मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच, दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी

maratha reservation issue | मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील आज अंतरवाली सराटी येथून निघाले आहे. मुंबईत निघताना मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा भावूक झाले. गाव सोडत असल्याने आपल्या डोळ्यात पाणी आले. आपण गाव सोडत असल्यामुळे भारवलो असल्याचे त्यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांची मुंबईकडे कूच, दिवसभरात दुसऱ्यांदा डोळ्यात पाणी
Follow us
| Updated on: Jan 20, 2024 | 11:38 AM

जालना, दि.20 जानेवारी 2024 | मराठा आरक्षणाचे आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी ११ वाजता मुंबईकडे कूच केली. यावेळी अंतरावाली सराटी येथून मराठा समाज त्यांच्यासोबत निघाला आहे. मनोज जरांगे अंतरावाली सराटीतून निघाल्यावर पुन्हा भावूक झाले. शनिवारी सकाळापासून दुसऱ्यांदा त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही. २६ जानेवारीला मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा दिसणार आहे. आता मला गोळ्या घातल्या तरी मी मागे हटणार नाही. मी मरण्यास भीत नाही. समाजासाठी मी लढत राहणार आहे. मराठ्यांनी आरक्षण घेण्यासाठी माझ्यामागे पुन्हा एकदा ताकदीने उभे राहा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील केले.

दुसऱ्यांदा डोळ्यात अश्रू

मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले. त्यापूर्वी सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात आश्रू आले. त्यावेळी सरकार किती निष्ठूर आहे. अनेक वर्षांपासून मराठा समाज आंदोलन करत आहे. शेकडो जण शहीद झाले आहेत. त्यानंतरही सरकारला जाग आली नाही. मराठा समाजाला हक्काचे आरक्षण दिले नाही. आंदोलनाचे हे दिवस आठवून आपल्या डोळ्यात पाणी आल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर मुंबईला निघताना पुन्हा मनोज जरांगे पाटील यांचे डोळे पाणावले. आपण गावापासून लांब जात आहोत. यामुळे भावूक झाल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

आमच्यावर प्रचंड अन्याय, आता माघार नाही

मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले की, मराठा समाजावर आतापर्यंत प्रचंड अन्याय झाला आहे. मराठा समाजास आरक्षण मिळत नाही, यामुळे मराठा समाजाची मुले टोकाचे पाऊल उचलत आहेत.  54 लाख लोकांच्या कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. त्यामुळे कोट्यवधी मराठ्यांना ओबीसी प्रमाणपत्र मिळू शकते. परंतु सरकार ऐकण्याच्या मनस्थित नाही. यामुळे आपला जीव गेला तरी आता माघार नाही. समाजासाठी मी सुद्धा शहीद होणार आहे. 26 जानेवारी रोजी मुंबईतील गल्ली गल्लीत मराठा समाज दिसणार आहे. मुंबईतील आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर आपण उपोषण करणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.