धनंजय मुंडे थेट रुग्णालयातून महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित, नेमकी चर्चा काय?

धनंजय मुंडे यांच्यावर गेल्याच आठवड्यात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली. यानंतर अनेक दिग्गज नेत्यांनी त्यांची भेट घेत विचारपूस केली. धनंजय मुंडे यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. विशेष म्हणजे रुग्णालयात दाखल असताना धनंजय मुंडे यांनी आज एका बैठकीला ऑनलाईन उपस्थिती लावली.

धनंजय मुंडे थेट रुग्णालयातून महत्त्वाच्या बैठकीस उपस्थित, नेमकी चर्चा काय?
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Jul 31, 2024 | 9:31 PM

राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. असं असताना धनंजय मुंडे यांनी थेट रुग्णालयातून महत्त्वाच्या बैठकीला उपस्थिती लावली आहे. धनंजय मुंडे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबंधित बैठकीला उपस्थित होते. बीड शहराची पाणी पुरवठा योजना मागील काही वर्षांपासून थकीत वीज बिलासह काही कारणांनी अपूर्ण आहे. ती पूर्ण केली जावी यासाठी किमान 30 टक्के वीज बिल भरले जावे आणि अन्य निर्णय घेण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत एक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी या बैठकीत दिली.

बीड नगर परिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वाच्या अनुषंगाने पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरविकास विभाग, महावितरण, जिल्हा आणि नगर परिषद प्रशासन यांची एकत्रित बैठक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. विशेष म्हणजे गेल्याच आठवड्यात पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाल्याने रुग्णालयात उपचार घेत असलेले धनंजय मुंडे हे सदर पाणी पुरवठा योजना अत्यंत महत्वाकांक्षी असल्याने थेट रुग्णालयातून या बैठकीस उपस्थित होते.

बीड शहराची ही पाणी पुरवठा योजना 2017-18 पासून प्रस्तावित असून सुमारे 90-95 टक्के काम पूर्ण झाले आहे. 6 टाक्यांची उभारणी, पाईप लाईनचे वितरण, काही प्रमाणात पाईपलाईन जोडणी अशी कामे पूर्ण झाली आहेत. मात्र नगर परिषद प्रशासनाकडे महावितरणची असलेली सुमारे 19.50 कोटी रुपये थकबाकी हा कामातील मोठा अडसर आहे. या संदर्भात शासकीय नियमानुसार नगर परिषद प्रशासनाने एकूण थकबाकीच्या किमान 30 टक्के रक्कम भरणे अनिवार्य आहे, असे मत महावितरणने व्यक्त केले.

पालकमंत्र्यांकडून महत्त्वाची माहिती

सदर 30 टक्के रक्कम कर्ज स्वरूपात किंवा हमी स्वरूपात किंवा विशेष बाब करून कोणत्या माध्यमातून मिळवून यावर कायमचा तोडगा काढता येईल, यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत शक्य तितक्या लवकर एक बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती यावेळी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली. दरम्यान, सदर रक्कम भरण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने स्थानिक आमदार-खासदार, लोकप्रतिनिधी यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून काही रक्कम भरावी असे सुचवले आहे.

बीड शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा पाणी पुरवठा प्रश्न सोडवण्यासाठी उच्च न्यायालयाने सुचवल्याप्रमाणे बीडचे स्थानिक आमदार आणि नवनिर्वाचित खासदार आपल्या स्थानिक विकास निधीतून नगर परिषद थकबाकी भरण्यासाठी काही निधी देण्याचे औदार्य दाखवतील का? असा प्रश्न ज्येष्ठ नगरसेवक फारुख पटेल आणि अमर नाईकवाडे यांनी उपस्थित केला आहे.

या बैठकीसाठी धनंजय मुंडे यांच्यासह नगर विकास खात्याचे प्रधान सचिव गोविंदराज, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कार्यकारी संचालक प्रकाश भागवत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता महेश पाटील, बीड जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, महावितरणचे मुख्य अभियंता कातकडे, अधीक्षक अभियंता राजपूत, ज्येष्ठ नेते वाल्मिक अण्णा कराड, नगरसेवक फारुख पटेल, अमर नाईकवाडे यांसह आदी उपस्थित होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.