Mumbai Maharashatra News Live | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक संपन्न, नेमकी चर्चा काय?
Maratha Reservation Protest live news in Marathi : आज मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजीच्या महत्त्वाच्या आणि वेगवान राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि क्रीडा घडामोडी जाणून घ्या.
मुंबई | 31 ऑक्टोबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशी सुरु आहे. वैद्यकीय उपचार घेण्यास त्यांनी नकार दिला आहे. मराठा आरक्षणावर अजून कोणताही तोडगा निघाला नाही. यामुळे राज्यभरात आंदोलन पेटले आहे. राज्यात सोमवारी अनेक ठिकाणी हिंसाचार झाला. राज्यातील परिस्थितीचा आढावा पोलीस महासंचालकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना दिला. बीड आणि धारशीवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे. त्यात मराठा आरक्षणासंदर्भात महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यातील घडामोडी जाणून घ्या.
LIVE NEWS & UPDATES
-
राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक संपली
मुंबई | राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची बैठक संपली आहे. या बैठकीनंतर खासदार सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. “या बैठकीत मराठा आरक्षणाबद्दल चर्चा झाली. विशेष अधिवेशनाची आम्ही मागणी केलीय. आम्ही मुख्यमंत्र्याकडे याबाबत करणार आहोत”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यानी दिली.
-
धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर
धाराशिव | धाराशिव जिल्ह्यासह राज्यातील 15 जिल्ह्यातील 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर झालाय. धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, वाशी, लोहारा या तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर झालाय. राज्यातील 24 तालुक्यात गंभीर तर 16 तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर झालाय. दुष्काळ जाहीर झाल्याने जमीन महसूलात सूट, पीक कर्जाचे पुनरगठन, शेतीशी निघडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपच्या चालु वीज बिलात 33.5 टक्के सूट करण्याचा निर्णय झालाय. शालेय महाविद्यालय विद्यार्थी परीक्षा शुल्कात माफी, वीज तोडणी न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-
-
पुण्यात मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी मशाल मोर्चा
पुणे | मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु केलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सिंहगड रस्त्यावरील किरकटवाडी येथे मशाल मोर्चा काढण्यात आला होता. मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या मशाल मोर्चात ज्येष्ठ नागरिक,तरुण, विद्यार्थी, महिला यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता.
-
मालाडमध्ये मासळी विक्रेत्यांचे लोट-पोट आंदोलन
मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिम येथील मच्छी मार्केटमध्ये मच्छी विक्रेत्यांनी बीएमसीविरोधात लोट-पोट निदर्शने केली. आंदोलन करणाऱ्या मासळी विक्रेत्यांचे म्हणणे आहे की, ते सुमारे ४० वर्षांपासून येथे मासळी विक्रीचा व्यवसाय करत आहेत आणि आता त्यांना तेथून हटवण्याचा प्रयत्न बीएमसी करत आहे. बीएमसीचे कर्मचारी मासळी विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी पोहोचताच मासळी विक्रेत्यांनी लोट-पोट आंदोलन सुरू केले.
-
जालन्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद, जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची माहिती
जालना : जालन्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा आज सायंकाळी सहानंतर बंद करण्यात आली. 2 नोव्हेंबर पर्यंत जिल्ह्यात इंटरनेट सेवा पूर्णपणे बंद असणार आहे. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. समाज माध्यमांवर चुकीचे संदेश आणि व्हिडिओज फिरत असल्याने जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस इंटरनेट सेवा बंद राहणार आहे. जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबत माहिती दिलीय.
