आक्रोश मोर्चा LIVE : नामदेव पायरीपासून आक्रोश दिंडीला सुरुवात, बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे.

आक्रोश मोर्चा LIVE : नामदेव पायरीपासून आक्रोश दिंडीला सुरुवात, बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना
मराठा क्रांती मोर्चा
Follow us
| Updated on: Nov 07, 2020 | 11:59 AM

पंढरपूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज पंढरपूर ते मंत्रालय निघणार पायी दिंडी निघणार आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रोश मोर्चा, सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीने या आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास श्रीक्षेत्र नामदेव पायरीवरुन हा आक्रोश मोर्चा निघणार आहे. या मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन आयोजकांनी मराठा समाजाला केलं आहे (Maratha Samaj Akrosh Morcha From Pandharpur To Mumbai Mantralay).

पंढरपूर प्रशासनाने केलेलं आवाहन धुडकावत मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज बांधव ते पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. पंढरपूर ते पाय मुंबई पायी दिंडी काढू नये, यासाठी काल जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, ही बैठक निष्फळ ठरल्यामुळे आज पंढरपूर ते मुंबई आक्रोश मोर्चा काढण्यावर मराठा समाज बांधव ठाम आहेत.

पंढरपूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. त्यातच मराठा समाजाने आक्रोश मोर्चा पुकारल्याने पोलिसांनी मंदिराच्या चारही बाजूने मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. त्याशिवाय, ड्रोन द्वारे पोलिसांची आंदोलनस्थळी नजर असणार आहे.

LIVE 

[svt-event title=”नामदेव पायरी पासून आक्रोश दिंडीला सुरुवात” date=”07/11/2020,11:58AM” class=”svt-cd-green” ] नामदेव पायरी पासून आक्रोश दिंडीला सुरुवात, इंदिरा चौकातून बसने पन्नास कार्यकर्ते मुंबईला रवाना होणार, आचार संहिता असल्याने मुख्य सचिवांकडे निवेदन देणार [/svt-event]

[svt-event title=”आंदोलक नामदेव पायरीवर पोहचले” date=”07/11/2020,11:40AM” class=”svt-cd-green” ] आंदोलक नामदेव पायरीवर पोहोचले, नामदेव पायरीवर बोंबा बोंब केली, तिन्ही पक्षांचा, महाविकास आघाडी सरकारचा निषेध [/svt-event]

[svt-event title=”समाज बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचा विरोध” date=”07/11/2020,11:39AM” class=”svt-cd-green” ] समाज बांधवांकडून पदाधिकाऱ्यांचा विरोध, तुम्ही नाही आम्हाला पण नामदेव पायरीवर घेऊन जा, आंदोलक नामदेव पायरीकडे निघाले [/svt-event]

[svt-event title=”आंदोलक दर्शनाला निघाले, पोलिसांनी बॅरिकेटिंगवर अडवले” date=”07/11/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] आंदोलक दर्शनाला निघाले, पोलिसांनी बॅरिकेटिंगवर अडवले, आतमध्ये दहा जणांना नाही, तर सगळ्यांना परवानगी द्या, आंदोलकांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”आंदोलक नामदेव पायरीकडे निघाले” date=”07/11/2020,11:37AM” class=”svt-cd-green” ] आंदोलक नामदेव पायरीकडे निघाले, पोलिसांनी केवळ दहा जणांना आत जाण्याची परवानगी दिली, मात्र सगळ्यांना आत सोडा आंदोलकांची मागणी [/svt-event]

[svt-event title=”पंढरपुरात पदाधिकार्‍यांची जोरदार घोषणाबाजी सुरु” date=”07/11/2020,9:57AM” class=”svt-cd-green” ] पदाधिकार्‍यांची जोरदार घोषणाबाजी सुरु, एक मराठा लाख मराठा जोरदार घोषणाबाजी सुरु [/svt-event]

मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च धडकणार

त्याशिवाय, मुंबईत मराठा क्रांती मोर्चा मशाल मार्च आज धडकणार आहे. मात्र, मराठा क्रांती मोर्चा अजूनपर्यंत सर्व नियम पाळून, शांततेत झाला आहे. त्याप्रमाणेच आजचा मशाल मार्चही शांततेत काढण्यात येईल. मोर्चेकरी हे बांद्रा कलेक्टर कार्यालयाच्या समोरे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानात जमणार आहेत. मोर्चासाठी पूर्व तयारी म्हणून बैरिकेट्स आदिची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबर वांद्रे, खेरवाडी येथे पीडब्ल्यूडी ग्राऊंडमध्ये वाहने पार्किंगची सोय करण्यात आली आहे. मोर्चेकर्त्यांच्या वतीने मातोश्रीवर माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे.

मराठा क्रांती मशाल मोर्चाची नियमावली

  • आपल्या मशाली या प्रतीकात्मक असतील.
  • कायदा सुव्यवस्थेचा आदर करता कृपया खऱ्या मशाली आणू नयेत.
  • आपापली वाहने नेमून दिलेल्या वाहनतळावर पार्क करून शांततेच्या मार्गाने दिलेल्या नियोजित ठिकाणी जमावे.

मार्चमध्ये फक्त खालील घोषणा दिल्या जाणार

1) जय भवानी जय शिवराय 2) एक मराठा लाख मराठा 3) तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय 4) आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं.

Maratha Samaj Akrosh Morcha From Pandharpur To Mumbai Mantralay

संबंधित बातम्या :

मराठा आरक्षणावर तोडगा काढा, कोणतीही उणीव ठेवू नका; अशोक चव्हाणांची दिल्लीत वकिलांशी चर्चा

पंढरपूरमध्ये संचारबंदी आदेशाची होळी! राज्यभरात चक्काजाम आंदोलनाचा मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.