Manoj Jarange Patil : मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत, पण….मनोज जरांगेंचा थेट इशारा कोणाला?
Manoj Jarange Patil : "छगन भुजबळ 100 टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद चिघळू देऊ नये. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. महाराष्ट्रात रस्त्यावर उतरुन दंगल घडवून आणण्याला छगन भुजबळ जबाबदार असणार" असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“आम्हाला धक्का लागतोय. त्यांना काय धक्का लागतोय. आमच आम्ही घेणार. आम्ही ओबीसीतील आरक्षण घेणार. राज्य सरकारमध्ये ओबीसी नेत्यांवर दबाव आहे. तेच आंदोलन करायला लावतात, सत्ताधारी म्हणून आम्ही येणार हे सर्व मॅनेज आहे. आमच्या आरक्षणात ते आहेत. त्यांना धक्का लागतोय की नाही हे आम्हाला माहित नाही. आमच्या ओबीसी नोंदी आहेत. हक्काच्या नोंदी आहेत. अर्ध्या तासापूर्वी पुरावे मिळाले आहेत. लाखो नोंदी सरकारने दाबून ठेवल्या आहेत. ब्रिटीश कालीन जनगणनेत मराठा कुणबी दाखवलाय. 1871 मधले पुरावे आहेत. ते ही घेत नाहीत” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “छगन भुजबळला स्वत:ची लेकर कळतात, तशी मग दुसऱ्याची लेकर कळायला पाहिजे. धनगर-मराठ्यांमध्ये भांडण लावतायत हे छगन भुजबळने कमी केलं पाहिजे” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
“छगन भुजबळ 100 टक्के दंगल घडवणार. धनगरांनी वाद चिघळू देऊ नये. शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यांचे वाघ आहेत, आमचे पण कुणीतरी असतीलच ना. महाराष्ट्रात रस्त्यावर उतरुन दंगल घडवून आणण्याला छगन भुजबळ जबाबदार असणार” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. “भुजबळांच ऐकून वाटोळ करुन घेऊ नका. गोरगरीबांमध्ये भांडण लावण्यापलीकडे काय येतं? धनगर बांधवांना मराठ्यांची नाराजी ओढवून घ्यायला लावतोय हे धनगर बांधवांनी समजून घ्याव” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘मग मी हात बांधून बसू का?’
“आमच्या ओरिजनल नोंदी आहेत. मराठ्यांना आरक्षण देऊ नये, ते खोट आहे, असं कसं म्हणता?. सत्तेत राहून आंदोलन उभी करतो. रस्त्यावर उतरायची भाषा करतो. सरकारमधले लोक मला जातीयवादी म्हणतात, मी कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे. हे रस्त्यावर उतरायची भाषा करतात, मग मी हात बांधून बसू का? भांडण लावत असेल, दंगली घडवत असेल, मराठ्यांचे मुडदे पडू देऊ का? माझा मराठ्यांच्या नेत्यांना सवाल आहे. मराठ्यांना आरक्षण मिळू नये, मराठ्यांची पोर मोठी होऊ नये ही भयानक नियत आहे असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.
‘छगन भुजबळ काय करायचय ते कर’
“मराठ्यांची मत घेता. बुरखा फाटला आहे. खरे चेहरेबाहेर आले आहेत. मला जातीयवादी ठरवता, मराठा नेत्यांनी थोडं शहाणं व्हायला पाहिजे. ते काय करत नाही. आपण एकटे 50-55 टक्के आहोत. नाईलाज आहे मराठ्यांचा, छगन भुजबळ काय करायचय ते कर, मराठे आधी कोणाच्या अंगावर जाणार नाहीत. मराठ्यांच्या अंगावर आले, तर आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आहे, वाघाची भाषा करतो, मराठा सुद्धा घरात बसणार नाही” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.