माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात

| Updated on: Mar 15, 2022 | 2:21 PM

माथाडी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज माथाडी कामगार आझाद मैदानात एकवटले आहेत. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात धरणे आंदोलने करण्यात आली.

माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू, नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात
नरेंद्र पाटलांच्या नेतृत्वात शेकडो माथाडी कामगार आझाद मैदानात
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: माथाडी कामगारांच्या (mathadi kamgar) विविध मागण्यांसाठी आज माथाडी कामगार आझाद मैदानात एकवटले आहेत. माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील (narendra patil)यांच्या नेतृत्वाखाली आज आझाद मैदानात धरणे आंदोलने करण्यात आली. यावेळी माथाडी कामगारांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करा, नाही तर रस्त्यावर उतरून आंदोलन करू. या आंदोलनात आमदारही सहभागी होतील, असा इशारा नरेंद्र पाटील यांनी दिला आहे. माथाडी कामगारांच्या महाराष्ट्र शासनाच्या (maharashtra government)कामगार, गृह, पणन व सहकार आणि अन्य खात्याअंतर्गत असलेल्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्याकडे महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने ही निदर्शने आज केली. या आंदोलनात मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, लातूर, सातारा, कोल्हापूर व अन्य जिल्ह्यातील व्यवसायात काम करणारे हजारो प्रमुख कार्यकर्ते सहभागी झाले होते.

राज्यातील आघाडी सरकारमधील संबंधित खात्यांच्या मंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. त्यांना या प्रश्नांचं गांभीर्य आणि माथाडी कामगारांची स्थितीही समजावून सांगितली आहे. तसेच तातडीने माथाडी कामगारांचे प्रश्न तडीस नेण्याची मागणीही केली आहे. या न्याय प्रश्नांची सोडवणुक करण्याकडे संबंधितांनी लक्ष दिलेले नाही, त्यामुळे तमाम माथाडी कामगारांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे. त्यामुळेच कामगारांना आझाद मैदानात धरणे आंदोलन व आमरण उपोषण करणे भाग पडत असल्याचे माथाडी कामगार नेते माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी म्हटले आहे.

अनेक बैठका झाल्या, पण निर्णय नाही

वर्षानुवर्षे या प्रश्नांची निवेदने सरकारकडे सादर केली आहेत. या संदर्भात अनेक बैठका झाल्या. परंतु प्रलंबित प्रश्नांची सरकारने सोडवणूक केलेली नाही. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला आझाद मैदान येथे धरणे आंदोलन करावे लागत आहे, असंही पाटील यांनी सांगितलं. या धरणे व उपोषण आंदोलनात युनियनचे कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप, अध्यक्ष एकनाथ सखाराम जाधव, संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत पाटील, रविकांत पाटील, दिलीप खोंड, जनसंपर्क अधिकारी पोपटराव देशमुख उपाध्यक्ष सूर्यकांत पाटील इतर पदाधिकारी आदी उपस्थित होते.

माथाडींच्या मागण्या काय?

  1. विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे
    माथाडी मंडळात पुर्णवेळ चेअरमन/सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे
  2. विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे
  3. बाजार समितीच्या अनुज्ञाप्तीधारक मापाडी/तोलणार कामगारांना बाजार समितीच्या सेवेत घेणे
  4. कृषि उत्पन्न बाजार समित्यांचे आवार व अन्य ठिकाणी मालाचे वजन 50 किलो ठेवण्याबद्दलची अंमलबजावणी होणे
  5. शासनाने कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात येणाऱ्या फळे, भाजीपाला व कांदा-बटाटा मालावरील नियमन काढण्याचा5 जुलै, 2016 चा शासन अध्यादेश रद्द होणे
  6. नाशिक जिल्ह्यातील माथाडी/मापारी-तोलणार कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणुक होणे
  7. माथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतुद करणे व माथाडी कामगारांवर गुंडगिरी करणाऱ्यांचा पोलीस यंत्रणेमार्फत बंदोबस्त करण्यासाठी समिती गठीत करणे
  8. वर्क ऑडर्रच्या नांवाखाली माथाडी कामगारांची हक्काची कामे बळकावणाऱ्या व कामगारांवर गुंडगिरी करणाऱ्याचा बंदोबस्त करणे
  9. पिंपरी, पुणे येथिल मे. टाटा मोटर्स लिमिटेड कंपनीकडील व अन्य माथाडी कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे
  10. गुलटेकडी मार्केट, पुणे येथिल कामगारांच्या टोळी पध्दतीच्या निर्णयाची अंमलबजावणी होणे
  11. कळंबोली स्टील यार्ड व विविध रेल्वे यार्डातील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे
  12. कोल्हापूर रेल्वे यार्डातील कामगारांचे प्रश्न
  13. ग्रेन डेपो- शिवडी येथील कामगारांच्या प्रश्नांची सोडवणुक होणे

संबंधित बातम्या:

Maharashtra News Live Update : ठाकरे सरकार कोडगं सरकार – देवेंद्र फडणवीस

मोदींची सत्ता आल्यापासून किती खासदार आणि आमदार काँग्रेसला सोडून गेले; कपिल सिब्बल यांनी सांगितला नेमका आकडा

tv9 Special : जे शिवराजसिंह चौहान सरकारनं केलं ते ठाकरे सरकार करणार का? कोरोना काळातलं वीज बिल सरसकट माफ