ST Strike कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न; आमदार पडळकर-खोतांचा दावा
कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी आहेत. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.
मुंबईः एसटी संपावर अजूनही तोडगा निघालेला नाही. सरकारकडून खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत. कोर्टाच्या कमिटीतले सदस्य विलीनीकरणविरोधी आहेत. सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा दावा रविवारी भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार सदाभाऊ खोत यांनी केला.
एसटीचे विलीनीकरण आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सुरू झालेला संप अजूनही सुरूच आहे. यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, परिवहन मंत्री आणि प्रशासन यांच्या सोबत दोन वेळा चर्चा झाली. मात्र, एसटीच्या विलीनीकरता अजून तरी तोडगा निघालेला नाही. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, ही हात जोडून विनंती आहे. लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा, अशी मागणी त्यांनी केली. आज मंत्रालयावर सुद्धा अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून आत्मदहनाचा प्रयत्न केला. अनेक कर्मचारी हे त्रस्त झाले आहेत. ते टोकाचं पाऊल उचलत आहेत. माझे सरकारला आवाहन आहे की या संपाचा मधला काहीतरी तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
आमदार सदाभाऊ खोत म्हणाले की, काल सुद्धा प्रशासनासोबत चर्चा झाली. मात्र, विलीनीकरणाच्या मुद्द्यावर कोणताच तोडगा सरकारने काढलेला नाही. कोर्टाने जी कमिटी गठित केलेली आहे तिच्यात ज्यांना एसटीचं विलीनीकरण करायचं नाही, तेच सदस्य आहेत. त्यामुळे ही कमिटी मान्य नसल्याचे त्यांनी सांगितले. सोबतच आज बालदिन आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या लहान लेकरांसोबत आज आझाद मैदान येथे आम्ही बालदिन करणार आहोत. उद्या कार्तिकी एकादशी आहे. जो एसटी कर्मचारी गेले साठ वर्ष विठुरायाची सेवा करतोय त्यावर ही संपाची वेळ आली आहे. मंगळवारी सर्व एसटी डेपोमध्ये आणि आझाद मैदानावर देखील काळे झेंडे घेऊन आम्ही निदर्शने करणार आहोत. सरकारने लवकरात लवकर या आंदोलनावर आणि संपावर तोडगा काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
एसटीच्या विलीनीकरता अजून तरी तोडगा निघालेला नाही. सरकारने कर्मचाऱ्यांचा अंत पाहू नये, ही हात जोडून विनंती आहे. लवकरात लवकर या संपावर तोडगा काढावा. – गोपीचंद पडळकर, आमदार
कोर्टाने जी कमिटी गठित केलेली आहे, ती कमिटी खरी तर एसटी कर्मचाऱ्यांना मान्य नाही. कारण ज्यांना हे विलीनीकरण करायचं नाही. तेच सदस्य या कमिटीमध्ये आहेत. – सदाभाऊ खोत, आमदार
(Members of the court committee opposed the merger, trying to suppress the movement; MLA Khot-Padalkar’s claim)
इतर बातम्याः
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही काय पवार साहेबांची प्रॉपर्टी नाही, चंद्रकांत पाटील यांचे खोचक वक्तव्य
Rajkumar Rao | सेम ड्रेस, फिलिंगही सेम, राजकुमार पत्रलेखाचं अनोखं प्रेम, गुडघ्यावर बसून प्रपोज, पाहा रोमँटिक Videohttps://t.co/dy4nuntZtR#Bollywood| #Patralekha| #rajkumarrao | #weddingdate
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 14, 2021