लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळा बदला, जरांगे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, प्लॅन काय ?

Manoj Jarange Patil | सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी दोन दिवसांत करावी या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरु आहे. आता २४ फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील मोठे आंदोलन करणार आहे. गावागावात २४ पासून रास्ता रोको आंदोलन होणार आहे.

लग्नाचे मुहूर्त टाळा, वेळा बदला, जरांगे मोठ्या आंदोलनाच्या तयारीत, प्लॅन काय ?
Follow us
| Updated on: Feb 22, 2024 | 11:44 AM

बीड, दि. 22 फेब्रुवारी 2024 | मराठा आरक्षणाचे विधेयक मंगळवारी सभागृहात समंत झाले. त्यानंतर बुधवारी मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन पुढील भूमिका जाहीर केली. सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे पाटील २४ फेब्रुवारीपासून मोठे आंदोलन सुरु करणार आहे. आता हे आंदोलन गावागावात असणार आहे. प्रत्येक गावात रास्ता रोको आंदोलन होणार आहे. त्यानंतर २९ फेब्रुवारीपासून मराठा समाजातील म्हतारे उपोषणास बसणार आहे. तसेच ३ मार्च रोजी राज्यातील सर्वात मोठे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. यामुळे या दिवशी सकाळी लग्न लावू नका, सकाळीची वेळी असणारे लग्न संध्याकाळी करा, असा सल्ला मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

यामुळे संध्याकाळी करा लग्न

3 मार्च लग्नाचा मुहूर्त मोठ्या प्रमाणावर आहे. या दिवशी दुपारी आणि संध्याकाळी लग्नाचे मुहूर्त आहेत. या दिवशी दुपारी असणारी लग्न संध्याकाळी लावावी. कारण या दिवशी सर्वात मोठा रास्तो रोको आंदोलन निश्चित झाला आहे. त्यामुळे लग्न करणाऱ्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. यामुळे या दिवशी मराठा समाजासह इतर समाजातील लोकांनीही दुपारचे लग्न संध्याकाळी करावी. लग्नास सर्व समाजातील लोक येत असतात. या दिवशी सर्व जण रास्ता रोको आंदोलनात सहभागी होतील. या रास्ता रोको आंदोलनात नवरदेव नवरी सहभागी होतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.

आंदोलनाची तयारी सुरु करा

आजपासून ३ मार्चच्या रास्ता रोको आंदोलनाची तयारी सुरु करा. या दिवशीचा रास्ता रोको आंदोलन असे करा की, संपूर्ण देशात असे आंदोलन झाले नसले. या दिवशी एकाच वेळी, एकाच ठिकाणी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन करायचे आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

असा आहे नवीन प्लॅन

दोन दिवस सगेसोयरे कायद्याच्या अंमलबजावणीसाठी वाट पाहिली जाणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीपासून २९ रोज रास्ता रोको होणार आहे. तसेच २९ पासून मराठा समाजातील वृद्धांनी उपोषणाला बसवायचे आहे. आंदोलना दरम्यान वृद्धांचा मृत्यू झाला तर सरकार जबाबदार राहणार आहे. आपल्या राज्यात 25 ते 30 लाख म्हतारे असतील. माझ्या आई-बाबसह सर्व म्हातारे उपोषण करतील, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.