धाकधुकीनंतर अखेर ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला, मिलिंद नार्वेकर यांचा विजय

ठाकरे गटाचे नेते आणि उद्धव ठाकरे यांचे सर्वात विश्वासू मिलिंद नार्वेकर यांचा दणदणीत विजय मिळवला आहे. २३ मतांचा कोटा नसताना ही त्यांचा विजय झाला आहे. नार्वेकर यांचे सर्वच पक्षामध्ये नेत्यांसोबत चांगले संबंध आहेत. याचा फायदा त्यांना झालाय.

धाकधुकीनंतर अखेर ठाकरेंच्या शिलेदाराचा निकाला लागला, मिलिंद नार्वेकर यांचा विजय
Follow us
| Updated on: Jul 12, 2024 | 7:41 PM

Milind Narvekar : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदार पार पडलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून मिलिंद नार्वेकर निवडणुकीच्या रिंगणात होते. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांचे स्वीय सचिव आहेत. मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरे यांच्या जवळचे मानले जातात. त्यामुळे ठाकरे गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची होती. उद्धव ठाकरे यांचे विश्वासू असलेले नार्वेकर यांना 23 मते मिळाली आहेत. त्यांना विजयासाठी एका मताची गरज होती. अखेर दुसऱ्या पंसतीच्या मतांमध्ये त्यांचा विजय झाला आहे. आजपर्यंत ते पडद्यामागे राहून काम करत आले आहेत. पहिल्यांदाच ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 11 जागांसाठी 12 जण निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणूक चुरशीची झाली होती.

विधानपरिषद निवडणुकीच्या मतदानाआधी शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं होते. बारावा खेळाडू मिलिंद नार्वेकर यांना कमजोर समजू नका, असं संजय शिरसाट यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना म्हटलं होतं.

मिलिंद नार्वेकर यांनी विधान परिषद निवडणुकीच्या वेळी प्रतिज्ञापत्रातून त्यांची संपत्ती उघड केली आहे. दहावी पास असलेल्या नार्वेकर यांच्याकडे कोट्यावधींची संपत्ती आहे.

नार्वेकर यांच्यावर एकही गुन्हा दाखल नाहीये. याशिवाय त्यांच्याकडे 74 लाख 13 हजार रुपये बँकेच्या खात्यात जमा आहेत. पत्नीच्या खात्यात 8 कोटी 22 लाख 118 रुपये आहेत. बॉण्ड्स किंवा म्युचअल फंडात 50 हजार रुपये आहेत. इतर पॉलिसीमधील गुंतवणूक ही 3 लाख 68 हजार 729 रुपये इतकी आहे. पत्नीची गुंतवणूक 67 लाख 88 हजार 558 रुपये आहे. त्यांच्यावर वैयक्तिक कर्ज 26 लाख 38 हजार 160 रुपये इतके आहे. तर पत्नीवर 3 कोटी 22 लाख 45 हजार रुपये इतके कर्ज आहे. त्यांच्यावर 1 कोटी 54 लाख 81 हजार 989 रुपये इतके बँकेचे लोन आहे. त्यांच्याकडे एकही गाडी नाहीये.

71 लाख 28 हजार 189 रुपयांचे दागिने त्यांच्याकडे आहेत. तर पत्नीकडे 67 लाख 61 हजार 420 रुपये इतके दागिने आहेत. रत्नागिरीत मुरुडमध्ये त्यांच्याकडे 74.80 एकर जमीन आहे. मालाड आणि बोरिवलीमध्ये 1000 स्क्वेअर फुटांचं घर आहे. अलिबागमध्ये पत्नीच्या नावावर फार्महाऊस आहे. तर वैयक्तिक पगार, घराचं भाडं, व्यावसायिक मिळकत, विविध कंपन्यांच्या शेअर्स यातून ते कमाई करतात.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.