Aaditya Thackeray:बंडखोर आमदारांना परतीसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे खुले आहेत, माफ करु, आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना आवाहन
बंडखोर आमदारांना अजूनही शिवसेनेची दारे खुली आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, अशा आशयाचे सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
मुंबई- एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारांना जर परतयाचे असेल तर अजूनबी मातोश्रीचे (Matoshree)दरवाजे खुले आहेत, अस वक्तव्य शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केले आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेच्या बांधणीसाठी आता पुन्हा मैदानात उतरले आहेत. निष्ठा यात्रेच्या निमित्ताने ते राज्यभरात दौरे करीत आहेत. याच यात्रेच्या निमित्ताने आज ते दहीसर भागात आले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी बंडखोर आमदारांना अजूनही शिवसेनेची दारे खुली आहेत, त्यांनी मातोश्रीवर यावे असे आवाहन केले आहे. शिवसैनिक नेहमीच मातोश्रीवर येतात, त्यांना परतायचे आहे, त्यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray)भेट घ्यावी, त्यांना माफ करण्यात येईल, अशा आशयाचे सूचक वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
ठाकरे मैदानातच आहेत -आदित्य
शिवसैनिकांचे प्रेम घ्यायला आलो आहे. ठाकरे नेहमीच मैदानात होते. ज्यांच्यावर प्रेम टाकले, ज्या साथीदार, सोबत्यांवर जबाबदाऱ्या टाकल्या, त्यांनी पाठीत खंजीर खुपसल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. ज्यांना तिथे राहायचे असले, त्यांनी हिंमत असेल तर निवनडणुकांना सामोरे जावे, असे आव्हानही आदित्य यांनी दिले आहे. मन, ह्रद्य जोडणं जे आहे ते शिवसैनिकांसोबत आहे. ज्यांची निष्ठा उद्धव ठाकरेंवर आहे ते मातोश्रीवर येतात, त्यांना माफ केलं जाईल. असं वक्तव्यही आदित्य ठाकरे यांनी केले आहे. ज्यांना परत यायचं आहे, त्यांनी मातोश्रीवर आहे, आनंदच होईल असे आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.
उद्धव ठाकरेंनीही यापूर्वी केले होते आवाहन
जेव्हापासून हे बंड झाले तेव्हापासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही दोन ते तीन वेळा या बंडखोर आमदारांनी परतावे, असे आवाहन केले होते. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतानाची, बंडखोर आमदारांनी मातोश्रीवर येऊन चर्चा करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे गट फुटीरतावादी समजत नसून शिवसेनेत असल्याचेच सांगत आहेत. शिवसेना-भाजपाचे सरकार असाच उल्लेख शिंदे आणि भाजपाकडूनही करण्यात येतो आहे. त्यामुळे आता आगामी काळात शिवसेनेत पुन्हा मनोमीलन होणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.
शिवसेनेच्या खासदारांचाही तहासाठी दबाव
शिवसेनेच्या १८ खासदारांपैकी अनेक जण हे एकनाथ शिंदे यांच्या सपर्कात असल्याचे सांगण्यात येते आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएच्या उमेदवार द्रोपदी मर्मू यांना मतदान करावे, असा दबाव शिवसेना खासदरांकडून पक्ष नेतृत्वावर टाकण्यात येतो आहे. राहुल शेवाळे यांनी याबाबतचे पत्रही उद्धव ठाकरेंना लिहिले आहे. केंद्रात सत्तेत संधी मिळावी आणि आगामी निवडणुका लक्षात घेता खासदार हे शिंदे गटासोबत जाण्यास अनुकुल असल्याचे सांगण्यात येते आहे. त्यामुळे काहीखासदार, वरिष्ठ नेते हे पुन्हा मनोमीलन होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगण्यात येते आहे. आता आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना केलेल्या आवाहानामुळे आता पुढे काय होणार याकडे सगळ्यांचे लक्ष असेल.