हाताखाली 30-40 कामगार, आता नोकरी गेली, मेकॅनिकल इंजिनियर इडलीवाला बनला, छोट्या सुरुवातीने मोठी तयारी

कोरोना महामारीमुळे देशावर मोठं संकट आलं (Mechanical engineer started own business during lockdown) आहे.

हाताखाली 30-40 कामगार, आता नोकरी गेली, मेकॅनिकल इंजिनियर इडलीवाला बनला, छोट्या सुरुवातीने मोठी तयारी
Follow us
| Updated on: Jun 25, 2020 | 2:28 PM

चंद्रपूर : कोरोना महामारीमुळे देशावर मोठं संकट आलं (Mechanical engineer started own business during lockdown) आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. या लॉकडाऊन दरम्यान अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. यामध्ये चंद्रपूरच्या पलाश जैन या अभियंत्याचीही नोकरी गेली. नोकरी गेल्यामुळे पलाश निराश न होता त्याने चक्क इडली विक्रीचा व्यवसाय सुरु केला आहे. त्याची ही उमेद इतरांसाठी रोल मॉडेल ठरत (Mechanical engineer started own business during lockdown) आहे.

चंद्रपुरातील तुकूम परिसरातील पलाश जैन याने नाशिक विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर तो औरगांबाद येथे एका मोठ्या कंपनीत सुपरवायझर म्हणून कामाला लागला. त्याच्या हाताखाली तीस ते चाळीस कामगार होते. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र हा आनंद जेमतेम आठ महिनेच पुरला. कारण जगासोबत देशातही कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे बंदी लागण्यापूर्वीच कंपनीतील 300 जणांना काढण्याची तयारी सुरू होती. यात पलाशही होता. मात्र त्यापूर्वीचे त्याने राजीनामा देत आपले घर गाठले. तब्बल दोन महिने तो घरीच बसून होता.

घरी बसून राहिल्याने काही दिवस तोही नैराश्यात होता. परंतु लवकरच पलाशने स्वत:ला सावरले. कोरोनामुळे अनेक जणांनी रोजगार गमावल्याने त्यांनी भाजीपाला विकण्याचा व्यवसाय सुरू केला. तुकुम येथील एसटी वर्कशॉप समोर अशा अनेकांनी आपले दुकाने मांडले. हे सर्व पलाश बघत होता, त्यांना बघून त्यालाही नवी दिशा मिळाली. दिवसभर हे विक्रेते येथे राबत असत मात्र त्यांच्या खाण्याची कुठलीही सुविधा नव्हती. कारण सर्व उपहारगृह आणि नाश्त्याचे दुकानं बंद होती. ही संधी पलाशने हेरली आणि त्याने घरी बनवलेली इडली पार्सल विकणे सुरू केले. ते ही अवघ्या 20 रुपयांत पाच इडल्या देत आहे.

नाशिक, पूणे, औरंगाबाद भागात तो वास्तव्याला होता. सकाळी गर्दीच्या ठिकाणी जावून नाश्ता विकणाऱ्यांची पद्धत तिकडे रूढ आहे. हीच पद्धत त्याने चंद्रपुरात सुरू केली. सुरवातीचे चार दिवस प्रतिसाद न मिळाल्याने केलेल्या इडल्या कुटुंबीयांनाच खाव्या लागल्या. मात्र त्याने हार मानली नाही. पहाटे तीन वाजता उठून इडली तयार करायची आणि सकाळी सहा वाजता भावासोबत ग्राहकांच्या शोधात निघायचे. हीच त्याच्यासाठी सुवर्णसंधी ठरली. त्याला आता बऱ्यापैकी प्रतिसाद मिळत आहे.

पलाश स्वच्छतेकडे कटाक्षाने लक्ष देत आहे. आता तो रूग्णालय, छोटे व्यावसायिक यांना इडली विकत आहे. कुटुंबाला काही हातभार लागावा, यासाठी हा व्यवसाय सुरू केला आहे. यात तो ‘खूश’ नाही मात्र ‘समाधानी’ आहे. कोरोनाने आपल्याला जगण्याचा नवा दृष्टिकोन दिला आहे. नोकरी गमावलेल्या अभियंता पलाशची ही सुरुवात छोटी वाटत असली तरी भावी उद्योजकाची बीजे याच कृतीत दडली असतात असे दाखले आपल्या इतिहासात अनेक आहेत. त्यामुळे पलाशची ही भरारी नैराश्याने ग्रासलेल्या अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

कोरोनामुळे जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला पूर्णपणे बदलावा लागणार आहे. बड्या कंपन्यांत मोठ्या हुद्यावर काम करणाऱ्यांना कधी आपल्यावर बेरोजगारीची पाळी येणार हे स्वप्नातही वाटलं नसेल. यातील अनेकांना नैराश्याने ग्रासले आहे. यामुळे काहींनी मृत्यूला देखील कवटाळले. पण काहींनी हे नैराश्य झटकून नव्या उमेदीने नव्या जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. पलाशची जिद्द परिस्थितीसमोर हताश झालेल्या हजारो युवकांना नवी उमेद देणारी ठरणार आहे.

संबंधित बातम्या : 

कोरोनामुळे नोकरी गेली, 4-6 लाख कमावणाऱ्या पायलटवर डिलिव्हरी बॉय होण्याची नामुष्की

Corona Effect | देशातील आर्थिक विकास दर शून्याखाली जाण्याचा अंदाज, अनेकांच्या नोकऱ्या धोक्यात

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.