Rain Update: राज्यात दोन दिवस पावसाचे, या भागांमध्ये मुसळधार बरसणार

IMD Update: अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Rain Update: राज्यात दोन दिवस पावसाचे, या भागांमध्ये मुसळधार बरसणार
लोणावळ्यात निर्माण झालेली धुक्याची चादर
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 8:40 AM

राज्यात जून महिन्यात काहीशी विश्रांती घेतलेला पाऊस जुलै महिन्यात सक्रीय झाला आहे. राज्यात पुढील दोन दिवस जोरदार पाऊस बसरणार आहे, असा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केला आहे. पुढचे दोन दिवस विदर्भ, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणामध्ये सर्वाधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्ती केली आहे. राज्यातील काही भागांत ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी आणि नांदेड मध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे.

का कोसळणार मुसळधार

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे कोकण, गोवा कर्नाटकासह किनारपट्टीवर जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक भागांत गुरुवारी मध्यरात्रीपासून पाऊस सुरु आहे. वसई, विरार नालासोपाऱ्यात सकाळपासून दमदार पावसाची हजेरी सुरु आहे. मुंबईत आज दिवसभर पाऊस पडण्याची शक्यता आहे.

लोणावळ्यात मुसळधार पाऊस

लोणावळ्यात आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. इंद्रायणी नदीवरील कोल्हापूर बंधारे वाहू लागले आहेत. पिंपरी-चिंचवड आणि पुणेकरांना जवळपास असलेलं कुंडमळा येथील धबधबे पर्यटकांना आकर्षित करू लागलेत. मावळात सतत पडत असणाऱ्या पावसाने येथील बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागले असून याचा आनंद पर्यटक घेऊ लागलेत.

हे सुद्धा वाचा

लोणावळ्यात धुक्याची चादर

मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने लोणावळ्यात सध्या धुक्याची चादर पसरली आहे. घाट माथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुके यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झाला आहे. यामुळे स्वर्ग धर्तीवर अवतरलाच्या चं चित्र पर्यटकांना अनुभवायला मिळत आहे, निसर्गाची ही किमया लोणावळ्यातील टायगर पॉइंटवर पर्यटक घेत आहेत. तर दुसरीकडे वाहनचालकाना गाडी चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. या आल्हाददायक वातावरणाचा आनंद नागरिकांना मिळत आहे. वर्षाविहारासाठी पर्यटन नगरीत सध्या देशभरातील पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागले आहेत. येथील प्रसिध्द चिक्कीवर ताव मारत पर्यटकांची पाऊले टायगर पॉईंटकडे वळू लागलीत.

लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.