-
-
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तुरुंगातून बाहेर, समर्थकांचा घेराव
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू राजमुंद्री तुरुंगातून बाहेर येताच त्यांच्या समर्थकांनी त्यांना घेराव घातला.कौशल्य विकास घोटाळा प्रकरणी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाने आज त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
#WATCH राजमुंदरी जेल से बाहर निकलते ही आंध्र प्रदेश के पूर्व मुख्यमंत्री और टीडीपी प्रमुख एन चंद्रबाबू नायडू के समर्थकों ने उन्हें घेर लिया।
कौशल विकास घोटाला मामले में आंध्र प्रदेश हाई कोर्ट ने आज उन्हें अंतरिम जमानत दी है। pic.twitter.com/RKF1MsbEeM
— ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2023
-
कुपवाडा जिल्ह्यातील नवागाबरा भागात दुर्घटना, 4 जणांचा मृत्यू
जम्मू आणि काश्मीर उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील कर्नाह येथील नवागाबरा भागात वाहन दरीत पडल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.
-
अमृत कलश यात्रेच्या समारोप कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा सहभाग
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ‘मेरी माटी-मेरा देश’ अभियानांतर्गत देशभरात आयोजित ‘अमृत कलश यात्रे’च्या समारोप कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांनी देशाच्या विविध भागातून आणलेली माती एका महाकाय मडक्यात अर्पण केली आणि त्याचा तिलकही लावला. एक भारत-श्रेष्ठ भारत या भावनेचे प्रतिबिंब राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रतिनिधींच्या वतीने विविध भागांतील माती दिल्लीत आणण्यात आली आहे.
-
भारत दक्षिण अफ्रिका सामन्यांच्या तिकीट विक्रीप्रकरणी अंकित अग्रवालला अटक
अंकित अग्रवाल नावाच्या व्यक्तीला आयसीसी क्रिकेट विश्वचषक भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची तिकिटं विकल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. 2500 रुपयांचं तिकीटो 11,000 रुपयांना विकत होता. कोलकाता पोलिसांनी त्याच्या ताब्यातून 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याची एकूण 20 तिकिटे जप्त केली आहेत.
-
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पुष्कर धामी यांनी पाहिला तेजस चित्रपट
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज लखनौमध्ये एका विशेष स्क्रीनिंग दरम्यान ‘तेजस’ चित्रपट पाहिला. स्क्रिनिंगवेळी चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री कंगना रणौत आणि उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठकही उपस्थित होते.
उत्तराखंड के मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ने उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के साथ आज लखनऊ में एक विशेष स्क्रीनिंग के दौरान 'तेजस' फिल्म देखी।
स्क्रीनिंग के दौरान फिल्म की मुख्य अभिनेत्री कंगना रनौत और उत्तर प्रदेश के उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक भी मौजूद रहे। pic.twitter.com/A26312SyvK
— ANI_HindiNews (@AHindinews) October 31, 2023
-
राज्यभरात मराठा आंदोलनाची धग
राज्यभरात मराठा आंदोलनाची धग पसरली आहे. राज्यातील मंत्री, आमदार यांच्या घरांना सुरक्षा पुरविण्यात आली. तर ओबीसी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पण सुरक्षा देण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. उद्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक बोलविण्यात आली आहे.
-
जालना जिल्ह्यातील इंटरनेट बंद
जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. राज्यभरात मराठा आंदोलनं पेटले आहे. तीव्र आंदोलनामुळे जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जालना जिल्ह्यातील इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
-
तर मराठे काय असतात ते कळेल
बीडमधील प्रकरण लगेच बंद करा, हिंसा बंद करा असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. बीडमध्ये लहान मुलांवर गुन्हे दाखल केले तर बीडला येईल आणि मराठे काय असतात ते कळेल, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला. उद्यापासून पाणी पण बंद करेल, आता पुढची जबाबदारी सरकारची असेल, अर्धवट निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले.
-
सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं- मनोज जरांगे
राज्य सरकारने घेतलेला एकही निर्णय मान्य नसल्याची चपराक मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी लगावली. त्यामुळे मराठा आरक्षणाची कोंडी फुटण्याची सूतराम शक्यता दिसत नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उद्या सरकारने विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी त्यांनी केली. अगोदर आंदोलन होईल मग तुमची संचारबंदी लागू करा अशी भूमिका त्यांनी मांडली. गरीब मुलावर गुन्हा दाखल केला तर मी स्वतः बीडमध्ये येईल, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले.
