महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी कोणता पक्ष इच्छुक? राज्यातील ‘त्या’ नेत्यानं दिलेली खुली ऑफर काय?

वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीचा एक प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटासोबत युती केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीत आणखी एका पक्षाने सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी कोणता पक्ष इच्छुक? राज्यातील 'त्या' नेत्यानं दिलेली खुली ऑफर काय?
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 3:17 PM

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : एकीकडे महाविकास आघाडी सरकारमध्ये कधीही बिघाडी होईल असा दावा केला जात असतांना दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये एमआयएम पक्षाने सहभागी होण्यासाठी जाहीर केले आहे. औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी याबाबत औरंगाबादमध्ये जाहीर केले आहे. एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडीला खुली ऑफरच देऊन टाकली आहे. एमआयएम पार्टी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी करायला तयार आहे. भाजपला रोखायची महाविकास आघाडीची इच्छा असेल तर आम्ही सोबत निवडणुका लढवायला तयार आहोत असेही इम्तियाज जलील यांनी म्हंटले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या शिवसेनेच्या युतीनंतर एमआयएमची महाविकास आघाडीला ही ऑफर दिल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. महाराष्ट्र एमआयएमचे प्रदेश अध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी हे जाहीर केल्यानंतर महाविकास आघाडीची भूमिका महत्वाची असणार आहे.

राज्यात 2019 नंतर तीनदा अनोख्या आघाडी झाल्याचे बघायला मिळाले आहे. सुरुवातील भाजप आणि अजित पवार, त्यानंतर शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी आणि आता विद्यमान सरकार असलेले शिंदे गट आणि भाजप असा प्रवास आहे.

त्यातच आता मध्यांतरी संभाजीब्रिगेड सोबत उद्धव ठाकरे यांनी युती केली आहे. त्यानंतर आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने युती केली आहे.

हे सुद्धा वाचा

विशेष म्हणजे शिवसेना ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे. त्या महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीचा समावेश नाहीये, त्यातच एमआयएमने वंचितच्या भूमिकेनंतर महत्वाची भूमिका घेतली आहे.

एमआयएमने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत जाण्याची इच्छा औरंगाबादमध्ये बोलून दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमची युती 2019 ला होती. त्यातून वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटासोबत गेली आहे.

त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमनेही कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जलील यांनी दिलेली खुली ऑफर आता चर्चेचा विषय ठरणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.