झोपेत असताना पोलिसांनी त्या कागदावर सह्या घेतल्या…मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप

Maratha Reservation | मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल झाले आहे. मनोज जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. परंतु मनोज जरांगे आझाद मैदानावर आंदोलन करण्यास ठाम आहे.

झोपेत असताना पोलिसांनी त्या कागदावर सह्या घेतल्या...मनोज जरांगे यांचा खळबळजनक आरोप
आम्ही आमचे टप्पे पाडले आहेत. मी इथून एकटा निघालो तरी मुंबईमध्ये करोडो मराठा बांधव असणार आहेत. आम्ही चारी बाजूने लढणार आहोत. ही शेवटची लढाई आहे, असंही जरांगे म्हणाले.
Follow us
| Updated on: Jan 26, 2024 | 8:35 AM

मुंबई, दि.26 जानेवारी 2024 | मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. शुक्रवारी सकाळी ते नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये दाखल झाले. मुंबई दाखल होण्यापूर्वी आझाद मैदानावरुन पोलीस प्रशासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात वाद पेटला आहे. त्याचवेळी मनोज जरांगे पाटील यांनी खळबळजनक आरोप केला आहे. मी लोणावळ्यात असताना पोलिसांनी काहीतरी कागदावर सह्या घेतल्या. कोर्टाचा आदेश असल्याचे सांगितले. मी झोपेत होतो. आपण कोर्टाचा सन्मान करतो. यामुळे मी त्या इंग्रजी कागदावर लगेच सही केली. परंतु तो कागद आझाद मैदानासंदर्भात होता. आझाद मैदानाची परवानगी नाकारल्याचा तो कागद होता. माझी फसवणूक करुन ही सही घेतली आहे. परंतु जर त्याचा दुरुपयोग केला तर गाठ माझ्याशी आहे, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

मनोज जरांगे यांना आझाद मैदानाची परवानगी नाकारली आहे. परंतु ते आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा निर्णयावर ठाम आहे. यामुळे शुक्रवारी सकाळपासून आझाद मैदानात आंदोलक पोहचू लागले आहे. मराठा मोर्चा मुंबईतील आझाद मैदानात दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रतील ठिकठिकाणांवरुन मराठा बांधव आझाद मैदानात यायला सुरवात झाली आहे.

मनोज जरांगे यांचे फाटले बूट

मनोज जरांगे पाटील २० जानेवारी रोजी अंतरवली सराटी येथून निघाले आहे. कधी चालत तर कधी वाहनात बसून त्यांचा हा प्रवास सुरु आहे. शहरातील प्रवास ते चालूनच करत आहे. त्यांचे बूट फाटल्याचे मराठा आंदोलकाच्या लक्षात आले. त्यानंतर मराठा आंदोलकामधील एका नेत्याने त्यांच्यासाठी नवीन बूट विकत घेतले. ते नवीन बूट घालून ते पुढील प्रवासासाठी रवाना झाले.

हे सुद्धा वाचा

नवी मुंबईत मोर्च्याकऱ्यांसाठी घराघरातून जेवण

नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील आणि लाखो मोर्चेकरी दाखल झाले आहे. त्यांच्यासाठी तीन हजार किलोंचा मसालेभात तयार करण्यात आल्या आहे. २५ हजार चपात्या घराघरातून जमा करण्यात येत आहे. मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या अवाहनानंतर मोठ्या संख्येने चपात्या जमा झाल्या आहेत. फक्त भाकरी आणि चपाती नाही तर ठेचा भाकरी लोक देत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.