Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांसह शेती खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट

आधीच पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. नदीला पूर आल्यानं अनेक भागात घरात पाणी शिरल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत.

Marathwada Heavy Rain : मराठवाड्यात सर्वच जिल्ह्यात अतिवृष्टी; पिकांसह शेती खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 4:07 PM

औरंगाबाद : मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरुच होता. मात्र, सोमवारी रात्री मराठवाड्यातील अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीन, ऊसाचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेती पिकांसह जमीन खरवडून गेल्यानं शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलं आहे. आधीच पाचवीला पुजलेला दुष्काळ आणि आता अतिवृष्टी यामुळे मराठवाड्यातील शेतकरी पुरता खचला आहे. नदीला पूर आल्यानं अनेक भागात घरात पाणी शिरल्याचं चित्रही पाहायला मिळालं. त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. त्यामुळे पंचनाम्याचा फक्त सोपस्कार पार न पाडता सरसकट मदत देण्याची मागणी मराठवाड्याती शेतकरी आणि लोकप्रतिनिधी करत आहेत. (Marathwada Heavy Rain loss of agriculture and Crop in Marathwada all districts)

औरंगाबाद जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी

औरंगाबाद जिल्ह्यातही काल मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील बानोटी, वरठाण, घोसला परिसराला पावसानं झोडपलं आहे. अनेक ठिकानी नदी, नाल्याला पूर आल्याचं चित्र आहे. सुदैवानं जीवितहानीची एकही बातमी अद्याप समोर आलेली नाही. बानोटी परिसरात नदीचं पाणी गावातील रस्त्यांवर आणि अनेक घरात घुसल्याचं चित्र सकाळी पाहायला मिळालं. दरम्यान, औरंगाबाद शहरातही मुसळधार पाऊस बरसला. औरंगाबाद महापालिका परिसरात असलेली झाडंही उन्मळून पडली आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस

उस्मानाबाद जिल्ह्यातही सर्वदूर मुसळधार पाऊस झाला. उस्मानाबाद आणि कळंब तालुक्यात अवघ्या काही तासांत 100 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्यामुळे मांजरा आणि तेरणा धरणाचे सर्व दरवाजे उघडण्यात आले आहेत. लोकांनी नदी आणि धरणाच्या पाण्यात उतरु नये असं आवाहन जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केलंय. उस्मानाबाद तालुक्यातील तेर गाव पूर्णपणे पाण्यात बुडाले आहे. तेरणा धरणाचं पाणी शिरल्यानं गावात सर्वत्र 3 फूट पाणी साचलंय. तेर ग्रामीण रुग्णालयातही पाणी शिरल्यानं रुग्णांचे मोठे हाल झाले. तेर ग्रामीण रुग्णालय, तसंच कळंब तालुक्यातील वाकडेवाडी आणि सौंदना गावात 27 जण अडकले होते. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं त्यांची सुखरुप सुटका केलीय. उस्मानाबाद जिल्ह्यात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्यानं सोयाबीन पिकासह शेती अक्षरश: खरवडून गेली आहे. त्यामुळे बळीराजावर मोठ्या संकटात सापडला आहे.

हिंगोली जिल्ह्यातील पावसाची स्थिती

हिंगोली जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं आहे. नदी नाले आणि ओढ्यांना पूर आलाय. हिंगोली शगरातील बावन्न खोली, रेल्वे फाटक पूल परिसरात रस्त्यावरुन पाणी वाहत आहेत. तर वसमत, औंढा, कळमनुरी, सेनगाव तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय. वसमत तालुक्यातील टेंभुर्णी, केन्होळा गावात पाणी शिरलं. अनेक घरात पाणी शिरल्यानं संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं आहे. अनेक घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील कयाधू नदी धोका पातळीवरुन वाहत आहे. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पैनगंगा नदीत्या पात्रात इसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असल्यानं पैनगंगा नदीला पूर आलाय. जिल्ह्यात सततच्या पावसानं पिकांचं मोठं नुकसान झालंय. सोयाबीनच्या उभ्या पिकाला जागेवरच अंकुर फुटू लागले आहेत. (Marathwada Heavy Rain loss of agriculture and Crop in Marathwada all districts)

लातूरमध्ये हजारो एकर शेती पाण्याखाली

लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. मांजरा धरणाचे सर्व 18 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मांजरा, तेरणा नदी काठची शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. नदीकाठच्या शेतात पाणी शिरल्यानं हजारो एकर सोयाबीन पिकाचं नुकसान झालं आहे. शेतात पाणी साचल्यानं उभं पीक सडू लागलं आहे. मांजरा नदीकाठच्या गावांतील शेतकरी शेतात अडकून पडले आहेत. त्यात सारसा आणि जेवळी गावातील 25, घनसरगावमधील 2, वागंदरीतील 2 शेतकरी अडकून पडली आहेत. त्यांना सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन विभागाची मदत घेतली जात आहे. नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून शेतकऱ्यांनी आज शेतावर जाऊ नये किंवा नदी पात्रात उतरू नये असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय.

