“शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या दूध संघांवर कारवाई करा”, राज्यभरातील 21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन

लॉकडाऊन काळात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाला पाडून दर देत लुटमार करणाऱ्या दुध संघांवर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये आज (17 जून) आंदोलन झालं.

शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या दूध संघांवर कारवाई करा, राज्यभरातील 21 जिल्ह्यांमध्ये आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 4:29 AM

मुंबई : लॉकडाऊन काळात परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांच्या दुधाला पाडून दर देत लुटमार करणाऱ्या दूध संघांवर कारवाई करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमध्ये आज (17 जून) आंदोलन झालं. अखिल भारतीय किसान सभा व दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे आंदोलन झालं. याला राज्यभरात चांगला प्रतिसाद मिळाला. राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये तहसील कार्यालयांवर मोर्चे काढून व निवेदने देऊन दूध व इतर शेतकरी प्रश्नांसाठी हे आंदोलन करण्यात आले (Milk farmers protest in 21 districts of Maharashtra against low rate in lockdown).

दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीने म्हटलं, “लॉकडाऊनच्या काळात मागणी घटल्याचा बाऊ करत ज्या खाजगी व सहकारी दूध संघांनी, दूध खरेदीचे दर पाडले त्या सर्व दूध संघांचे ऑडिट करा, प्रत्यक्षात दुधाची मागणी किती घटली होती व त्याप्रमाणात किती दर कमी देण्यात आले याबाबत सखोल चौकशी करा व परिस्थितीचा गैरफायदा घेऊन शेतकऱ्यांची लूटमार करणाऱ्या खाजगी व सहकारी दूध संघांवर कठोर कारवाई करा, केलेली लूटमार वसूल करून ती शेतकऱ्यांना परत करा.”

शेतकऱ्यांच्या मागण्या काय?

लॉकडाऊनपूर्वी मिळत असलेला प्रति लिटर 35 रुपये दर तातडीने सुरू करा. आगामी काळात दूध उत्पादकांची लूटमार करता येणार नाही यासाठी खाजगी व सहकारी दूध संघांना लागू होईल असा लूटमार विरोधी कायदा करा. साखर व्यवसायाप्रमाणे दूध व्यवसायाला किमान आधारभावासाठी एफ.आर.पी. व शिल्लक मिळकतीत हक्काच्या वाट्यासाठी रेव्हेन्यू शेअरींग असे कायदेशीर दुहेरी संरक्षण लागू करा. अनिष्ट ब्रँड वॉर रोखण्यासाठी एक राज्य एक ब्रँड धोरण स्वीकारा. दूध भेसळी बंद करा. टोंन्ड दुधावर बंदी आणा. भेसळ विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी करून ग्राहकांना शुद्ध दूध रास्त दरात उपलब्ध होईल याची कायदेशीर हमी द्या, या प्रमुख मागण्या यावेळी करण्यात आल्या.

राज्यात कोठेकोठे आंदोलन?

अहमदनगर, सांगली, कोल्हापूर, पुणे, नाशिक, ठाणे, बीड, वर्धा, यवतमाळ, बुलढाणा, सोलापूर, नांदेड, औरंगाबादसह राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन संपन्न झाले.

अहमदनगर जिल्ह्यतील अकोले तालुक्याचे अंबड, व कोतुळ येथे परिसरातील शेतकऱ्यांनी दूध संकलन केंद्रावर तीव्र निदशने करत सरकारला दुधाचा अभिषेक घातला. दुपारी अकोले तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. खरीप हंगामाच्या दृष्टीने खते, बियाणे, कर्ज, वीज व विमा याबद्दलच्या प्रश्नानांही यावेळी वाचा फोडणीत आली. डॉ. अशोक ढवळे, किसन गुजर, जे.पी. गावीत, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ. अजित नवले यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.

हेही वाचा :

दूध दर व शेतकरी प्रश्नांसाठी 17 जूनला राज्यव्यापी आंदोलन

“दूध दर पाडणाऱ्या दूध कंपन्यांचे ऑडिट करून शेतकऱ्यांची लूट थांबवा”, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची मागणी

म्हैस दोनदा दूध देते, संध्याकाळीही दुकानात दूध विक्री करु द्या, कृपाशंकर सिंग यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

व्हिडीओ पाहा :

Milk farmers protest in 21 districts of Maharashtra against low rate in lockdown

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.