AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी भाषा दिन : कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत ‘मराठी’साठी आयुष्य वेचणारा नव्वदीतला तरुण!

आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. Marathi Language Day Nashik Kusumagraj Y P Kulkarni

मराठी भाषा दिन : कुसुमाग्रजांच्या कर्मभूमीत 'मराठी'साठी आयुष्य वेचणारा नव्वदीतला तरुण!
मराठी भाषा दिन...
Follow us
| Updated on: Feb 27, 2021 | 10:43 AM

नाशिक : आज (27 फेब्रुवारी) मराठी भाषा दिन. कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दिवस राज्यभर साजरा केला जातो. आपल्या मराठी भाषेला समृद्ध करण्यासाठी अनेकांनी आपलं आयुष्य वेचलं. आज महाराष्ट्रात अनेक मराठी घरं आहेत. मात्र, नाशिकमधील ‘मराठी भाषेचं घर’ आम्ही आपल्याला आज दाखवणार आहोत. या घरातील नव्वदीतल्या तरुणाला आपण भेटणार आहोत, ज्याने आपलं संपूर्ण आयुष्य या मातृभाषेला समर्पित केलंय… (Marathi Language Day Nashik Kusumagraj Y P Kulkarni).

ज्या कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ मराठी भाषा दिन साजरा केला जातो, त्या कुसुमाग्रजांची नाशिक ही कर्मभूमी. त्याच नाशिकमध्ये आजही मराठी भाषेला समृद्ध करण्याची धडपड सुरू आहे. मराठी भाषेला संपन्न करण्यासाठी, या भाषेला तिचा अभिजात दर्जा देण्यासाठी आणि व्यवहारात मराठी भाषेचा वापर व्हावा यासाठी अखंड आयुष्य समर्पित करणार नाव म्हणजे म्हणजे नाशिकचे निष्णात अभ्यासक, यशवंत कुलकर्णी. यशवंत कुलकर्णी म्हणजे मराठी भाषेचं एक चालत बोलत संग्रहालयचं. एक विद्यापीठचं म्हणावं लागेल.

‘कुठल्याही गावाला गेलं की किमान 1 पुस्तक विकत घेण्याचा छंद’

सुरकूतल्या बोटांनी पुस्तकाची पानं चाळत आजही ते दिवसातील आठ-दहा तास वाचन करतात. मराठी वाङमयात कदाचितच असं एखादं पुस्तक, एखादं काव्य किंवा एखादा ग्रंथ असेल जो वाय. पी. यांच्या नजरे खालून गेला नाही. 7 हजारांहून अधिक मराठी पुस्तकं, ग्रंथ, काव्य संग्रह, आत्मचरित्रं यांचा खच्चून भरलेला ठेवा त्याच्या कपाटातून डोकावतो. विशेष म्हणजे जेवढा पुस्तकांचा संग्रह त्यांच्या घरात आहे, त्याच्या कैकपट त्यांनी तो आपल्या विद्यार्थ्याना वाटला आहे. वाय. पी यांचा सर्वात आवडता छंद म्हणजे कुठल्याही गावाला कामानिमित्त गेलं की किमान 1 पुस्तक तरी विकत घेऊन ते वाचणं.

‘प्रगल्भ वाचनाच्या आवडीचं श्रेय मराठीच्या शिक्षकांना’

सर्वात आश्चर्याचा धक्का तेव्हा बसतो, जेव्हा यातील कोणत्याही पुस्तकातील कोणताही संदर्भ विचारल्यास, ते चटकन पुढचा संदर्भ जोडून सांगतात. एखाद्या तरुणाला अथवा विद्यार्थी दशेत असलेल्या विद्यार्थ्याला लाजवेल असा त्यांचा मराठीचा अभ्यास तुम्हाला अचंबित केल्याशिवाय सोडत नाही. या प्रगल्भ वाचनाच्या आवडीचं श्रेय ते त्यांच्या मराठी शिक्षकांना देतात.

कुसुमाग्रजांच्या नावाने नाशकात संस्था

विष्णु वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य रवी, लेखक, नाटककार, कथाकार आणि समीक्षक होते. त्यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. पण त्यांचे काका वामन शिरवाडकर यांनी त्यांना दत्तक घेतल्याने त्यांचं नाव विष्णु वामन शिरवाडकर असं बदललं गेलं. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि एक बहीण.. एकुलत्या एक बहिणीचं नाव कुसुम… कुसुमचे अग्रज म्हणून त्यांनी त्यांचं टोपणनाव कुसुमाग्रज असे धारण केलं.

मराठी रंगभूमीच्या सुवर्णकाळात कुसुमाग्रजांनी फार मोठं योगदान दिलं. कवी असलेले कुसुमाग्रज एक यशस्वी नाटककार झाले. कविता, नाटक, कादंबरी, कथा, लघुनिबंध हे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. 10 मार्च 1999 रोजी त्यांचं निधन झालं. कुसुमाग्रजांच्या स्मरणार्थ नाशिकमध्ये ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ नावाची संस्था उभारण्यात आली आहे. त्यांच्या नाशिकमधील टिळकवाडी येथील निवासस्थानी आता मराठी पुस्तकांचे मोठे ग्रंथालय उभारण्यात आले आहे.

(Marathi Language Day Nashik Kusumagraj Y P Kulkarni).

हे ही वाचा :

मराठी राजभाषा दिन 2021: ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’, राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन

अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र
आयकर विभागाची विदर्भात मोठी कारवाई; सोनं-चांदीच्या दुकानांवर धाडसत्र.
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान
जोरदार वारा, पावसाचा तडाखा; फळबागांना नुकसान.