धनुभाऊ, कृपा करून एवढं मनावर घ्या… आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही!

राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या मतदारसंघात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच त्यांना बीडमध्ये धनुभाऊ या नावाने हाक मारतात. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

धनुभाऊ, कृपा करून एवढं मनावर घ्या... आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही!
धनंजय मुंडे, सामाजिक न्याय मंत्री
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 5:32 PM

बीड: राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या मतदारसंघात प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळेच त्यांना बीडमध्ये धनुभाऊ या नावाने हाक मारतात. धनुभाऊचा बीड दौरा हा इथल्या लोकांसाठी एक पर्वणीच असते. धनुभाऊ आले म्हणजे आपली रखडलेली कामं हमखास मार्गी लागणार, आपल्या समस्या सुटणार हे ठरलेलंच असतं. त्यामुळेच त्यांच्या जनता दरबारला मोठी गर्दी होते. आजही अनेक ग्रामस्थांनी मुंडे यांच्या जनता दरबारात हजेरी लावून त्यांच्याकडे समस्या मांडल्या. धनुभाऊ कृपा करून एवढं मनावर घ्या, आम्ही तुमचे उपकार विसणार नाही, अशी विनंतीही केली. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

50 वर्षांपासून रस्त्याची दुरुस्ती नाही

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे सध्या बीडच्या दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी जिल्ह्यात जनता दरबार आयोजित करून जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या. बीड जिल्ह्यात रस्त्यांची प्रचंड समस्या आहे. त्यावरच नागरिकांनी आजच्या जनता दरबारमध्ये भर दिला. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील कोरडेवाडी ते टोकेवाडी हा रस्ता तब्बल 50 वर्षांपासून दुरुस्त झालेला नाही. या रस्त्यामुळे शेतकरी अडचणीत आले असून अनेक जणांचे अपघात झाले आहेत. या रस्त्यावर वाहन चालविणे मुश्किल झाल्याने रुग्णाची व नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. मागील वर्षी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून या रस्त्याला मंजुरी मिळाली. मात्र रस्ता काम अद्याप सुरू नाही त्यामुळे या गावातील नागरिकांनी मुंडे यांना निवेदन दिले.

कोरडेवाडी ग्रामस्थांची विनवणी

काही ग्रामस्थांनी तर हा रस्ता व्हावा म्हणून मुंडे यांना विनवणी केली. धनुभाऊ कृपा करून एवढं मनावर घ्या… आम्ही तुमचे उपकार विसरणार नाही… अशी विनवणी कोरडेवाडी गावातील नागरिकांनी केली. त्यामुळे हा प्रश्न मुंडे सोडविणार की असाच तो वर्षनुवर्षं कायम राहणार याकडे लक्ष लागले आहे.

सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा

मुंडे यांच्या जनता दरबारात आज प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना उभं राहण्यासाठीही जागा नव्हती. त्यामुळे सोशल डिस्टन्सचे तीन तेरा वाजले होते. अनेकजण सकाळपासून समस्या मांडण्यासाठी आले होते. मात्र, आधीपासूनच जनता दरबारात गर्दी झाल्याने त्यांना या गर्दीत तिष्ठत राहावे लागले. या जनता दरबारात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यामुळे अनेक ग्रामस्थांना मुंडेंना भेटता आले नाही. लोकांनी दिलेले निवेदन मुंडे यांनी स्वीकारले. मात्र अनेक दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात परवड झाल्याचं पाहायला मिळाले. (Minister Dhananjay Munde attend janata Darbar in beed)

संबंधित बातम्या:

Dhananjay Munde Uncut : पंकजांसमोर धनंजय म्हणाले, बीडची जबाबदारी खांद्यावर घेतो!

धनंजयना पंकजा म्हणाल्या विकासासाठी शुभेच्छा, तर ते काय म्हणाले? वाचा सविस्तर

गहिनीनाथगडावर मुंडे भाऊ-बहीण एकाच मंचावर, ‘आपल्या कर्माची फळं आपल्याला मिळतात’, पंकजांचे वक्तव्य

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.