32 लाख लोकांना आरक्षण मिळाले…तुझे डोळे गेले का? मनोज जरांगे यांचा टोला

maratha reservation | मनोज जरांगे पाटील यांच्या जालन्यात होणाऱ्या सभेवर पावसाचे सावट आहे. जालन्यात सुरु असलेल्या पावसामुळे सर्वत्र चिखल झाला आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांची सभा होणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. परंतु सभा होणारच असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

32 लाख लोकांना आरक्षण मिळाले...तुझे डोळे गेले का? मनोज जरांगे यांचा टोला
Manoj Jarange Patil
Follow us
| Updated on: Dec 01, 2023 | 10:57 AM

दत्ता कानवटे, जालना | 1 डिसेंबर 2023 : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जालना येथे आज सभा होणार आहे. या सभेपूर्वी जालन्यात मुसळधार पाऊस झाला. सभास्थळी चिखल झाला आहे. यामुळे ही सभा कशी होणार? यावर चर्चा सुरु असताना मनोज जरांगे पाटील यांनी सभा होणारच असल्याचे स्पष्ट सांगितले. पाऊस म्हणजे आम्हाला आशीर्वाद आहे. मुसळधार पाऊस असो की कडक ऊन असो, मराठे सभेला येणार आहे. त्याठिकाणी चिखल झाला तरी मराठे सभेला येणार आहे आणि सभा यशस्वी होणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

पुष्पवृष्टीवर टीका मनोज जरांगे म्हणाले….

जालन्यात होणाऱ्या सभेपूर्वी मनोज जरांगे पाटील यांची शहरातून भव्य रॅलीही काढण्यात येणार आहे. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर 130 जेसीबीमधून फुलांचा वर्षाव केला जाणार आहे. त्यावर विरोधकांनी बोट ठेवले. त्याला मनोज जरांगे यांनी जोरदार उत्तर दिले. मराठा समाजातील 32 लाख लोकांच्या कुणबी नोंदी सापडल्या. म्हणजे मराठा समाजातील 32 लाख लोकांना आरक्षण मिळाले आहे. त्यांना आरक्षण मिळाल्याच्या आनंदामुळे पुष्पवृष्टी केली जात आहे. फुले उधळली जात आहे. त्यांना हे दिसत नाही का? तुझे डोळे गेले का? असे त्यांनी म्हटले आहे.

मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवताय

मनोज जरांगे पाटील यांच्या दौऱ्याचा चौथा टप्पा उत्तर महाराष्ट्रात होत आहे. उत्तर महाराष्ट्र छगन भुजबळ यांचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे त्या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही का? असा प्रश्न विचारले असता भुजबळ म्हणाले की, मंत्रीच कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे. भुजबळांना सरकार रोखत नाही. नारायण राणेही टीका करत आहे. सरकारचे त्यांना पाठबळ असल्याचा संशय आम्हाला आहे.

हे सुद्धा वाचा

भुजबळ विरुद्ध जरांगे

मनोज जरांगे यांच्या सभांमध्ये आता मुळ मुद्दा हरवला आहे. तो मागे पडत असल्याची टीका सोशल मीडियावर होत आहे. त्यावर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, भुजबळ यांचे दोन, चार लोकच हे काम करत आहे. भुजबळ आणि विरोधक जे काही बोलत आहे, त्यांना उत्तर द्यावे लागणार आहे. आम्ही बोललो नाही तर हे कोमात जातील. त्यामुळे त्यांच्यावर उपचार करावे लागते, असा टोला त्यांनी लगावला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.