मराठा समाज आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन, संभाजीनगरात रोखला रस्ता, वडीगोद्रीमध्ये काय आहे परिस्थिती

अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक वळविण्यात आली आहे. वडी गोदरी चौकात पोलिसांची जाता कुमक ही लावण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी सतर्क पाहायला मिळत आहे.

मराठा समाज आक्रमक, ठिकठिकाणी आंदोलन, संभाजीनगरात रोखला रस्ता, वडीगोद्रीमध्ये काय आहे परिस्थिती
मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी बंद पुकारण्यात आला.
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 11:40 AM

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरु केले आहे. त्या उपोषणाची दखल न घेतली गेल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने रस्ता रोको आंदोलन केले. सरकारने तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समाज बांधवांची उपस्थिती होती. जालना-संभाजीनगर महामार्ग अडवून आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी करत सरकार विरोधात रोष व्यक्त केला.

परभणी, जालना, आळंदीमध्ये बंद यशस्वी

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या आळंदीमध्ये आणि परभणीमध्ये आज बंद पुकारण्यात आला. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून अनेक दुकाने बंद आहेत. सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ जालना बंदची हाक दिली. गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. परंतु त्याची दखल घेतली नाही, यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने जालना बंदचे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यात सर्वत्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा वाढत आहे.

हे सुद्धा वाचा

वडीगोद्रीमध्ये ओबीसींच आंदोलन

जालन्यात रविवारी सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे. वडीगोद्रीमध्ये ओबीसींच आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा त्यांचा चौथा दिवस आहे. शनिवारी या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला आहे. अंतरवाली सराटीकडे जाणारे सर्वच रस्ते बंद करण्यात आले आहेत. वाहतूक वळविण्यात आली आहे. वडी गोदरी चौकात पोलिसांची जाता कुमक ही लावण्यात आलेली आहे. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस सर्वतोपरी सतर्क पाहायला मिळत आहे.

'तर महागात पडेल हे विसरू नये', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नये', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण
अंधारे म्हणाल्या रेड्याला कापणार; गुलाबरावांचं प्रत्युत्तर, मी तयार पण.
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?
'धरण फुटल्यावर कुणीतरी म्हणतं मग...', अजित दादांचा कोणाला खोचक टोला?.
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने
आरक्षणाचा मुद्दा, लक्ष्मण हाके अन् जरांगे पाटलांचे समर्थक आमने-सामने.
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके
मुस्लीम लांगुलचालनाचा दबाव मान्य नाही, दादांसोबत राणे-सोमय्यांचे खटके.
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली
बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली.
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर..
राज ठाकरे यांनी केले अत्यंत मोठे विधान, शिवरायांच्या पुतळ्यावर...
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?
नाना पाटेकर दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार; कारण काय?.