Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एमबीए शिकलेला तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य; गावात घडवलं सत्तांतर

यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नवे बदल पाहायला मिळाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले दिसून आलं आहे. (mba student won gram panchayat election in maharashtra)

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एमबीए शिकलेला तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य; गावात घडवलं सत्तांतर
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 12:12 PM

रायगड: यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक नवे बदल पाहायला मिळाले आहेत. यंदाच्या निवडणुकीत तरुण मोठ्या प्रमाणावर निवडून आलेले दिसून आलं आहे. रायगडमधील एका ग्रामपंचायतीत तर एमबीए झालेल्या आणि एका बड्या कंपनीत मॅनेजर असलेल्या तरुणाने बाजी मारली आहे. या ग्रामपंचायतीत उच्च शिक्षित तरुणांनी सत्तांतर घडवून आणलं आहे. त्यामुळे तरुणांची आणि सुशिक्षितांची ग्रामपंचायत म्हणून या ग्रामपंचायतीकडे पाहिलं जात आहे. (mba student won gram panchayat election in maharashtra)

रायगड जिल्ह्यातील कर्जतमधील लक्षवेधी ठरलेल्या पोशीर ग्रुप ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना-शेकाप प्रणित परिवर्तन पॅनलने बाजी मारली आहे. निवडणुकीच्या मैदानात पहिल्यांदाच उतरलेल्या उच्चशिक्षित तरुणांनी गावात सत्तांतर घडवून आणलंय. अनिल जोशी हा एमबीए शिकलेला आणि एका बड्या कंपनीत मॅनेजर असलेला तरुण मोठ्या मताधिक्यानं निवडून आला आहे. गावाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध असल्याचं निवडून आलेल्या सदस्यांनी म्हटलं आहे.

वार्ड क्रमांक 2 मधून काका -पुतण्या पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. अनिल जोशी विरूद्घ तुकाराम जोशी ही लढत प्रतिष्ठेची होती. या अटीतटीच्या निवडणुकीत काकावर पुतण्या वरचढ ठरला. अनिल जोशी यांना 575 मते तर तुकाराम जोशी यांना 371 मते मिळाली. संपूर्ण पंचक्रोशीचं लक्ष लागलेल्या या निवडणुकीत अनिल जोशी यांनी 204 मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला. दोघेही सरपंचपदाचे उमेदवार होते. या निवडणुकीत एकूण 11 जागांपैकी 6 जागा या शेकाप-शिवसेना प्रणित परिवर्तन विकास पॅनलला मिळाल्या आहेत. त्यामुळे पोशीर ग्रामपंचायतीची सत्ता खऱ्या अर्थाने तरुणांकडे आली आहे. (mba student won gram panchayat election in maharashtra)

संबंधित बातम्या:

भाजपने 6 हजारपेक्षा अधिक ग्रामपंचायती जिंकल्या; केशव उपाध्ये यांचा दावा

धनंजय मुंडेंवरील संकट दूर होवो, नगरसेवकाचं दोन किलोमीटरपर्यंत दंडवत

कोल्हापूरकरांचा नाद करायचाच नाही; माजी सरपंचाच्या पत्नीला धूळ चारुन साफसफाई करणाऱ्या आजीबाईंचा विजय

(mba student won gram panchayat election in maharashtra)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.