-
बीड हिंसाचार प्रकरणी 34 जणांना अटक
बीड : काल झालेल्या जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 34 जणांना अटक केली आहे. शिवाजी नगर पोलीस हद्दीतून 24 जणांना तर शहरातून दहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. बीडमध्ये काल सायंकाळी तोडफोडीसह जाळपोळ करण्यात आली होती. यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
-
छत्रपती शाहू महाराज यांनी घेतली जरांगे पाटील आणि त्यांच्या कुटुंबाची भेट
जालना : छत्रपती शाहू महाराज यांनी जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी भेट घेतली. त्यानंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबाची भेट घेऊन विचारपुस केली. यावेळी जरांगे पाटील यांच्या घरी त्यांचे वडील, पत्नी आणि दोन्ही मुली होत्या.
-
विशेष अधिवेशन बोलण्याच्या सरकारच्या हालचालीचे स्वागत – बाळासाहेब सराटे
मुंबई : मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे सरकारला अडचणीचं होत असेल सर्व जातीच्या मराठ्यांना कुणबीजातीच पत्र देणं तर त्यांनी विशेष अधिवेशन बोलवावं. विधिमंडळात चर्चा करावी. सर्व पक्षीय सहमती घडवून आणावी. त्यातून निर्णय करावा. त्यांच्या या मागणीचा विचार करून सरकार विशेष अधिवेशनाचे पाउल उचलतय. त्याचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया मराठा अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी दिली.
-
मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा, परभणीच्या सेलू येथे रास्तारोको
परभणी : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा म्हणून परभणीच्या सेलू येथे रास्तारोको करण्यात आला. शहरातील रायगड कॉर्नर येथे करण्यात आलेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. विशेष म्हणजे या रस्तारोको आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत, उपस्थितांना मार्गदर्शन केले.
-
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर जळते टायर टाकून मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलन
सोलापूर – पुणे राष्ट्रीय महामार्गावर बाळे येथे रस्त्यावर जळते टायर टाकून मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले आहे.
-
शेतकरी नेते रवी तुपकर यांनी घेतली जरांगे यांची भेट
शेतकरी नेते रवी तुपकर यांनी मनोज जरांगे यांच्या उपोषणस्थळी जाऊन त्यांची आज भेट घेतली. रवी तुपकर यांनी मनोज जरांगे यांना पाठींबा दर्शवत मराठा आरक्षणाच्या लढ्यात सहभागी असल्याची माहिती दिली. मनोज यांना काही झालं तर राज्यात अराजकता माजेल आणि सरकारला महाराष्ट्रात मणिपूरसारखी परिस्थिती निर्माण करायची आहे का असा सवाल त्यांनी केला.
-
इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी समितीचा फायदा होणार – मुख्यमंत्री
इम्पिरिकल डेटा मिळवण्यासाठी शिंदे समितीचा फायदा नक्कीच होईल – मुख्यमंत्री
-
टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू देऊ नका – मुख्यमंत्री
मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयांचा फायदा मराठा समाजाला होईल. मराठा सामाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. टोकाचं पाऊल उचलून आंदोलनाला गालबोट लावू देऊ नका – मुख्यमंत्री
-
मराठा आरक्षण मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दगडफेक
सांगली : मराठा आरक्षण मागणीसाठी जत जवळ कर्नाटक सीमेवर बसवर दगडफेक करण्यात आली. कर्नाटक राज्याच्या एसटी बसवर करण्यात दगडफेक करण्यात आली. दगडफेकीत काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत. जत – विजयपुर मार्गावर दुचाकीवर आलेल्या आंदोलकांनी घोषणाबाजी करत दगडफेक केली. कर्नाटकच्या सातारा – विजयपूर बसवर दगडफेक करण्यात आली.
-
सरसकट कुणबी प्रमाणपत्र मागितलं तर…, प्रकाश शेंडगे यांचा इशारा
जरांगे पाटलांना विनंती की त्यांनी निजाम काळातील ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यांच्यासाठी कुणबी दाखला मागितलाय याला आमचा पाठींबा आहे पण सरसकट कुणबी मराठा प्रमाणपत्र मागितलं तर विरोध कायम राहणार आणि त्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा प्रकार शेंडगे यांनी दिलाय.
