ओबीसी समाजाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचे धक्कादायक विधान, ‘कर्मकांड करणारे…’

सर्वत्र अंधश्रद्धेचा बाजार झाला आहे. पानसरे गेले, दाभोळकर यामुळे गेले. बागेश्वर महाराज यांच्या कार्यक्रमाला 5 लाख लोक असतात. श्याम मानव यासारखी अंधश्रद्धा विरोधी लढणारी लोक आज हवीत असे भुजबळ म्हणाले.

ओबीसी समाजाबद्दल मंत्री छगन भुजबळ यांचे धक्कादायक विधान, 'कर्मकांड करणारे...'
MINISTER CHAGAN BHUJBAL Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Sep 24, 2023 | 8:37 PM

नाशिक : 24 सप्टेंबर 2023 | मराठा आरक्षणावरून राज्यात ठिकठिकाणी आंदोलन झाले. ओबीसी आरक्षणात मराठा जातीचा समावेश करून हे आरक्षण देण्यात यावे अशी मराठा समाजाची मागणी आहे. तर, ओबीसी आरक्षणात मराठा समाजाला घेण्यास ओबीसी संघटनानी विरोध केला. दोन्ही समाजाचे आंदोलन सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यावर मार्ग काढण्याची तयारी करत आहेत. मात्र, राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी समाजाबद्दल मोठे धक्कादायक विधान केलय. मी काही बोललो तर माझ्यावर टीका करण्यात आली. फोनवर शिव्या यायला लागल्या. पण, आपण आजही अजून त्यातच गुरफटून गेलो आहोत असेही ते म्हणाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की हिंदू धर्म चांगला आहे. मात्र, खालच्या लोकांना वर येण्यासाठी शिडी नाही. त्यामुळे बाबासाहेबांनी बुद्ध धर्म स्वीकारला. 1893 ला पहिली दंगल घडली. त्यावेळी त्यांनी जत्रा भरवली. जत्रेमध्ये सांगितलं, जत्रेमध्ये आनंद घेताना जात, धर्म बघता का? महात्मा फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे काम थांबले नाही. सगळी लोक एकत्र झाली त्यानंतर चळवळ मोठी झाली, असे ते म्हणाले.

काम थांबवता येत नाही.

‘जे जे सरकार आता करत ते सगळं महात्मा फुले यांनी आधीच सांगितलं होतं. पाणी अडवा, धरण बांधा. शेतकऱ्यांना हमी भाव द्या असे महात्मा फुले यांनी सांगितले होते. महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिणारे कमी लोक आणि कमी लेखक आहेत. बाबासाहेब यांनीही सत्तेत सामील व्हा हे सांगितलं. त्यांनी संविधान लिहिलं. त्यानंतर आपल्याला न्याय मिळाला. मला किती शिव्या येतात. कधी कधी असं वाटतं की मोबाईल बघूच नये. पण, काम थांबवता येत नाही.’

हे सुद्धा वाचा

वाटेकरी करण्यापेक्षा वेगळं आरक्षण द्या

‘ओबीसीमध्ये वाटेकरी करण्यापेक्षा वेगळं आरक्षण द्या. तसे देता येते यात काय अडचण आहे? पण, काही लोक बोलतात की ओबीसीमधून आरक्षण द्या. आता असे झालं तर आपल्याला आरक्षण मिळणार नाही. याला विरोध केला पाहिजे. थंड बसून चालणार नाही. मी मुख्यमंत्री यांना सांगितले की तुम्ही तयार आहात. पण, एका समाजासाठी असे करू नका. राजासाठी सगळे समान असतात.’

obc समाज कर्मकांड करणारे

‘दलित समाज कर्मकांडामधून बाहेर पडले. ब्राह्मण समाजाला तर जास्त माहित आहे आणि ते तेच करतात. मात्र, obc समाजामध्ये कर्मकांड करणारे जास्त आहेत. मी काही बोललो तर माझ्यावर टीका करण्यात आली. फोनवर शिव्या यायला लागल्या. पण, आपण आजही अजून त्यातच गुरफटून गेलो आहोत, असे भुजबळ म्हणाले.

धागे जळून गेले. सर्व नवरे मुक्त…

बायका सात जन्मी हाच पती मिळावा म्हणून वडाच्या झाडाची पुजा करतात. पण, नवऱ्याला ही विचारा की तुम्हाला ही सात जन्म हीच हवी काय? एका ठिकाणी पाहिलं की वडाच्या झाडाला फेऱ्या मारत होती. त्यावेळी त्या झाडाला आग लागली आणि ते धागे जळून गेले. सर्व नवरे मुक्त झाले अशी टिपण्णी त्यांनी केली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.