Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AJIT PAWAR : माझा त्या प्रकरणाशी संबध नाही, काय करायचं ते करा; अजित पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला,

मी कुठेही नव्हतो. बैठकीलाही नव्हतो. मी आढावा घेताना सांगण्यात आलं होत की गृहविभागाचा फायदा होताना हे करू दिलं नाही. दोन्ही सांगलीकर गृहमंत्री होते. माझ्या विभागाच्या बदल्या करण्याचा मला अधिकार आहे.

AJIT PAWAR : माझा त्या प्रकरणाशी संबध नाही, काय करायचं ते करा; अजित पवार यांनी संपूर्ण घटनाक्रम सांगितला,
AJIT PAWAR AND MEERA BORWANKARImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Oct 17, 2023 | 4:33 PM

मुंबई :  पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात येरवडा येथील जमिनीचे प्रकरण लिहिलं आहे. या प्रकरणात एका मंत्र्याने दबाब आणला असे त्या म्हणाल्या आहेत. यामुळे तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्यावर आरोप होत आहेत. यावर अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपला त्या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही असे स्पष्ट केले. ‘आपलं काम भलं असं मी पुढे जात असतो. माझ्याबद्दल इलेट्रीनिक मिडीयात आणि पेपरमध्ये बातम्या आल्या. त्या प्रकरणाशी माझा काही संबंध नाही. 1999 ते 2000 साली मी सरकारमध्ये होतो तेव्हा पालकंमत्री होतो. विकासाचे प्रकल्प मार्गी लागावे ही माझी भूमिका असते.’, असे अजित पवार म्हणाले.

रिटयर्ड आयपीएस आँफीसर यांनी जे पुस्तक लिहिले. त्यामुळे अजित पवार अडचणीत येणार अशा बातम्या चालल्या. अजित पवारांनी काहीही केलेलं नाही. माजी विभागीय आयुक्त दिलीप बंड यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे असे ते म्हणाले. तसेच त्यांनी तत्कालीन सरकारच्या आदेशाचे वाचन केलं. कामं रखडू नये म्हणून आढावा घेतला जातो. पुण्यातील ही जागा सध्या महाराष्ट्र शासनाचा अख्यातरीत आहे असेही ते म्हणाले.

प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या

त्या प्रकरणाची मी सर्व कागदपत्र पुन्हा पाहिली. 21 फेब्रुवारीचं ते पत्र होतं. त्या भूखंडाशी माझा कुठलाही संबंध नाही. पुण्यातील भूखंडासंदर्भात आर. आर. पाटलांनी निर्णय घेतला असं मला सांगितलं. पोलिस आयुक्तांना मी बोलावलं विचारलं त्यांनी नाही म्हटल. मी द्यायचं नाही तर नका देवू असे त्यांना सांगितले. कोणत्याही अधिका-याशी, आयएएस आधिकारी यांच्या मी व्यवस्थितपणे बोलत असतो. अनेक वर्षे माझ्याकडे सेल्स टँक्स डीमार्टमेंट होतं. प्रसिद्धीसाठी काही खळबळजनक गोष्टी लिहिल्या असतील. असे पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

विश्वस्त म्हणून आम्ही काम करत असतो

लगेच चौकशी करा असं विरोधी पक्षाचं म्हणण आहे. पण, कुठल्याही ठिकाणी माझी सही नाही. कुठल्याही बैठकीला मी उपस्थिती नाही. आर आर पाटलांनी सांगितलं की तुम्ही लक्ष घालू नका. माझा काहीही संबंध नाही. आर. आर. पाटील यांना असं करा तसं करा हे मी सांगितलं नाही. मेट्रोच्या मोक्याच्या जागा पोलिस खात्याच्या पाँलिटेक्विनकीची जागा दिलेल्या आहेत. कुठल्याही जागा देताना पारदर्शकता असावी. या जनतेच्या जागा आहेत आणि जनतेचा पैसा आहे. विश्वस्त म्हणून आम्ही काम करत असतो, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

माहिती झाकून राहणारी नाही

चौकशी कुणाची करता जागा कुठेही गेलेलीचं नाही. रिकाँर्डला जावून पाहणी केली आहे. आपल्याला वेडीवाकडी कुठलीही काम करायची नाहीत. भूखंडाबद्दल मी विचारपूस केली हे कबूल केलं. कुठलीही माहिती झाकून राहणारी नाही. अजित पवारांचा यात काहीही संबंध नाही. मी समिती नेमलेली नाही, असे प्रत्युत्तर त्यांनी नाना पटोले यांना दिले.

पूर्व परवानगी घ्यावी लागते

बदलीसाठी अधिका-यांची समिती असते. त्यांनी विरोध केला म्हणून जागा दिली नाही. पोलिस आयुक्त मिरा बोरवणकरांची या प्रकल्पाला मान्यता नव्हती असं शासकीय इतिवृत्त होतं. कंपनीसोबत जागा निर्गमित करता येत नाही असं सांगितलं आणि ते शासनावर बंधनकारक नाही असे त्यात म्हटलं आहे. त्यावेळी जयंत पाटील गृहमंत्री होते. हा अजिबात योगायोग नाही आहे.  जागा आहे तिथेच आहे. आयएएस आणि आयपीएस लिखाण करायचं असेल तर पूर्व परवानगी घ्यावी लागते असं मला एकानं सांगितलं, असेही अजित पवार म्हणाले.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.