-
चार महिन्यांपासून गडचिरोली जिल्ह्यातील 15 गावे संपर्काच्या बाहेर
गडचिरोली : जिल्ह्यात चार महिन्यांपासून 15 गावे संपर्काच्या बाहेर असून शासन प्रशासन दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये उदासीनता आहे. पावसाळ्यात वाहून गेलेले रस्ते अजूनपर्यंत नादुरुस्त आहेत. हिवाळा आला तरी परिस्थिती जसै थे असल्याने नागरिकांमध्ये नाराजी. २० किलोमीटर जास्तीच्या प्रवास करून आर्थिक भूदंड 15 गावातील नागरिकांना सहन करावा लागतो. जीव धोक्यात घालून अशा गंभीर मार्गातूनही जवळपास रोज आठ ते दहा वाहन व दीडशे प्रवासी प्रवास करतात
-
मुंडन करत मराठा आंदोलकांकडून सरकारचा निषेध
जालना, तळणी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुंडन करत मराठा आंदोलकांनी सरकारचा निषेध केला. आणि एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या.
-
प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना पाठवलं माघारी
सांगली : काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांना मराठा आंदोलकांनी धारेवर धरलं आहे. सांगलीवाडी गावात प्रवेश बंदी असताना आलेल्या आमदार विश्वजीत कदम यांना माघारी पाठवलं आहे. सांगलीवाडीत भारती विद्यापीठामध्ये कामानिमित्त आलेल्या विश्वजीत कदम यांना मराठा आंदोलकांनी कॉलेजमधून परत पाठवल्याचे पाहायला मिळाले.
-
दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात खासदार हेमंत पाटलांचं उपोषण
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आपल्या पदाचा राजीनामा दिलेले खासदार हेमंत पाटील यांनी आज एक दिवसाच लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे, उपोषणावेळी त्यांनी मौनव्रत धारण केलं आहे.
-
शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी – चंद्रकांत पाटील
संदीप शिंदे यांच्या समितीने गेल्या ४० दिवसांत अथक मेहनत घेतली आणि नोंदी सापडल्या आहेत. हा शिंदे समितीचा अहवाल सरकारने स्वीकारला. शिंदे समितीचा अहवाल प्राथमिक असून अजून काम करणं बाकी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
-
Maratha Reservation : मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्यास भुजबळांचा विरोध
मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिल्यास छगन भुजबळ यांचा विरोध आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मंत्रीमंडळाच्या बैठकीत भुजबळांची मराठा नेत्यांशी खडागंजी झाल्याचे सुत्रांनी सांगितले.
-
Maratha Reservation : मराठा संघटनेनं मुंबई आणि साताऱ्याकडे जाणारी वाहतूक अडवली
पुण्याच्या येवले पुलाजवळ आंदोलकांनी रास्ता रोको केले आहे. आंदोलकांनी टायर जाळल्यामुळे वाहानांच्या दहा किलोमीटरपर्यंतच्या रांगा लागल्या आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. परिस्थीती नियंत्रणात आण्यासाठी पोलिसांचे शर्थिचे पर्यत्न सुरू आहे.
-
Maratha Reservation : मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्द मांडा- उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे यांनी मराठा आंदोलनावर भुमीका मांडली. पंतप्रधान मोदींसमोर मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. आरक्षणाच्या मुद्यावरून सगळ्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आरक्षणाचा मुद्दा मोदींसमोर मांडावा असे उद्धव ठाकरे म्हणाले.
-
Maratha Reservation : मराठा आंदोलक आक्रमक, पुण्यात वाहानांच्या रांगाच
पुण्यात मराठा आंदोलन चिघळले आहे. मराठा आंदोलकांनी नवले पुलावर टायर जाळून रास्ता रोको केले आहे. वाहतूकीला याचा मोठा फटका बसलेला आहे. या जाळपोळीमुळे जवळपास 7 किलोमीटर पर्यंतच्या रांगा लागल्या आहे.
