Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेत टि्वस्ट, मराठा आंदोलक विनोद पाटील अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विमानतळावर

Lok Sabha Election Maharashtra Politics: एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार निश्चित झाला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उद्धव सेनेचे उमेदवार आहे. त्यांनी प्रचारास सुरु केली आहे.

शिवसेनेत टि्वस्ट, मराठा आंदोलक विनोद पाटील अचानक मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी विमानतळावर
विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.
Follow us
| Updated on: Apr 15, 2024 | 10:07 AM

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्प्यातील मतदानास आता चार दिवस राहिले आहेत. परंतु महायुतीमधील आठ जागांवर निर्णय झालेला नाही. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेनेवर एकमत होऊ शकले नाही. परंतु जी जागा शिवसेनेला मिळणार आहे, त्याठिकाणी उमेदवार जाहीर होऊ शकले नाही. त्यात छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी शिवसेना आणि भाजपकडून तीन नावे चर्चेत आहेत. त्यातील मराठा आंदोलक विनोद पाटील यांनी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

विमानतळावर विनोद पाटील यांचे शक्तीप्रदर्शन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी बुलढाणा येथून मुंबईकडे रवाना होताना छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आले होते. छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उत्सुक असलेले विनोद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागत केले. यावेळी विनोद पाटील समर्थकांनी ‘हमारा खासदार कैसा हो, विनोद पाटील जैसा हो’ च्या घोषणा दिल्या. विनोद पाटील यांनी शक्तीप्रदर्शनच केले. संभाजीनगरमधून मंत्री संदीपान भुमरे आणि भाजप नेते भागवत कराड यांचे नाव चर्चेत आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरची जागा शिवसेनेलाच मिळण्याची शक्यता आहे.

उद्धव सेनेचा उमेदवार निश्चित

शिवसेना नेते संजय शिरसाठ यांनी म्हटले की, मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये उमेदवार निश्चित झाला आहे. परंतु घोषणा बाकी असल्याची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी भेट झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर जागे संदर्भात नाव कळेल, असे त्यांनी सांगितले होते. एकनाथ शिंदे गटाचा उमेदवार निश्चित झाला नसला तरी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा उमेदवार निश्चित झाला आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे हे उद्धव सेनेचे उमेदवार आहे. त्यांनी प्रचारास सुरु केली आहे. त्यामुळे सध्यातरी छत्रपती संभाजीनगरा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची आघाडी दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यात काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चर्चेत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्हा मराठा आंदोलनाचा केंद्र बिंदू राहिला आहे. पहिला मराठा क्रांती मोर्चा संभाजीनगरमधून निघाला होता. यामुळे लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून मराठा उमेदवार देण्याच्या महायुतीच्या हालचाली आहेत. मराठा समाजातील नेते विनोद पाटील त्यासाठी इच्छूक आहेत.

जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख
नितेश राणेंकडून विधानपरिषदेत नार्वेकरांचा मित्र म्हणून उल्लेख.
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला
आरोपी गौरव अहुजाचा येरवडामध्ये मुक्काम वाढला.
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया
तृप्ती देसाईंसोबत काय झाली चर्चा? धनंजय देशमुखांनी दिली प्रतिक्रिया.
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय...
फडणवीसांची औरंगजेबाशी तुलना! 'त्या' वक्तव्यानंतर सपकाळ आता म्हणताय....
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?
औरंगजेबाच्या कबरीवरून वातावरण तापलं, बघा कुठं, कसा झाला अंत?.
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली...
स्वारगेट प्रकरणातील पीडितेनं DCM शिंदेंकडे केली एकच मागणी, म्हणाली....
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी
'जिसे, निभा ना सकू..', अजितदादांची शायरीतून विरोधकांना टोलेबाजी.
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'
पटोलेंच्या ऑफरवर दादांनी उडवली खिल्ली, 'तुम्ही कशाचा पाठिंबा देताय...'.
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन
औरंगजेबाच्या कबरीचं प्रकरण तापलं; बजरंग दलाचं राज्यभरात आंदोलन.