Marathi News Maharashtra Meetings, breaking news of disturbances and three days ... you will all die like this .. what did Indurikar Maharaj say about political drama in a special style
Indurikar Maharaj: बैठक, खलबतींची ब्रेकिंग न्यूज आणि तीन दिवस जनता बधीर… तुम्ही सगळे असेच मरणार.. राजकीय नाट्याबाबत काय म्हणाले खास शैलीत इंदूरीकर महाराज
त्यांनी तुम्हाला विचारलं तरी का, असा सवाल इंदूरीकर महाराजांनी केला आहे. तुम्ही फक्त त्यांचे बोर्डं लावा, सतरंज्या झटका आणि असेच राहा, या शब्दांत त्यांनी किर्तनातून सामान्य जनतेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. तीन दिवस झाले राज्यात कुणालाच सुधरत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.
Indurikar MaharajImage Credit source: social media
मुंबई – राज्यात सध्या सुरु असलेल्या सत्तानाट्यावर (power game)सोशल मीडियावरुन आणि मिम्सद्वारे चांगलीच टीका आणि विनोद होत आहेत. त्यातच आता प्रसिद्ध किर्तनकार इंदूरीकर महाराज (Indurikar Maharaj)यांनी त्यांच्या शैलीत, राजकारण आणि राजकारण्यांचे चांगलेच वाभाडे काढलेले आहेत. खुर्चीच्या लोभापायी विरोधकही एकत्र आले आहेत, त्यांनी तुम्हाला विचारलं तरी का, असा सवाल इंदूरीकर महाराजांनी केला आहे. तुम्ही फक्त त्यांचे बोर्डं लावा, सतरंज्या झटका आणि असेच राहा, या शब्दांत त्यांनी किर्तनातून सामान्य जनतेचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे. तीन दिवस झाले राज्यात कुणालाच सुधरत नसल्याची टीका त्यांनी केली आहे. चाळीसगावमध्ये झालेल्या किर्तनात त्यांनी सद्यस्थितीवर परखड भाष्य केलं आहे. राज्यसभा, विधानपरिषद (MLC election)डणुकीत निवडून आलेल्या आमदारांना मतदान कसे करावे, हे शिकवावे लागते, त्यासाठी तीन तीनदा बैठका घ्याव्या लागतात, यावरही त्यांच्या खास शैलीत इंदूरीकर महाराज यांनी चिमटा काढला आहे.
तीन दिवस झाले कुणालाच राज्यात काही सुधरत नाही, अशी टीका त्यांनी त्यांनी किर्तनात केली आहे. टीव्हीचे बटन दाबले की ऐकू येते ब्रेकिंग न्यूज, आणि बैठक सुरू.. खलबतं सुरु.. तुम्ही सगळे असेच मरणार.. असं त्यांच्या खास शैलीत वक्तव्य इंदूरीकर महाराज यांनी केलं आहे. .
तुम्हाला कुणी विचारलं तरी का
खुर्चीच्या लोभासाठी विरोधकही एकत्र आलेत, तुम्हाला विचारलं का त्यांनी, आम्ही एकत्र येतोय असं? असा सवाल त्यांनी जनतेला केला आहे. त्यांच्याकडून शिका, कुणी म्हणेल का त्यांना विरोध? तुम्ही फक्त त्यांचे बोर्ड लावा सतरंज्या झटका आणि मरा.. असे वक्तव्यही इंदुरीकर महाराजांनी केले.
कुणाला आमदार म्हणायचे तेच कळत नाही
आज जे चाललंय ते पंचांगने सांगितले होते का, कुणाला आमदार म्हणावे हेच कळत नाही, जनतेचा भरडा होतोय सध्याची फक्त एकच ब्रेकिंग न्यूज असते ‘मीटिंग सुरू’, खलबत सरु, लोकंच बधीर झाली आहेत, असं ते म्हणाले.
राज्यसभा, विधानपरिषदेचं मतदान शिकवावं लागतं
शिकून काय करणार, ज्यांच्याकडे तालुके आहे, जे आमदार आहेत, त्यांना शिकवावं लागतं, मतदान कसं करायचं ते. त्यांची तीन- तीन वेळा बैठक घ्यावी लागते. ‘झाकली मूठ सव्वा लाखाची आंधळे दळत आणि कुत्रं पीठ खातं’ असा टोला कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी सर्वच आमदारांना लगावला.