दुसरीकडे तेरणा प्रकल्पातूनही पाण्याचा मोठा विसर्ग नदीपात्रात सोडण्यात येत आहे. त्यामुळे निलंगा तालुक्यातल्या औराद-शहाजनी भागातील अनेक गावाच्या शेतात पाणी शिरलं आहे. तर औसा तालुक्यातल्या उजनी गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं आहे.

बीड जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला

बीड जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस झालाय. केज, माजलगाव, गेवराई, परळी तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. अंबाजोगाई तालुक्यातील आपेगावसह चार गावं पाण्यात गेली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यात अडकून पडले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफला पाचारण करण्यात आलं. सोमवारी मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसानं परळी तालुक्यालाही झोडपून काढलं आहे. नागापूरमधील वाण नदीला पूर अलाय. त्यामुळे परळी-बीड मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी शिरलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे.

जालना जिल्ह्यात शेतीचं मोठं नुकसान

जालना जिल्ह्यातही पावसाचा कहर सुरुच आहे. अंबड, मंठासह सर्वच तालुक्यात पावसानं शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. अंबड तालुक्यातील बडीगोद्री मंडळात 133 मिमी पावसाची नोंद झालीय. करंजळा येथे गल्हाटी नदीचं पाणी गावात शिरलं आहे. त्यामुळे अनेक घरांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी 5 ते 7 दिवसांत पंचनामे पूर्ण केले जावेत अशा सूचना दिल्या आहेत. कालच्या पावसात पिकाचं प्रचंड नुकसान झालं आहे. ढगफुटी झाली त्या ठिकाणी प्रत्यक्ष पंचनामे टाळून सरसकट पंचनामे गृहीत धरावे लागतील, असं राजेश टोपे म्हणाले.

परभणी जिल्ह्यात सर्वदूर मुसळधार पाऊस

परभणी जिल्ह्यात सलग सातव्या दिवशीही सर्वदूर पावसाने हजेरी लावली. मागील आठवड्यात सुरू झालेला पाऊस अद्याप थांबण्याचं नाव घेत नाही. त्यामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. जिल्ह्यात सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. परभणी शहर परिसरात दिवसभर पावसाची रिमझिम सुरु होती. त्यानंतर संध्याकाळी मोठा पाऊस झाला. त्याचप्रमाणे सोनपेठ, मानवत, पालम, परभणी तालुक्यातील अनेक गावांना पावसानं झोडपून काढलं आहे. विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या या पावसाने शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.

नांदेड जिल्ह्यातील 6 तालुक्यात अतिवृष्टी

नांदेड जिल्ह्यातील सहा तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झालीय. अर्धापुर तालुक्यात रात्रीतून 130 मिलीमीटर पावसाची नोंद झालीय. त्यामुळे आसना नदी काठोकाठ भरून वाहतेय. तर परभणी जिल्ह्यातील पावसाने गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झालीय. त्यामुळे गोदावरी नदीवरचे अनेक छोटे पूल पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अर्धापूरसह कंधार, धर्माबाद, उमरी, हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यात शंभर मिलीमीटर पेक्षा अधिकच्या पावसाची नोंद झालीय. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक ओढ्या नाल्याला पहाटेच्या सुमारास पूरस्थिती निर्माण झाली होती.

इतर बातम्या :

‘जयंत पाटील आले, पण एकाही शेतकऱ्याच्या बांधावर गेले नाहीत’, शेती नुकसानाच्या पाहणीवेळी पंकजा मुंडेंची टीका

PHOTO: मराठवाड्यात पावसाचे थैमान, पूराचे पाणी गावात शिरले, पिकंही वाहून गेली, दोरखंडाला धरून जीवघेणा प्रवास

Marathwada Heavy Rain loss of agriculture and Crop in Marathwada all districts

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.