Manoj Jarange Patil : मराठा बांधवांची OBC ना विनंती आहे की…काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?

Manoj Jarange Patil : "भुजबळनी सांगितलं, आपल्या गाड्या फोडून टाका. त्या गोरगरीबांवर आरोप घालून टाका. पालकमंत्र्यांना मी सांगतो की, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. मला बदनाम करण्यासाठी छगन भुजबळ ह्यांनी ही शाळा केल्याची मला शक्यता वाटते" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Manoj Jarange Patil : मराठा बांधवांची OBC ना विनंती आहे की...काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
मनोज जरांगे पाटीलImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 28, 2024 | 10:59 AM

“सहा जुलैपासून सगळीकडेच ताकतीने रॅली सुरु होतील. मला ऐकायला मिळालं की, माझ्या गावात दगडफेकीचा प्रकार घडलाय घडवून आणलाय ? ह्यात मला जरा शंका दिसते. छगन भुजबळला पहिल्यापासून नाद आहे स्वतःच्याच गाडीवर दगडफेक करणे, स्वतःच्याच गाड्या फोडणे. मी याची संपूर्ण माहिती घेतोय, मला याबद्दल कळेल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “छगन भुजबळला माझच गाव का सापडलं? छगन भुजबळला मुद्दाम वाटेत जायची सवय आहे. आंदोलन करायला विरोध नाही पण आमच्या अंतरवालीच्या समोरच कोणत्या हेतूने ठेवले?” असा सवाल मनोज जरांगे यांनी विचारला आहे.

“इकडे काय मी दंगल होऊ दिली नाही, मला अशी शक्यता दिसते की तिकडे जाऊन गाड्या फोडायला लावल्या. भुजबळनी सांगितलं, आपल्या गाड्या फोडून टाका. त्या गोरगरीबांवर आरोप घालून टाका. पालकमंत्र्यांना मी सांगतो की, माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास झाला नाही पाहिजे. मला बदनाम करण्यासाठी छगन भुजबळ ह्यांनी ही शाळा केल्याची मला शक्यता वाटते” असा आरोप मनोज जरांगे यांनी केला. “छगन भुजबळच ऐकून माझ्या बीड जिल्ह्यातल्या मराठ्यांना त्रास होऊ देऊ नका, नाहीतर महाराष्ट्रातला मराठ्यांचा नाईलाज होईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘त्यामुळे मी होऊ दिलं नाही’

“काल जो प्रकार घडला, तो शंभर टक्के छगन भुजबळ यांनीच करायला लावला अशी मला शंका येते. येथेच आंदोलन का करायला लावलं? एल्गार सभा सुद्धा अंबड मधूनच सुरू केली होती. प्रति सभा घेतली मग जातीवादी नाहीतर काय?” असे प्रश्न मनोज जरांगे यांनी विचारले. “दंगल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. हे नाशिकला राहील. मात्र गोरगरीब मराठा आणि ओबीसीवर वाईट वेळी कोणी येत नाही, त्यामुळे मी होऊ दिलं नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘मराठा बांधवांची ओबीसी बांधवांना विनंती आहे की…’

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडवणीस साहेबांनी त्याच्यावर जरा बारीक लक्ष ठेवावं. छगन भुजबळला समज द्या, देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला विनंती करून सांगतो. मी विनंतीपूर्वक तुम्हाला सांगतो. तुम्ही मनावर घ्या राज्याची सुव्यवस्था बिघडवेल तो. मराठा बांधवांची ओबीसी बांधवांना विनंती आहे की, गाव खेड्यात आपण एकमेकांच्या अंगावर जाऊ नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले,

‘आमचा सातबारा हा दीडशे वर्षांपूर्वीचा’

“आमचा सातबारा हा दीडशे वर्षांपूर्वीचा आहे. तुमचा नंतरचा आहे. आमची जमीन आम्हाला द्या हे म्हणणं आहे. नेत्यांच एकूण वाद करू नका. दीडशे वर्षांपूर्वीच्या आमच्या नोंदी आहेत हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्यावं” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.