AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | छत्रपतींची तब्येत बिघडली; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला, पण राजे ठाम

सध्या मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू झाली. यावेळी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असणार आहेत. राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळही बैठकीसाठी गेले आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Maratha Reservation | छत्रपतींची तब्येत बिघडली; डॉक्टरांचा रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला, पण राजे ठाम
मुंबईत उपोषणाला बसलेल्या छत्रपती संभाजी राजे यांची तब्येत बिघडली आहे.
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 12:32 PM

मुंबईः मराठा आरक्षणासह (Maratha Reservation) विविध मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाचे अस्त्र पुकारणारे छत्रपती संभाजी राजे (Sambhaji Raje Chatrapati) यांची आज तब्येत बिघडली आहे. डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिलाय. मात्र, राजे उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. दुसरीकडे वर्षा बंगल्यावर राजे यांच्या उपोषणाबद्दल बैठक सुरू झालीय. या बैठकीसाठी राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळ उपस्थित आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही (Uddhav Thackeray) या बैठकीत आहेत. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष आहे. मात्र, राजेंनी आता निर्वाणीचा इशारा दिल्यामुळे डॉक्टरांसह सारेच चिंतेत आहेत.

रुग्णवाहिका दाखल

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या राजेंच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. डॉक्टर दिवसातून तीन वेळेस त्यांची तपासणी करत आहेत. सकाळी तपासणी केल्यानंतरही डॉक्टरांना राजेंच्या रक्तातील साखर कमी झाल्याची आढळली. त्यांनी राजे यांना इंजेक्शन घेण्याचा सल्ला दिला. मात्र, राजेंनी त्यालाही नकार दिला. आत्ता थोड्या वेळापूर्वी पुन्हा एकदा आझाद मैदानावर रुग्णवाहिका दाखल झालीय.

डॉक्टर म्हणतात…

डॉक्टरांनी छत्रपती संभाजी राजे यांच्या साखरेची पातळी तपासली. रक्तदाब तपासला. तेव्हा राजे यांचा रक्तदाब कमी झाल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना डॉक्टरांचा रूग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला. मात्र, राजे सध्या उपोषणावर ठाम आहेत. हा भावीपिढीच्या उज्वल भविष्यासाठीचा लढा आहे. तो सुरूच ठेवणार, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. राजे यांच्या ट्वीटर हँडलवरूनही तसे ट्वीट करण्यात आले आहे.

सकाळीही तपासणी

मुंबईत उपोषणाला बसलेल्या छत्रपती संभाजी राजे यांच्या ट्वीटर हँडलवरून आज सकाळी एक ट्वीट करून माहिती देण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, उपोषणाचा तिसरा दिवस आहे. सकाळी 8 वाजून 20 मिनिटांनी छत्रपती संभाजीराजे यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. रक्तदाब व शरीरातील साखरेचे प्रमाण कमी झाले असून अशक्तपणा व तीव्र डोकेदुखी ही लक्षणे जाणवत आहेत.

बैठकीकडे लक्ष

सध्या मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षण उपसमितीची वर्षा निवासस्थानी बैठक सुरू आहे. सकाळी अकरा वाजता ही बैठक सुरू झाली. यावेळी मुख्यमंत्री स्वतः उपस्थित असणार आहेत. राजे यांच्या वतीने एक शिष्टमंडळही बैठकीसाठी गेले आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

इतर बातम्याः

चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!

कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग

चिन्मय, पूजा, सिद्धार्थला सुविचार गौरव पुरस्कार; जयंत पाटलांच्या हस्ते 10 मान्यवरांचा नाशिकमध्ये होणार सन्मान

रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून भारताच्या कारवाईचं समर्थन.
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर
पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी सापडेना; एनआयएने जारी केले नंबर.
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा
कर्नल सोफिया कुरेशींच्या कुटुंबाचा थेट पाकिस्तानला इशारा.
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल
पाकिस्तानच्या पेशावर विमानतळावरचा व्हिडीओ व्हायरल.
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली
भारताला कारवाईचा अधिकार; अमेरिकेची पाकिस्तानला थेट चेतावणीच दिली.
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?
ऑपरेशन सिंदूरच्या वेळी मसुद अझर कुठे होता?.
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ घाबरला.
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था
पाकमधील जैशचं मुख्यालय उद्ध्वस्त, हल्याआधी अन् नंतरची बघा अवस्था.
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक
हा हल्ला अभिमानास्पद; उद्धव ठाकरेंकडून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक.
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ
अतिरेक्याच्या दफनवेळी पाक लष्कराचे अधिकारी, बघा व्हिडीओ.