मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?

सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहे. 12 ते 13 दिवस आमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली, असा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण आंदोलन दडपण्यासाठी सरकारचा नवा प्लॅन?
| Updated on: Feb 19, 2025 | 2:07 PM

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला आहे. त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चे आंदोलन उभे करणार आहे. सरकारचे दोन मंत्री त्या आंदोलनात सहभागी होणार आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एक मंत्र्याने आपणास दिल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला आहे.

काय म्हणाले मनोज जरांगे

माध्यमांशी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात दोन मंत्री असणार आहे. 12 ते 13 दिवस आमरण उपोषण करणार आहेत. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर 14 दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार आहे. मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.

मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस आरक्षणाचा मार्ग काढतील. हैद्राबाद, बॉम्बे आणि सातारा गॅझेट लागू करतील, असा विश्वास मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, तिन्ही गॅझेट मंगळवारपर्यंत देवेंद्र फडणवीस लागू करतील अशी मला आशा आहे. शिंदे समितीकडे सात महिन्यांपासून गॅजेटचा विषय आहे. त्यामुळे त्याबाबत अभ्यास झाला आहे. पंधरा दिवसांत सगळा अभ्यास होतो, असे जरांगे यांनी म्हटले.

सुरेश धस यांच्यावर पक्षाचा दबाब

मनोज जरांगे म्हणाले, धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश दासावर भाजपाने दबाव आणला. परंतु सुरेश धस यांनी मराठ्याला हे सांगणे गरजेचे होते की, माझ्यावर पक्षाने दबाव आणला आहे. मात्र सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. आमचा सुरेश धस यांच्यावर भरपूर जीव होता. परंतु सुरेश धस धनंजय मुंडेला भेटले. यामुळे मराठ्यांचा विश्वास उडाला.

धनंजय मुंडे यांना भेटण्याआधी सुरेश धस यांनी ते आम्हाला सांगितले असते तर मराठे सुरेश धस यांना डोक्यावर घेऊन नाचले असते. पुढच्या निवडणुकीत एक लाख 67 हजार मतांनी सुरेश धस निवडून आले असते. धनंजय मुंडे आणि आमदार दास यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणांतील दोषारोपपत्रामध्ये सुध्दा छेडछाड होण्याची शक्यता आहे. परंतु यामधील एकही आरोपी सुटला तर सरकारचे काही खरे राहणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.