मुंबईत किती मोठं आंदोलन होणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले, “मुंगी सुद्धा रस्ता…”
मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांवर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबईत मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

“देवेंद्र फडणवीस हा माणूस म्हणजे फक्त चाल टाकणारा माणूस आहे. तू इतका बेईमान होऊ नको. मला आणि मराठ्यांना हलक्यात घेऊ नको. रडायची वेळ आली होती. आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होतं की आमच्याशी गद्दारी करणार नाही. तुझ्यावर खूप विश्वास होता”, असा घणाघात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“आपण रस्त्यावरची लढाई लढणार आहे. सरकारच्या समोरासमोर लढू आणि ती जिंकू. आज 12 13 दिवस झाले. सुरेश धस यांनी फडणवीस यांना निरोप दिला होता. आम्ही तात्काळ मागण्या मान्य करू. पण अद्याप आमची एकही मागणी पूर्ण केली नाही. गॅझेट सुद्धा घेतला नाही. Sebc च निर्णय होता. तोही अजून घेतला नाही. हे जाणूनबुजून तर करत नाही ना? एक कॅबिनेट झाली त्याच्यात काही केलं नाही. उद्या कॅबिनेट आहे. त्यामुळं हे काही करत नाही. यांनी साखळी उपोषणाची दखल नाही घेतली तर बेमुदत आमरण उपोषण करण्याची वेळ येईल. एकदा जर आम्ही राज्य जाम करायला सुरुवात केली तर आम्ही उठणार नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“…तेव्हा रडायची वेळ आली होती”
“देवेंद्र फडणवीस यांची जी चाल आहे ती संपत नाही. जातीवादने पछाडलेला माणूस जर कोणी असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आधी जनतेची इज्जत करायला शिका, तेव्हा तुम्ही राजा व्हाल. देवेंद्र फडणवीस हा हतबल झाला होता. रडायची वेळ आली होती. पण याच मराठ्यांनी तुला गादीवर बसवलं. मुलीच्या परीक्षेसाठी जर तुम्ही सागर वरून वर्षावर जात नाही. इथे आमचे लेकर मारायला लागले. तू सन्मान देण्याचं काम करत नाही. तू आधी सन्मान द्यायला शिक. तेव्हा तुला सन्मान मिळेल. तू आमच्या लेकराचं वाटोळं करायला निघाला का? केस मागे घेणार आहे म्हणे. तुमचं नाव चांगलं होण्यासाठी तू काही पण करतो का?” असा सवालही मनोज जरांगे पाटील यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस आम्हाला चॅलेंज देऊ नको”
“गोरगरीब लेकरांचे वाटोळे करायचे का? देवेंद्र फडणवीस आम्हाला चॅलेंज देऊ नको. वेळ पडली तर 4 कोटी मराठे रस्त्यावर येतील. खोटं बोलून आमचं उपोषण उठवलं. आम्ही तुला मानलं होत की आमच्याशी गद्दारी करणार नाही. खूप विश्वास होता तुझ्यावर. मराठा आरक्षणासाठी आमच्या लेकरांनी आत्महत्या केल्या. तुझ्या मुलीसाठी तू बंगल्यावर जात नाही. सरकारपेक्षा मराठा मोठा आहे. हे पुन्हा एकदा दाखवून देऊ. माझ्याशी गद्दारी करु नको. एकही मराठा आमदार म्हणू शकत नाही की आम्हाला मराठ्यांनी मतदान केलं नाही”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
“15 तारखेपासून साखळी उपोषण सुरू होणार”
“येत्या 15 तारखेपासून या ठिकाणी साखळी उपोषण सुरू होणार आहे. हे टप्प्याटप्याने अजून वाढत जाईल. बेमुदत साखळी उपोषण सुरू होईल, आम्हाला शिकवू नका. असे कोण अधिकारी आहेत ज्याला नाव कमवायची हाव लागली आहेत. तू गोरगरिबांच्या कष्टांचा तळतळाट घेऊ नको. साखळी उपोषण बेमुदत असणार आहे. आम्ही काही गावं निवडणार असून पाच दहा जण रोज येऊन बसणार आहे. आता पुन्हा एकदा दाखवून देऊ की मराठे काय आहेत. आता यावेळेस आम्ही माघारी फिरणार नाही. मग आता काहीही होऊ द्या”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
“आता रस्त्यावर लढाई करून लढणार”
“धनंजय मुंडे यांच्यासारखी तुझी जी टोळी आहे. तिला पण फिरू देणार नाही. फडणवीस तू आहे तरी कशाला. फक्तं काड्या लावण्यासाठी आहे का? तुझ्या खिशात कड्याची पेटी असते का? कधी पण? तू फक्त म्हणतो मी सगळी बरोबर करतो. मला हलक्यात घेऊन चूक केली तर बेक्कार होईल फडणवीस. आता रस्त्यावर लढाई करून लढणार. इथे सत्ता आणि दरारा फक्त मराठ्यांचा आहेत. मराठ्यांनी ठरवले तर टायर सुध्दा हलणार नाही. मुंगी सुध्दा रस्ता क्रॉस करु शकणार नाही असं करून टाकू”, असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.