Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक

पैशांचे आमिष दाखवून भोजपुरी सिनेमात काम करणाऱ्या तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी उद्युक्त केलं जात होतं. (Bhojpuri Film Actress Sex Racket)

भोजपुरी सिनेमातील तरुणींना वेश्या व्यवसायात ढकललं, मीरा रोडमध्ये दोघांना अटक
मीरा भाईंदर परिसरात सेक्स रॅकेटमधील पाच तरुणींची सुटका
Follow us
| Updated on: Jul 12, 2021 | 10:45 AM

मीरा भाईंदर : भोजपुरी चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये मॉडेलिंग करणाऱ्या तरुणींकडे काम नसल्याचा गैरफायदा घेत त्यांना देहव्यापारात ढकलणाऱ्या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईजवळच्या मीरा रोडमध्ये आणलेल्या दोन आरोपीला पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्या पथकाने गजाआड केले आणि पाच पीडित तरुणींची सुटका केली. (Meera Bhainder Bhojpuri Film Actress Sex Racket busted)

मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय परिमंडळ 1 चे डीसीपी अमित काळे यांनी ही कारवाई केली. लॉकडाऊनच्या काळात भोजपुरी सिनेमा किंवा वेब सीरिजमध्ये काम करणाऱ्या तरुणींकडे काम नसल्याचा फायदा घेत त्यांना पैशाचं आमिष दाखवणारे काही दलाल सक्रिय झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पैशांचे आमिष दाखवून तरुणींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी उद्युक्त केलं जात होतं.

पोलिसांनी बोगस ग्राहक तयार करुन आरोपींकडे तरुणींची मागणी केली. आरोपी पाच जणींना घेऊन मीरा रोडच्या एसके स्टोनजवळ एका लॉजमध्ये आले. यावेळी डीसीपी अमित काळे यांच्या पथकांनी सापळा रचून दोघां आरोपींना रंगेहाथ पकडलं. पिटा कायद्या अंतर्गत गुन्हा नोंद करुन आरोपींना गजाआड केले. तसेच पाच पीडित मुलींची सुटका केला.

सांगलीत सेक्स रॅकेटमध्ये पोलीस निरीक्षकच अटकेत

सांगली जिल्ह्यातील आटपाडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकालाच काही महिन्यांपूर्वी बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. सांगली शहराजवळील कर्नाळ रोड येथील हॉटेल रणवीरमध्ये सुरु असलेला हाय प्रोफाइल वेश्या व्यवसायाचा अड्डा उद्ध्वस्त करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षकासह 6 जणांना अटक करण्यात आली होती, तर दोन पीडित तरुणींची सुटका करण्यात आली होती.

मुंबईत इव्हेंट मॅनेजरसह तिघांना अटक

मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेकडून काही महिन्यांपूर्वी दोन कास्टिंग डायरेक्टरसह एका इव्हेंट मॅनेजरला अटक करण्यात आली होती. 14 वर्षांच्या मुलीला मॉडेलिंगचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप दोघांवर होता. अंधेरी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

लॉकडाऊनमध्ये डान्सबारवर कारवाई

लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या डान्स बारवर मुंबई पोलिसांनी ऑक्टोबर महिन्यात धाड टाकली होती. त्यावेळी 15 ग्राहकांसह 20 जणांना अटक करण्यात आली होती. गोरेगाव पोलिसांनी धडक कारवाई करत बारमधील तळ घरातून 11 तरुणींची सुटकाही केली होती.

संबंधित बातम्या :

मॉडेलिंगचे अमिष दाखवून 14 वर्षीय मुलगी वेश्या व्यवसायात आणल्याचा आरोप

लॉकडाऊनमध्ये रात्री उशिरापर्यंत डान्सबार सुरु, पोलिसांचा छापा, तळघरातून 11 मुलींची सुटका

(Meera Bhainder Bhojpuri Film Actress Sex Racket busted)

हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला
हिंदूंच्या मंगळसूत्राचं रक्षण कोण करणार? उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला.
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला
'त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ला माहीत नाही', ठाकरेंचा भिडेंना टोला.
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'
शाहरुखच्या बंगल्याचा रंजक इतिहास; व्हिला व्हिएनावरून असा बनला 'मन्नत'.
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं
'सुरेश धसांची दाढी अचानक पांढरी झाली...', अंजली दमानियांनी डिवचलं.
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
'सौगात ए मोदी'वरून उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका.
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे
विधानभवन परिसरात उद्धव ठाकरे म्हणाले, 'हरामखोर आहेत ते...',रोख कोणाकडे.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पठ्ठ्या थेट विहिरीत उतरला.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतरही धंगेकरांना काँग्रेसचा 'पंजा' काही सुटेना.
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका
उद्धव ठाकरेंनी त्यांना सगळं दिलं, राऊतांची टीका.
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार
'ते' गाणं ट्वीट करून आमच्या व्यथा...; कामराचे मनसे नेत्याकडून आभार.