Manoj jarange Patil : ‘नाहीतर फडवणीस यांच्यावर…’, मनोज जरांगे पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य

Manoj jarange Patil : . "अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. कुठे इकडे तिकडे मेळावे असतील तिकडे जाऊ नका. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका, अडवण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे सांगा. सर्व नेत्यांना सांगतो, आडवे पडू नका ..गप्प रहा"

Manoj jarange Patil : 'नाहीतर फडवणीस यांच्यावर...',  मनोज जरांगे पाटील यांचं देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठं वक्तव्य
Manoj Jarange Patil-Devendra Fadnavis
Follow us
| Updated on: Oct 03, 2024 | 11:48 AM

“अजूनही तब्येत बरी नाही, परंतु दसरा मेळावा आहे आणि त्याचे नियोजन करण्यासाठी हॉस्पिटलमधून सुट्टी घेत आहे. दसरा मेळाव्याला येणाऱ्यांसाठी बीड जिल्ह्यातील मंगल कार्यालय उघडे ठेवावे. जेणेकरुन दसरा मेळाव्याला येणाऱ्यांची व्यवस्था होईल. राज्यातील मराठयांची इच्छा होती, दसरा मेळावा झाला पाहिजे. कधी दसरा येतो अशी खूप आशा लागली आहे. दसरा मेळाव्याला तुफान पोरं येणार आहेत. कुठेतरी एकत्र यावे म्हणून हा दसरा मेळावा. पण त्याचे राजकीय अर्थ काढू नका” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “अन्यायाला वाचा फोडण्यासाठी दसरा मेळाव्याला या. कुठे इकडे तिकडे मेळावे असतील तिकडे जाऊ नका. दसरा मेळाव्याला कोणी राजकारणी म्हणाला जाऊ नका, अडवण्याचा प्रयत्न केला त्यांची नावे सांगा. सर्व नेत्यांना सांगतो, आडवे पडू नका ..गप्प रहा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“दसरा मेळावा आणि विधानसभा एकत्र आल्या, त्याला आम्ही काही करू शकत नाही. नारायणगडावर होणार दसरा मेळावा हा मराठा दसरा मेळावा नाही, या मेळाव्याला अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत” असं मनोज जरांगे म्हणाले. “फडवणीस साहेब आरक्षण दिल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत. आम्हाला त्याची खात्री आहे. मी लोकसभेच्या अगोदर सांगितले सरकार निवडणूक घेणार नाहीय. निवडणूक लागण्या अगोदर मराठ्यांच्या मागण्याचा विचार करा, नाहीतर फडवणीस यांच्या आयुष्यातील मोठी पश्चातापाची वेळ येईल” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘माझ्या नावाने बोंबलायचे नाही’

“भाजपामधील मराठ्यांनी पण हाच विचार करावा आणि फडणवीस यांना सांगा. नाहीतर माझा नाईलाज आहे, तुम्ही तुमच्या नेत्याला फडवणीस याना समजून सांगा. फडवणीस निवडणूक लागण्याअगोदर मागण्या मान्य करा, मराठ्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्याशिवाय निवडणूक घेऊ नका. मागण्या मान्य केल्या नाही तर माझ्या नावाने बोंबलायचे नाही. तुमचे लोक आमच्याकडे येतात. फडवणीस याना हिताचे सांगतो, मराठ्यांना डावलू नका. तुम्हाला शब्द आहे, मागण्या मान्य केल्या नाही तर सुफडा साफ होईल” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?
पुण्यात स्कूल बसमध्ये 2 चिमुकलींवर अत्याचार, नराधमानं काय दिली धमकी?.
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार
सरकारकडून मुद्रांक शुल्कात वाढ, आता 'इतके' रूपये मोजावे लागणार.
मोठी बातमी; CSMT, भायखळा येथील रेल्वे प्रवाशांचे हाल होणार, कारण...
मोठी बातमी; CSMT, भायखळा येथील रेल्वे प्रवाशांचे हाल होणार, कारण....
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल
सरकारकडून बहिणीच्या खात्यात अॅडवान्स पैसे, सामंत महिलांना देणार मोबाईल.
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?
शाह विधानसभेच्या जागा वाटपाचा आकडा ठरवणार, मविआचंही ठरलं?.
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची..
भुयारांच्या वक्तव्यानं संताप; शेतकऱ्याचं लग्न 3 नंबरच्या तर 1 नंबरची...
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?
शिवनेरीतली सुंदरी हसली पण लालपरी रुसली? एसटी कर्मचारी काय म्हणताय?.
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?
छगन भुजबळांच्या जीवाला धोका, पुन्हा धमकी; मेसेज-फोनमध्ये काय म्हटलंय?.