मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर होणार?

मराठा आरक्षणाबाबत सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारची गेल्या अनेक वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरु आहे. राज्य सरकारला याआधी या प्रकरणात अपयशाला सामोरं जावं लागलं होतं. तरीही राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करत सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केला. ही याचिका आता सुप्रीम कोर्टात अंतिम टप्प्यावर असल्याची माहिती समोर येत आहे.

मराठा आरक्षणाबाबतची आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर होणार?
मराठा आरक्षण
Follow us
| Updated on: Sep 08, 2024 | 4:57 PM

मराठा आरक्षणाची लढाई ही सोपी नाही. या लढाईसाठी अनेक जणल झटत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारच्या काळात त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. पण ते आरक्षण काही वर्षांनी सुप्रीम कोर्टात टिकलं नव्हतं. सुप्रीम कोर्टाच्या निकालावर पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली होती. याच याचिकेबाबत आता मोठी बातमी समोर येत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. आता या याचिकेच्या अंतिम सुनावणीचा वेळ जवळ आला आहे. येत्या आठवड्यात सुप्रीम कोर्ट संबंधित याचिकेवर मोठा निकाल देणार आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा संबंधित निकाल हा ऐतिहासिक ठरणार आहे. या निकालात राज्यातील मराठा समाजाला दिलासा मिळतो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल. हा निकाल सकारात्मक राहिला तर महायुती सरकारसाठी आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी मिळालेलं मोठं गिफ्ट ठरणार आहे. अर्थात याबाबत काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मराठा आरक्षणाबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाच्या पुनर्विचार याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. पुनर्विचार याचिकेवर 11 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर येत्या 11 सप्टेंबरला अंतिम निर्णय येण्याची शक्यता आहे. मराठा समन्वयक विनोद पाटील यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विनोद पाटील यांच्याच वतीने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

विनोद पाटील यांच्याकडून महत्त्वाची माहिती

“मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर माझ्यावतीने आणि राज्य सरकारच्या वतीने सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटीशन सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अनेक दिवसांपासून सुनावणी सुरु आहे. पण न्याय अद्याप मिळालेला नाही. 11 सप्टेंबरला न्याय आम्हाला मिळेल. सरकारने प्रचत्न केला तर निश्चितपणे आम्हाला न्याय मिळेल. कारण त्यांना कल्पना आहे, माहिती आहे की, न्यायालयात कधीकधी कशाप्रकारे जावं लागतं. त्यांनी ते करावं, अशी अपेक्षा मला आणि समाजाला आहे”, असं विनोद पाटील म्हणाले.

“11 सप्टेंबरला 1001 क्रमांकाची सुनावणी आहे. दुपारच्या वेळेस मराठा आरक्षणाच्या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत निर्णय येणं अपेक्षित आहे”, अशी आशा विनोद पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. विनोद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार 11 सप्टेंबरला मराठा आरक्षणाच्या याचिकेवर अंतिम सुनावणी होऊन निकाल जाहीर झाला तर मराठा आरक्षणासाठीचा तो मोठा दिवस ठरणार आहे. अर्थात या प्रकरणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?
अमित ठाकरे विधानसेभेच्या रिंगणात? 'या'पैकी एका जागेवर निवडणूक लढवणार?.
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य
राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला 11 लाख..., शिंदेंच्या आमदाराचं वक्तव्य.
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा
'या' जिल्ह्यात 12 ज्योतिर्लिंगाच दर्शन. बाप्पासाठी साकारला भारी देखावा.
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती
Lalbaugcha Raja Aarti 2024 : ही शान कोणाची..पहा लालबागच्या राजाची आरती.
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?
शिंदे आपल्या परिवारासह लालबागच्या राजा चरणी लीन, काय साकडं घातलं?.
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?
मविआच्या रेड्यांना चाबकाने फोडून काढणार, कुणी केला घणाघात?.
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल
'रोहित पवार महाराष्ट्रात आग लावत सुटलेत...', सदाभाऊ खोतांचा हल्लाबोल.
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?
अजित पवार पुन्हा घरवापसी करणार? बच्चू कडू काय म्हणाले? काय केला दावा?.
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका
'शरद पवारांनी हरिनामाचा जप करावा, म्हणजे...', भाजप नेत्याची खोचक टीका.
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?
जरांगे आज मध्यरात्रीपासून उपोषणाला; मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळणार?.