-
Maratha Reservation : पुण्यातील नवले पुलाजवळ आंदोलकांची जाळपोळ
मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. याची धग आता पुण्यातही पोहोचली आहे. आंदोलकांनी पुण्याच्या येवले ब्रिज जवळ जाळपोळ सुरूपात केली आहे. सरकारला जागं करणयासाठी जाळपोळ करत असल्याची प्रतिक्रीया आंदोलकांनी दिली.
-
तिथे मणिपूर जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय अन् मोदी फक्त भाषणं करून जातात- उद्धव ठाकरे
“जे अपात्र होणार आहेत, ते राजीनामा देत आहेत. आमदार आणि खासदारांनी राजीनामे दिले तरी त्यांना काही फरक पडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मेरी माटी मेरा देश अशी जाहिरात दिली आहे. पण देशातील माणसांनाच किंमत नसेल तर त्या जाहिरातीला काही अर्थ नाही. तिथे मणिपूर जळतंय, इथे महाराष्ट्र पेटतंय. मोदी फक्त भाषणं करून जातात,” असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
-
मराठा आरक्षणासाठी दिल्लीत का गेले नाहीत? उद्धव ठाकरेंचा सवाल
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे जेव्हा मंत्रिमंडळ विस्तारातील वाद होता, तेव्हा दिल्लीला गेले. पण आता मराठा आरक्षणासारखा मोठा मुद्दा असताना ते एकदाही का दिल्लीला गेले नाहीत, असा सवाल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत केला.
-
केंद्रात तोडगा निघाला नाही तर 48 खासदारांनी राजीनामा द्यावा- उद्धव ठाकरे
“मराठा समाजाला त्यांचा न्याय आणि हक्क मिळालाच पाहिजे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा. गडकरी, कराड, गोयल यांनी हा मुद्दा केंद्रात मांडावा. केंद्रात तोडगा निघाला नाही तर 48 खासदारांनी राजीनामा द्यावा”, असं उद्धव ठाकरे म्हणाला.
-
आरक्षणावर मार्ग काढा, आम्ही तुमच्यासोबत- उद्धव ठाकरे
“मी मनोज जरांगे पाटील यांनाही विनंती करतो की तुम्ही टोकाचं पाऊल उचलू नका. तुमच्यासारख्या लोकांची या राज्याला, देशाला गरज आहे. मी राज्य सरकारला आवाहन करतो की आरक्षणावर मार्ग काढा, आम्ही तुमच्यासोबत आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
स्वराज्य जळत असताना यांना प्रचार महत्त्वाचा वाटतो का?- उद्धव ठाकरे
“मराठा आरक्षणाबद्दल मी दसरा मेळाव्याबद्दल बोललोय. पण अजूनही त्यातून मार्ग निघत नाहीये. काल मुख्यमंत्र्यांनी एक मिटींग घेतली आणि माझ्या माहितीनुसार दोन्ही उपमुख्यमंत्री त्या मिटींगला नव्हते. एका उपमुख्यमंत्र्यांना डेंग्यू झालाय आणि दुसरे उपमुख्यमंत्री पक्षाच्या प्रचारासाठी रायपूरला गेले होते. स्वराज्य जळत असताना यांना प्रचार महत्त्वाचा वाटतो का” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
-
नार्वेकर मुंबईत असतील तर आदेशाची कॉपी त्यांना द्या- उद्धव ठाकरे
“सर्वोच्च न्यायालयाने नार्वेकरांना आदेश दिला आहे. आपल्याकडे तो आदेश आला आहे. नार्वेकर म्हणाले, मी आदेश वाचला नाही. त्यामुळे मी हा आदेश वाचून दाखवत आहे. मी माझ्या आमदारांना सांगणार आहे की, जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्याची कॉपी त्यांना द्या आणि त्यांच्यासमोरही वाचन करा,” असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
-
उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर पत्रकार परिषद
मराठा आरक्षणाचा विषय चिघळलेला आहे. पण काल सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला, त्यावर मला बोलायचं आहे. सर्वांत मोठी लोकशाही आपल्या देशात आहे. तीच लोकशाही धोक्यात असेल तर सर्वोच्च न्यायालय काय करतंय, याकडे लोकांचं लक्ष आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
