Wedding Ceremony: झाडाच्या छायेत लेकीची माया… नवरदेवाचे सासरेबुवांना अनोखे ‘रिटर्न गिफ्ट’

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना तो केवळ वऱ्हाडी मंडळीकडूनच अपेक्षित न ठेवता स्वत: नवरदेव मुलाने आपल्या सासऱ्याला 31 वेगवेगळी अशी फळझाडे देऊ केली होती. एवढेच नाही तर मी तुमची मुलगी घेऊन जातो. तुम्ही तिच्या नावाने फळझाडे लावा. फळझाडे वाढतील तसा आमचा संसारही फुलेल अशी भावनिक सादही त्यांनी घातली.

Wedding Ceremony: झाडाच्या छायेत लेकीची माया... नवरदेवाचे सासरेबुवांना अनोखे 'रिटर्न गिफ्ट'
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 1:02 PM

मुंबई :  (Wedding Ceremony) लग्न-समारंभ म्हणले की, अमाप खर्च करीत ढोल-ताशा आणि नवरदेवासमोर नाचगाणे असाच काय तो देखावा आपल्यासमोर येतो. कवित्री इंद्रजित भालेराव यांच्या मुलाच्या लग्नाची गोष्ट सध्या पंचक्रोशीत चर्चेत आहे. (Environmental conservation) पर्यावरण संवर्धनासाठी झपाटलेला माणूस काय करु शकतो याचा प्रत्यय कवित्री प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुलाच्या लग्न समारंभात आला आहे. या लग्न सोहळ्यात आहेर स्वीकारला गेला पण तो फळ झाडांचा. मुलाचा विवाह हा पर्यावरणपूरक व्हावा हीच भालेराव यांची इच्छा होती. अखेर त्यांनी हा मानस पूर्ण करीत आहेराऐवजी आंबा, जांभूळ, लिंबोणी, संत्री, जांब अशी  (fruit trees) फळझाडांची देवाण-घेवाण करण्यात आली. सबंध लग्नसोहळ्यात पर्यावरण संवर्धनाचे धडे देण्यात आले होते.

नवरदेवाकडून सासऱ्यांना 31 फळझाडे

पर्यावरण संवर्धनाचा संदेश देताना तो केवळ वऱ्हाडी मंडळीकडूनच अपेक्षित न ठेवता स्वत: नवरदेव मुलाने आपल्या सासऱ्याला 31 वेगवेगळी अशी फळझाडे देऊ केली होती. एवढेच नाही तर मी तुमची मुलगी घेऊन जातो. तुम्ही तिच्या नावाने फळझाडे लावा. फळझाडे वाढतील तसा आमचा संसारही फुलेल अशी भावनिक सादही त्यांनी घातली. ज्येष्ठ कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांच्या मुलाचा चंद्रगुप्त भालेराव यांचा विवाह सोहळा पार पडला आहे.

कवितांमधूनही मांडले शेतकऱ्यांचे दुख

प्रा. इंद्रजित भालेराव यांनी आपल्या कवितांमधून कायम शेतकऱ्यांचे दु:ख मांडलेले आहे. गेल्या 40 वर्षापासून ते शेती, माती शेतकऱ्यांचे दु:ख यावर कविता करीत आहेत. त्यांच्या मुलाने लग्नात राबवलेला उपक्रम त्यांच्या कार्याशी संलग्न असाच होता. शेतकऱ्यांना शाश्वत शेती विकास करायचा असेल तर झाडां शिवाय पर्याय नाही. गेल्या 5 वर्षापासून पर्यावरणपूरक लग्ने या अभियानाच्या माध्यमातून लावली जात आहेत.

हे सुद्धा वाचा

लग्नसोहळ्याची आठवण करुन देणारा उपक्रम

काळाच्या ओघातही काहीजणांचा लग्नसोहळा हा आठवणीतून जात नाही. दरम्यान, त्या प्रसंगाची कल्पना आणि समाजभिमूख उपक्रम राबवण्याचे कसब हे टिकवून ठेवावेच लागणार आहे. भालेराव कुंटुंबियांनी असा उपक्रम नांदेड येथे पार पडला असू तो प्रत्येकाच्या स्मरणात राहणार आहे. अत्यंत साध्या पध्दताने आणि निसर्गाच्या सानिध्यात हा विवाह सोहळा पार पडला आहे. विशेष म्हणजे केवळ झाडेच नाही उत्पन्न वाढीसाठी फळझाडे ही महत्वाची आहेत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.