निषेध करण्यात आला. कोल्हापूर शहरातील शिवाजी चौकात आंदोलन करण्यात आले.

इतर बातम्या –

शाळेत ‘गुड टच, बॅड टच’ शिकवल्यानंतर समोर आली बलात्काराची घटना, 3 अल्पवयीन मुलींनी सांगितलं भयानक वास्तव

Flipkart आणि Amazon सगळ्यात मोठा सेल, ‘या’ फोनवर मिळणार 10 हजारांपर्यंत डिस्काऊंट

(Maratha Kranti Thok Morcha in Tuljapur chanted against Prakash Ambedkar)

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.