maratha reservation issue | जालना-बीड जिल्ह्याची सीमा सील, दोन्ही जिल्ह्यांत ‘नो एन्ट्री’

Manoj Jarange Patil | मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्या ठिकाणी मराठा आंदोलक जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे आता जालना आणि बीड जिल्ह्यात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.

maratha reservation issue | जालना-बीड जिल्ह्याची सीमा सील, दोन्ही जिल्ह्यांत 'नो एन्ट्री'
चेकपोस्टवर तपासणी करताना बीड पोलीस
Follow us
| Updated on: Feb 26, 2024 | 10:50 AM

संजय सरोदे, अंतरवाली सराटी, जालना, दि. 26 फेब्रुवारी 2024 | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय रद्द केला. भांबेरीवरुन गावावरुन ते परत अंतरावाली सराटीत दाखल झाले आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांचे लक्ष पुन्हा जालना आणि बीड जिल्हा राहणार आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना आणि बीड जिल्ह्यात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. अंतरावलीकडे मोठ्या संख्येने पोलिसांची कुमक पोहचली आहे. दंगल नियंत्रण पथक जालन्याकडे आले आहे. तसेच जालना आणि बीड जिल्ह्यात कोणालाही परवानगीशिवाय प्रवेश मिळणार नाही.

बीड, जालना सीमा सील, 38 ठिकाणी नाकाबंदी

मनोज जारांगे यांनी मुंबईला जाण्याची घोषणा केल्यावर पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली. परंतु त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित करत पुन्हा अंतरवाली सराटी गाठले. त्यानंतर पोलिसांनी बीड, जालना जिल्ह्याची बॉर्डर सील केली आहे. बीड जिल्ह्यात 38 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. सर्वच वाहनांची आता तपासणी केली जात आहे. बीड जिल्ह्यात 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस कायदा लागू करण्यात आला आहे. दोन्ही जिल्ह्यांत परवानगी शिवाय कोणालाही प्रवेश नाही.

अनुचित प्रकार रोखण्यासाठी पोलीस सतर्क

भांबेरीवरुन माघारी परतल्यानंतर जरांगे पाटील यांनी परत एकदा अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करायला सुरुवात केली आहे. तसेच ते वैद्यकीय उपचारही घेत आहेत. परंतु अंबड तालुक्यात संचार बंदी असल्याने कोणीही उपोषण स्थळी थांबू नये, आशा सूचना जरांगे पाटील यांनी केल्या आहेत. आज अंतरवाली सराटीमध्ये शुकशुकाट दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

भुजबळांचा मनोज जरांगे अन् फडणवीस याना टोला

मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर बोलण्यास नकार दिला. परंतु उपरोधिक टोला त्यांनी लगावला. ते म्हणाले, अधिवेशन आहे आता मला ही तिकडे बघू द्या. मला जरांगे वर काही बोलायचे नाही. परंतु मी सध्या दोन जुन्या नाटकांचा अभ्यास करत आहे. एक डॉ. काशिनाथ घाणेकर यांच गृह खात्याला जाग येते आणि दुसर म्हणजे सीमेवरून परत जा. ही दोन नाटकांची जुळवाजुळव करायच काम सुरू आहे. मला जरांगे यांच्यावर बोलण्यास वेळ नाही. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे यांना हा टोला भुजबळ यांनी लगावला आहे.

हे ही वाचा

मनोज जरांगे पाटील बॅकफुटवर, मुंबईला न येता भांबेरीवरुन परतले अंतरवाली सराटीत

मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत
बोट अपघात 13 मृत्यू, मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून किती लाखांची मदत.