AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या परिवाराची प्रतिक्रीया

मराठा आरक्षणाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांच्या मुद्यांवर अडलेला होता मात्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशात मराठ्यांच्या सग्यासोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्या परिवाला या क्षणाचा अत्यंत आनंद झालेला आहे.

Maratha Reservation : समाजाला न्याय मिळवून दिल्यानंतर मनोज जरांगे यांच्या परिवाराची प्रतिक्रीया
मनोज जरांगे यांचा परिवारImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 11:52 AM

मुंबई : गेल्या पाच महिन्यांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Aarakshan) लढा देण्याऱ्या मनोज जरांगे यांच्या परिवारासाठीही आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. समाजासाठी सर्वस्व अर्पण केलेल्या मनोज जरांगे यांच्या परिवाराने tv9 मराठीला विशेष प्रतिक्रीया दिली आहे. मराठा आरक्षणाच्या लढ्यात मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांचादेखील मोठा वाटा आहे. मनोज जरांगे गेल्या पाच महिन्यांपासून स्वतःत्या घरी देखील गेले नाहीत. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी घरी जाणार नाही असा पण मनोज जरांगे यांनी घेतला होता. माझं जीवन हे मराठा समाजासाठी समर्पित आहे असं मनोज जरांगे यांनी वेळोवेळी आपल्या भाषणांमधून सांगितलं आहे. आता जरांगे यांचा परिवार त्यांची आतूरतेने वाट पाहात आहे.

कुटूंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण

मराठा आरक्षणाचा मुद्दा सग्यासोयऱ्यांच्या मुद्यांवर अडलेला होता मात्र सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशात मराठ्यांच्या सग्या सोयऱ्यांनाही आरक्षण मिळणार असल्याचं नमुद करण्यात आलं आहे. मनोज जरांगे यांच्या परिवाला या क्षणाचा अत्यंत आनंद झालेला आहे. समाजासाठी लढणाऱ्या त्यांच्या वडीलांबद्दल बोलताना जरांगे यांची मुलं अतिशय भावूक झाली होती. गेल्या पाच महिन्यांपासून आपले पती घरी आले नसुन ते समाजासाठी लढत असल्याची प्रतिक्रीया जरांगे पाटील यांच्या पत्नी आणि मुलांनी दिली. आम्ही पप्पांचे स्वागत मोठ्या थाटामाटात करू असंही त्यांचे मुलं म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आता घरी परत यावं, कुटूंबीयांची आर्त हाक

मनोज जरांगे यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला अखेर आज यश आलं आहे. या सगळ्यात त्यांच्या कुटूंबीयांचा त्याग हा अत्यंत महत्त्वाचा ठरला. आता आरक्षण मिळालं आहे, त्यामुळे आपल्या वडीलांनी घरी यावं अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे यांच्या कुटूंबीयांनी दिली आहे. या यशाचे श्रेय आपले वडील आणि मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या मराठा आंदेलकांना जातं अशी प्रतिक्रीया मनोज जरांगे यांच्या मुलीने दिली आहे.

फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?
फडणवीस शिंदेंपासून सावध रहा, कारण... संजय राऊतांनी काय दिला सल्ला?.
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला...
पाकचा लष्कर प्रमुख भेदरला, कारवाईच्या भितीची धास्ती अन् लपून बसला....
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्
पहलगाम हल्ल्यानंतरचा CCTV समोर, जीव मुठीत घेऊन पर्यटकांची धावाधाव अन्.
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्...
भाजप माजी नगरसेवकाच्या आजी-माजी समर्थकांमध्ये राडा, तलवारी, रॉड अन्....
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?
9 तारखेच्या आतच काम होणार तमाम? पाकिस्तानला PM मोदींचा मोठा इशारा काय?.
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?
HSC : ऑल द बेस्ट पोरांनो, बारावीचा आज निकाल, कुठे पाहता येणार रिझल्ट?.
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल
जंगल मंगल कॅम्पचे सॅटेलाइट फोटो व्हायरल.
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली
भारताचा आणखी एक कठोर निर्णय, पाकिस्तानची कोंडी वाढली.
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू
अटारी बॉर्डरच्या जवळील गावात सापडली संशयास्पद वस्तू.
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप
मुंडेंकडून 18 तुकडे करण्याची धमकी; करुणा शर्मांचा गंभीर आरोप.