-
Shahu Maharaj Chatrapati | शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगे यांच्यात संवाद
मी महाराजांच्या गादीचा सन्मान करतो, तुम्ही म्हणाल तर पाणी पितो. 2 दिवसांत आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा पाणी बंद! – मनोज जरांगे पाटील
-
Shahu Maharaj Chatrapati | शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगे यांच्यात संवाद
मी अर्धवट आरक्षण घेणार नाही. अर्धवट आरक्षण असल्यास मी जीआर फाडून टाकणार. मी अर्धवट आरक्षण घेणार नाही- मनोज जरांगे पाटील
-
Shrimant Shahu Chhatrapati | श्रीमंत शाहू छत्रपती अंतरवाली सराटीत दाखल
शाहू महाराज छत्रपती मनोज जरांगेच्या भेटीला. मागील 7 दिवसांपासून जरांगेचं उपोषण सुरु. श्रीमंत शाहू छत्रपती अंतरवाली सराटीत दाखल.
-
Mantralay | मंत्रालय बाहेर लांबच लांब रांगा
मंत्रालय बाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ. पास काढून मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात पोलीस चेकिंग करत मंत्रालयात सोडत असल्याने मंत्रालय बाहेर लांबच लांब रांगा. भर उन्हात अर्धा एक तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने नागरिक संतप्त. एकाच गेट मधून प्रवेश न देता अन्य ठिकाणावरून मंत्रालयात प्रवेश देण्याची सर्व सामान्य नागरिकांची मागणी.
-
Sangali | सोन्या बैलाचाही जरांगे पाटलांना पाठिंबा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी राज्यभर आंदोलन सुरू आहेत. तर या आंदोलनाचा भाग म्हणून सांगली जिल्ह्यातल्या वाटेगावच्या सोन्या बैलाने ही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. चार वेळा हिंद केसरी असलेल्या सोन्या बैलाच्या पाठीवर मराठा आरक्षण मिळालाच पाहिजे एक मराठा लाख मराठा असे लिहून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे.
-
Jalna Jarange Patil | “मी आता पाणी घेत आहे” म्हणत आरोग्य तपासणी पथकाला पाठवलं परत
जरांगे पाटील यांच्या आरोग्य तपासणी साठी डॉक्टर आले होते आणि मी आता पाणी घेत आहे असे म्हणत जरांगे पाटील यांनी आरोग्य तपासणी पथकाला वापस पाठवले.
-
Sambhajinagar | कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि तो आम्ही घडू देखील देणार नाही
छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची माहिती. अतिरिक्त पोलीस बल आम्ही मागितला असून SRPF ची देखील एक तुकडी शहरात तैनात करण्यात आली आहे. शहरातल्या सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावत शहरात पेट्रोलिंग वाढवल्याची आयुक्तांची माहिती. शहरात सर्व काही शांत कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही आणि तो आम्ही घडू देखील देणार नाही. पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी व्यक्त केला विश्वास.
-
Sambhajinagar | संभाजीनगर शहरात संचारबंदी सारखी परिस्थिती नाही- पोलीस आयुक्त मनोज लोहिया
संभाजीनगर शहरात संचारबंदी सारखी परिस्थिती नाही शहरात कायदा आणि सुव्यवस्था नियंत्रणात. छत्रपती संभाजीनगरचे पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांची माहिती. छत्रपती संभाजी नगर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत योग्य तो पोलीस बंदोबस्त लावला असून सर्व काही सुरळीत असल्याची पोलीस आयुक्तांची माहिती.
