चहा प्यायल्यानंतर कप फोडला, डोळ्यात पाणी येत होतं, बच्चू कडूंनी अनुभवलेले कोरोनाचे 3 दिवस

महाराष्ट्राचे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांचा काही दिवसांपूर्वी घसा खवखवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संशय आला.

चहा प्यायल्यानंतर कप फोडला, डोळ्यात पाणी येत होतं, बच्चू कडूंनी अनुभवलेले कोरोनाचे 3 दिवस
Follow us
| Updated on: Mar 31, 2020 | 6:37 PM

अमरावती : महाराष्ट्राचे सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग राज्यमंत्री बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांचा काही दिवसांपूर्वी घसा खवखवत होता. त्यामुळे त्यांना कोरोनाचा संशय आला. त्यांची तातडीने रक्त तपासणी करण्यात आली. त्यांचा पहिला रिपोर्ट संशयास्पद आला. मात्र, दुसरा रिपोर्ट निगेटीव्ह आला. दरम्यान, पहिला रिपोर्ट संशयास्पद आल्यानंतर बच्चू कडू (Minister Bacchu Kadu) यांच्या मनाची प्रचंड घालमेल झाली. त्यांनी ही घालमेल फेसबुकवर शेअर केली आहे.

बच्चू कडू यांच्या घशात काही दिवसांपूर्वी खवखवत होते. त्यांनंतर त्यांना खोकलाही येऊ लागला. त्यांना कोरोनाचा संशय आला. आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांनी डॉक्टरांना सांगितलं. बच्चू कडू यांनी त्यांनी सांगितलेली औषधं घेतली. मात्र, तरीही बच्चू कडू यांना कोरोनाचा संशय वाटत होता. अखेर त्यांची रक्त तपासणी करण्यात आली. मात्र, पहिल्या रक्त तपासणीत बच्चू कडू यांचा रिपोर्ट काही संशयास्पद आल्याचं डॉक्टरानी सांगितलं. त्यानंतर बच्चू कडू यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतलं. यावेळी त्यांच्या मनात प्रचंड विचार येत होते. याबाबत त्यांनी फेसबुकवर सांगितलं आहे.

बच्चू कडू काय म्हणाले?

“27 मार्च रोजी मी कुरळपूर्णा येथे होतो. पत्नी नियना यांना डॉक्टरांचा फोन आला आणि रिपोर्ट थोडा संशयास्पद आहे, असं सांगितलं. मी विचारलं तर बॉन्ड्रीवर आहे, असे सांगितल. मी समजून गेलो, काहीतरी प्रोब्लेम आहे. 29 तारखेपर्यंत पुन्हा तपासणी करावी लागणार होती. तोपर्यंत आयसोलेट राहावं लागणार होतं.

मग माझा बेड, ताट वेगळा, अशी मोहिम पत्नी नयना यांनी सुरु केली. दुरुन वाढणे. मला वेगळ्या कपात चहा आणला. चहा पिल्यानंतर मी तो कप धुतला. धुतल्यानंतर म्हटलं हा कप पुन्हा कोणी वापरायला नको. म्हणून थोडा फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पूर्ण फुटला.

मी एका दिवसात खूप काही विचार करत होतो. माझा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला तर… मी कोणाकोणाच्या संपर्कात आलो. माझ्यामुळे किती वाईट होईल. ते व्हायला नको. पत्नी नयनाची तब्येत नाजूक आहे. तिला झालं तर कसं होईल. सारखे असे विचार येत होते. देवा लहान आहे. दोन पुतण्या आणि विक्रमची लहान मुलगी, डोकं काम करत नव्हतं. डोळ्यात पाणी येत होतं. माझ्यामुळे परिवाराला काही वाईट होऊ नये. लोकांचं आणि कार्यकर्त्यांचं वाईट होऊ नये. असे विचार येत होते”, अशी घालमेल बच्चू कडू यांनी फेसबुकवर मांडली.

नियम पाळा, कोरोना टाळा, बच्चू कडूंचे आवाहन

दरम्यान, बच्चू कडू यांना त्यांच्या पत्नी आणि मुलाने घरातच राहायला सांगितले होते. मात्र, घरात त्यांच्या मनात प्रचंड विचारचक्र फिरत होते. आपल्यामुळे किती जणांना कोरोनाची लागण होईल? असे विविध विचार त्यांच्या मनात येत होते. अखेर दोन दिवसांनी त्यांची दुसरी चाचणी करण्यात आली. दुसऱ्या चाचणीत त्यांचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आणि बच्चू कडूंनी सुटकेचा श्वास सोडला. बच्चू कडू यांनी राज्यातील सर्व नागरिकांना सरकारच्या सर्व सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केलं. नियम पाळा, कोरोना टाळा, असं बच्चू कडू आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.

संबंधित बातम्या :

Corona : नवी मुंबईत 10 जणांपर्यंत कसा पोहोचला कोरोना?

खासगी रुग्णालयातील कोरोना विभागात वावर, नालासोपाऱ्यात 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.