जरांगे पाटील हेकेखोर, अक्कल नाही, सारखी भूमिका बदलतात…अजय महाराज यांचा हल्ला बोल

Ajay Maharaj Baraskar | पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे चार वाजता झाली. तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशीला झाली आहे.

जरांगे पाटील हेकेखोर, अक्कल नाही, सारखी भूमिका बदलतात...अजय महाराज यांचा हल्ला बोल
Follow us
| Updated on: Feb 21, 2024 | 3:57 PM

गिरीश गायकवाड, मुंबई दि. 21 फेब्रुवारी 2024 | अध्यादेश, अधिनियम यामधील फरका मनोज जरांगे पाटील यांना माहीत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बसून खालच्या भाषेत त्यांना बोलताना मी स्वत: पाहिले आहे. त्यांनी मराठा समाजातील अधिकाऱ्यांना शिव्या दिल्या आहेत. जरांगे यांना अक्कल नाही. लोकांची ते फसवणूक करत आहेत. ते हेकेखोर आहेत, कोणत्याही शब्दावर अडून राहातो. सर्व प्रक्रियेत मराठा समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे. हे मनोज जरांगे याला माहिती नाही, असा हल्ला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात असलेले अजय महाराज बरासकर यांनी केला.

अजय महाराज बरासकर यांनी सांगितले की, मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी काम करत नाही. मी कीर्तन करतो. त्याचे पैसे घेत नाही. गेल्या काही दिवसांपासून माझ्या मनात खडखद होती. ती मी व्यक्त केली आहे. त्यानंतर मला अनेक फोन येत आहेत. गोळ्या घालून मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. परंतु माझे काम सत्य सांगणे आहे. जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला. तो मी सहन करणार नाही

लोकांना न विचारताच १० फेब्रुवारीचे उपोषण

१० फेब्रुवारी रोजी उपोषण करण्यासाठी समाजाची बैठक घेतली नाही? त्यावेळी लोकांनी विरोध केला. १६ फेब्रुवारीपर्यंत मुदत होती. परंतु एक फोन आल्यानंतर जरांगे यांनी भूमिका बदलली. समाज अंतरवालीत गेला नाही. लोक आले नाहीत, त्यामुळे जरांगे संतापले होते. लोक जमा करता येत नाही, मी उपोषण कसे करु, असे जरांगे बोलल्याचे रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे.

हे सुद्धा वाचा

ओबीसी नोंदीसाठी आम्ही काम केले

अजय महाराज बरासकर म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढत आहे. मधल्या काळात अंतरवालीत घटना घडली. त्यानंतर मी आंदोलन लढ्यात पुन्हा सहभागी झालो. मराठवाड्यात ओबीसी नोंदीसाठी मी देखील अनेक वर्षांपासून काम करतोय. त्यामुळे जरांगे पाटील यांच्यासोबत आंदोलनात सहभागी झालो. मी यापूर्वी कधीच माध्यमासमोर आलो नाही.

डॉक्टर संतोष यादव यांचे मोठे श्रेय

डॉक्टर संतोष यादव यांनी मराठवाड्यातील कुणबी नोंदी जमा केल्या. त्याला जरांगे पाटील म्हणतात, “तुम्ही सरकारच्या भाकरी खातात.” त्यांना खूप काहीतरी बोलला आहे. हे कल्पना शक्तीच्या बाहेर आहेत. जरांगे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, असे अजय महाराज यांनी सांगितले.

पाच गुप्त मिटींग झाल्या

पहिली गुप्त मिटींग बीडला कन्हैया हॉटेलमध्ये झाली. त्याची माहिती उपलब्ध आहे. दुसरी गुप्त मिटींग रांजणगावला पहाटे चार वाजता झाली. तिसरी गुप्त मिटींग पुण्यातील औंध परिसरात झाली. त्यानंतर लोणावळ्याला झाली. पाचवी मिटींग वाशीला झाली आहे.

हे ही वाचा

मराठा आरक्षण मिळेपर्यंत निवडणूक नको, २४ पासून असे असणार आंदोलन

एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?
एकनाथ शिंदे काय भूमिका मांडणार, काय म्हणाले ज्येष्ठ पत्रकार ?.
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता
शिंदे यांनी देवेंद्र यांच्यासाठी रस्ता मोकळा करावा - भाजप नेता.
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे
'सरकारने आल्यानंतर लाडकी बहिण योजनेत....,' काय म्हणाले अंबादास दानवे.
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?
... हा मविआच्या नेत्यांचा डांबरटपणा आहे, काय म्हणाले बावणकुळे ?.
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर
आमच्या तंगड्यात- तंगड्या अडकलेल्या नाहीत,राऊत यांना शिरसाट यांचे उत्तर.
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत
'विरोधीपक्षनेता बनवता येत नाही, त्यांनी CM पदावर बोलू नये'- उदय सामंत.
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?
नागराज मंजुळे अडचणीत, न्यायालयानं बजावलं समन्स, प्रकरण नेमकं काय?.
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली
बॅलेट पेपरवर निवडणुका नाहीच, कोर्टाचा थेट नकार, 'ती' याचिका फेटाळली.
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका
'ठाकरेंची अवस्था शोलेतील असरानी सारखी...',भाजपच्या बड्या नेत्याची टीका.
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा
'शरद पवार नावाचा अध्याय राजकारणातून संपला', भाजप नेत्याचा निशाणा.