-
Live Update : सकल मराठा समाजाच्यावतीने मालेगावात साखळी उपोषण
सकल मराठा समाजाच्यावतीने मालेगावात साखळी उपोषण सुरु आहे. अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय समोर आंदोलन सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करण्यात आलं आहे. संपूर्ण मराठा समाज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देताना दिसत आहे…
-
Live Update : मुख्यमंत्री शिंदेंनंतर देवेंद्र फडणवीस देखील राज्यपालांच्या भेटीला
मुख्यमंत्री शिंदेंनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील राज्यपालांच्या भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीसांनी भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. १० ते १५ मिनिटं उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यामध्ये चर्चा सुरु झाली आहे.
-
Live Update : महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हलचाली सुरु कराव्यात – जरांगे पाटील
महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या हलचाली या दोन दिवसात विशेष अधिवेश घेवून सुरु कराव्यात. कारण आता आम्ही थांबायला तयार नाही… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे…
-
Live Update : गोर-गरीब लेकरांच्या मागे उभे राहा… – जरांगे पाटील
सर्वांनी मुंबईत या असं आवाहन सर्व आमदार, खासदारांना केलं होतं. तिथं आंदोलन करा गोर-गरीब लेकरांच्या मागे उभे राहा.. असं आवाहन केलं होतं. एकही मराठ्यांचा माणूस तुम्हाला विसरणार नाही… पण मागणी करताना महाराष्ट्रातील मराठ्यांची करा… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
Live Update : शेती शब्दाची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या विचारांचे नाहीत – जरांगे पाटील
शेती शब्दाची लाज वाटण्याइतके मराठे खालच्या विचारांचे नाहीत… असं देखील जरांगे पाटील म्हणाले आहेत. एवढंच नाही तर, ज्यांना कुणबी प्रमाणपत्र नको, त्यांना जबरदस्ती नाही… उद्रेक करु नका, शांततेत आंदोलन करा… असं आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला केलं आहे.
-
Live Update : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा – जरांगे पाटील
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी विशेष अधिवेशन बोलवा असं वक्तव्य जरांगे पाटील यांनी केलं आहे. मराठा समाजाता व्यवसाय शेती, शेतीनुसार कुणबी आरक्षण द्या. यापूर्वी ६० टक्के मराठा समाज ओबीसीत गेलेला आहे… असं वक्तव्य देखील जरांगे पाटील यांनी केलं आहे.
-
मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाबाहेर तीन आमदारांचं उपोषण
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमदार निलेश लंके, कैलास पाटील, राजू नवघरे या तीन आमदारांनी मुंबई मंत्रालयाबाहेर लाक्षणिक उपोषण सुरू केलं आहे.
-
जरांगे पाटील यांच्या पत्रकार परिषद वेळेत बदल
जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद वेळेत बदल करण्यात आता 10:30 ऐवजी आता 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. जरांगे पाटील कोणता निर्णय घेणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लश्र लागून आहे.
-
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस राहणार बंद
कर्नाटकातून महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व बसेस बंद राहणार आहेत. पुढील आदेश येईपर्यंत बसची सेवा बंद राहणार असून महाराष्ट्रातील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक परिवहन विभागाचा निर्णय, महाराष्ट्रात कर्नाटकच्या बसेस टार्गेट केल्या जात असल्याने हा निर्णय घेतला आहे.
-
थोड्याच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद
थोड्याच मनोज जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे. 10:30 वाजता मनोज जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी संवाद केल्यानंतर जरांगे पाटील काय बोलणार या कडे सर्व मराठा समाजाचं लक्ष आहे.
-
छत्रपती संभाजीनगरमध्ये बसेस बंद
छत्रपती संभाजीनगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरच्या मुख्य बस स्थानकावर शुकशुकाट पाहायला मिळतोय. पश्चिम महाराष्ट्र , विदर्भातून येणाऱ्या एसटी बसेस पूर्णपणे बंद आहे. त्यासोबत छत्रपती संभाजी नगर मधून सुटणाऱ्या देखील बसेस बंद करण्यात आल्या आहेत. मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संभाजी नगर एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. छत्रपती संभाजी नगरच्या मुख्य बस स्थानकावर अनेक बसेस थांबून आहेत. 150 पेक्षा अधिक बसेस बस स्थानकात थांबून आहेत.
