Eknath Shinde: ‘मविआ’ च्या तीन वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निघणार का तोडगा? मुंबईत वर्षावर होणार खलबते
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूकंपानंतर सर्वच पक्षांना आपल्या आमदाराचा कानोसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांपासून वरिष्ठ नेते हे आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषत: शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत बैठका पार पडत आहेत. यामध्ये नाराज आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले जात आहे.
मुंबई : (Eknath Shinde)एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूकंपानंतर आता राज्याच्या आणि देशाच्या राजधानीमध्येच बैठकांचा सिलसिला आहे अंस नाही तर सुरतमध्ये महाराष्ट्रातील राजकारणाचा धुरळा उडत आहे. मंगळवारी सकाळपासून मुंबईत शिवसेना, कॉंग्रेस पक्षाच्या विविध बैठका पार पडत आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर बैठक बोलावली होती. दुसरीकडे देशाच्या राजधानीत भाजपाचे अध्यक्ष जे.पी.लड्डा आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये देखील बैठक झाली आहे. आता (Politics) राजकीय घडामोडच अशी घडली आहे की बैठका घेण्याला देखील वेळ पूरा पडणार नाही. पण सर्वात महत्वाची बैठक ही मंगळवारी रात्री मुंबई येथे पार पडणार आहे. यामध्ये (C.M) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कॉंग्रेसचे बाळासाहेब थोरात हे सहभागी होणार आहेत. त्यामुळे दिवसभर कितीही बैठका झाल्या तरी महाविकास आघाडीचे भवितव्य या तीन पक्षांच्या बैठकीनंतरच समोर येणार आहे. यासाठी राष्ट्रवादीचे शरद पवार हे दिल्लीतून मुंबईकडे रवाना होणार आहेत.
बैठकीनंतर ठरणार पक्षांची भूमिका
महाविकास आघाडी स्थापनेमध्ये खा. शरद पवार यांची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. त्यामुळे सध्याच्या नाजूक परस्थितीमध्येही शरद पवार हे तोडगा काढतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. सध्या प्रमुख पक्ष हे आपआपल्या आमदार आणि नेत्यांशी चर्चा करीत असले तरी पक्षांचे प्रमुख यासंदर्भात आढावा घेऊन मंगळवारी रात्री बैठक पार पडणार आहे. सध्या मात्र, शिवसेना गोठ्यात बैठकांचा सिलसिला सुरु आहे. मुंबईत वर्षा निवासस्थानावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे बैठका घेऊन सर्वांचे म्हणणे ऐकूण घेत आहेत. मात्र, अंतिम निर्णय हा तीन पक्षांच्या नेत्यांमध्येच होणार आहे.
पक्षांतर्गत बैठका मग मविआचा निर्णय
एकनाथ शिंदे यांच्या राजकीय भूकंपानंतर सर्वच पक्षांना आपल्या आमदाराचा कानोसा घ्यावा लागत आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षांपासून वरिष्ठ नेते हे आमदारांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करीत आहेत. विशेषत: शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत बैठका पार पडत आहेत. यामध्ये नाराज आमदारांचे म्हणणे ऐकूण घेतले जात आहे. तर त्यावरच पक्ष आपली पुढील रणनिती ठरविणार आहे.
मविआच्या बैठकीला कुणाची उपस्थिती..
राज्यात राजकीय घडामोडी मोठ्या वेगाने घडत असून जो-तो आमदारांचे म्हणणे ऐकूण घेण्यात व्यस्त आहे. मात्र, एकनाथ शिंदे आणि नाराज आमदारांच्या गोठात काय घडतंय यावर मविआच्या नेत्यांचे लक्ष आहे. त्यानुसारच मंगळवारी रात्री मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉंग्रेसते बाळासाहेब थोरात यांच्यात बैठक पार पडणार आहे. वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी ही बैठक होणार आहे.