अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते…मंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंनी दिले उत्तर

दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केले. जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.

अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते...मंत्री गुलाबराव पाटील संतापले, एकनाथ खडसेंनी दिले उत्तर
gulabrao patil
Follow us
| Updated on: Sep 07, 2024 | 6:12 PM

राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आपल्या रोखठोक बोलण्यामुळे प्रसिद्ध आहेत. त्यांनी केलेल्या भाषणांनी अनेक सभा जिंकलेल्या असतात. विधिमंडळाच्या सभागृहात विरोधकांचा आघाडीवर येऊन सामना ते करत असतात. परंतु राज्य सरकारमधील सर्वात महत्वाचे खाते असलेल्या अर्थ खात्याविषयी त्यांनी आपला संताप व्यक्त केला. त्यांनी अर्थखात्याविषयी जाहीरपणे नाराजी व्यक्त केली. अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे. दहा वेळा मी पाठवलेली फाईल त्या खात्याकडून परत येत होती. मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी शनिवारी केले. जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त करत आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली.

जळगावात हातपंप दुरुस्ती, वीज पंप दुरुस्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने मंत्री गुलाबराव पाटील यांचा सत्कार सोहळा पार पडला. त्या वेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या पाणी पुरवठा खात्याच्या एका फाईलचा अनुभव सांगितला. ती फाईल मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे तब्बल दहा वेळा पाठवली. त्यानंतर ती परत आली. पण मी सुद्धा पाठपुरावा सोडला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

एकनाथ खडसे यांनी दिले उत्तरत

अर्थ खाते हे सर्वात नालायक खाते आहे, या गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, गुलाबराव पाटील यांना कदाचित अर्थ खात्याचा वाईट अनुभव आला असेल. परंतु मी ही अर्थमंत्री होतो. अर्थ खात्याविषयी अनेकांची अशीच धारणे असते. अर्थ खाते योजनांमध्ये अडथळे आणते, असा आरोप होत असतो. परंतु अर्थ खात्याने अडथळे आणले नसते तर राज्याची तिजोरी एक दिवसात खाली झाली असती.

हे सुद्धा वाचा

प्रत्येक ठिकाणी अर्थ खाते हे चाळणी करण्याचे काम करत असते. ते आवश्यकच आहे. अर्थखात्याकडून चाळणी झाल्यावर जिथे आवश्यकता असते तिथेच पैसे दिले जातात. त्यामुळे या खात्याला नालायक खाते म्हणता येणार नाही, असे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.