-
मुख्यमंत्री शिंदे यांच्या घराकडे जाणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात बंदोबस्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी येणाऱ्या मार्गावर पोलिसांची मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात आहे. महालक्ष्मी ते मरबार हिल वर्षा निवासस्थानी जाणाऱ्या मार्गावर दोन ते तीन ठिकाणी पोलिसांनी बॅरिगेट लावून बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
-
Manoj jarange patil | सरपंच मंगेश साबळे यांच्याकडून जरांगे पाटलांना रक्ताभिषेक.
मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिमेला घालणार रक्ताभिषेक. जरांगे पाटलांना आरोग्य मिळावं आणि आंदोलनाला यश यावं यासाठी रक्ताभिषेक. फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावचे सरपंच मंगेश साबळे यांच्याकडून रक्ताभिषेक. गेवराई पायगा या गावात हजारो गावकऱ्यांच्या उपस्थितीत करणार रक्ताभिषेक
-
Manoj jarange patil | मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे अंतरवाली सराटी गावात दाखल. मनोज जरांगे पाटील यांच्या विराट सभेवेळी शेतीचे नुकसान झाले होते. त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई संदर्भात मंगेश चिवटे मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करणार. मंगेश चिवटे हे मनोज जरांगे पाटील यांना उपोषणादरम्यान पाणी घ्यावे म्हणून करणार विनंती.
-
Maratha Reservation | नारायण कुचे यांच्या घराला संरक्षण कधी मिळणार?
बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या घराला अद्याप संरक्षण नाही. नारायण कुचे यांच्या घराला संरक्षण देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. बीड जिल्ह्यातील जळपोळीमुळे नारायण कुचे यांचे कुटुंबीय धास्तावले. काल आंदोलकांनी नारायण कुचे यांच्या घराला घातला होता गराडा.
-
Maratha Reservation | छत्रपती संभाजी नगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात
छत्रपती संभाजी नगरमध्ये परिस्थिती नियंत्रणात आहे. संभाजीनगर मधल्या क्रांती चौकात पोलिसांचा बंदोबस्त आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून संभाजीनगर मध्ये पोलीस प्रशासन अलर्टवर. संभाजीनगर मध्ये जनजीवन सुरळीत, शहरात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे.
-
Maratha Reservation Protest | श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातून मराठवाड्यासह इतर जिल्ह्यात जाणारी एसटी बस सेवा बंद करण्यात आली आहे. पंढरपूर मार्गे जाणाऱ्या लातूर नांदेड, परभणी, जालनासह सर्वच ठिकाणी जाणाऱ्या एसटी बस बंद करण्यात आल्या आहेत.
-
Maratha Reservation Protest | श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना
श्रीमंत शाहू छत्रपती महाराज अंतरवाली सराटीसाठी रवाना झाले आहे. ते मनोज जरंगे पाटील यांची भेट घेणार आहे. त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहे. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सातव्या दिवशीही सुरु आहे.
-
Maratha Reservation Protest | मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली
मनोज जरांगे पाटील यांचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावली आहे. गेल्या सहा दिवसांपासून त्यांनी वैद्यकीय उपचार घेतले नाहीत. मराठा आरक्षणसाठी सुरु असलेले आंदोलन शांततेत करण्याचे आवाहन त्यांनी केले.
-
Maratha Reservation Protest | मराठा आंदोलनासाठी कांदा लिलाव बंद
मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी कांदा लिलाव बंद ठेवण्यात येणार आहे. मुंगसे बाजार समितीत आज कांदा लिलाव बंद आहे. नाशिकच्या मुंगसे कांदा मार्केट व्यापाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. कांदा व्यापाऱ्यांनी मराठा आरक्षणासाठी लिलाव बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
-
Maratha Reservation Protest | बीड, धारशिवमध्ये संचारबंदी
बीड आणि धारशिवमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मराठा आंदोलनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. बीडमध्ये आजपासून srpf पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे.
Published On - Oct 31,2023 7:07 AM