कधी अजित पवारांचे कट्टर समर्थक, आता महाविकास आघाडीचे उमेदवार, अजितदादा भेटताच घेतले आशीर्वाद

मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.

कधी अजित पवारांचे कट्टर समर्थक, आता महाविकास आघाडीचे उमेदवार, अजितदादा भेटताच घेतले आशीर्वाद
ajit pawar
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 11:35 AM

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. उमेदवार एकमेकांच्या विरोधात प्रचार करत आहेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. कधीकाळी एकत्र असलेले लोक एकमेकांच्या विरोधात आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील कधीकाळी अजित पवार यांचे कट्टर समर्थक होते. राष्ट्रवादीच्या बंडानंतर ते अजित पवार यांच्यासोबत राहिले. परंतु लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांना मावळमधून उमेदवारी महाविकास आघाडीने दिली. आता त्यांना राष्ट्रवादीचे आधीचे नेते अन् उपमुख्यमंत्री अजित पवार एका समारंभात भेटले. त्यावेळी त्यांना नमस्कार करून त्यांनी आशीर्वाद घेतले.

लग्न समारंभात भेट

अजित पवार आणि संजोग वाघेरे पाटील हे काल पिंपरी विधानसभा क्षेत्राचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या जेष्ठ कन्येच्या विवाह सोहळ्यास आले होते. अजित पवार लग्न समारंभात आल्याच्या अगदी काही मिनिटांनी संजोग वाघेरे पाटील हे देखील वधू-वरास आशीर्वाद देण्यासाठी व्यासपीठावर आले. त्यावेळी संजोग वाघेरे पाटील यांना अजित पवार व्यासपीठावर उभे दिसताच त्यांनी अजित पवार यांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला आहे.

कधीकाळी होते कट्टर समर्थक

मावळ लोकसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे काही महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे खंदे समर्थक होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जय महाराष्ट्र करत शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश केला होता, आता महिन्यांपूर्वीचे खंदे समर्थक तसेच 2024 चे महाविकास आघाडीचे मावळ लोकसभा मतदार संघातील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आपल्या पूर्वीच्या नेत्याला निवडणुकेपूर्वी नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतला आहे.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांनी संजोग वाघेरे यांच्या पाटील यांच्यासोबत लग्न समारंभात एकत्र जेवण केले. परंतु त्यांच्याशी प्रत्यक्ष बोलणं टाळले. या भेटीवर संजोग पाटील म्हणाले, महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती आहे. महाराष्ट्रातील खेळी – मेळीच राजकीय संस्कृती जपण्यासाठी मी अजित पवार यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेतला. यात वावगं काही नाही.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.