मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा बाइक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल
"कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का?" असा सवाल भैय्या पाटील यांनी विचारलाय.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलाचा बाइक स्टंट करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यांचा मुलगा आदित्यराज याचा सातारा कोल्हापूर रोडवर स्टंट करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे. भैय्या पाटील यांनी त्यांच्या X अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. “ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे. सदर बाईकला नंबर प्लेटसुद्धा नाही” असं भैय्या पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
“कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांच्या मुलासाठी महाराष्ट्रात राज्य सरकारने वेगळे नियम आणि कायदे बनवले आहेत का?” असा सवाल भैय्या पाटील यांनी विचारलाय. “सर्व सामान्य व्यक्तीने असे कृत्ये केले तर त्याची गाडी जप्त करून मोठा दंड ते 3 महिन्यापर्यंत तुरुंगवासाची शिक्षा केली जाते” असं भैय्या पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. टीका झाल्यानंतर आदित्यराजने बाइक स्टंटचे हे व्हिडिओ डिलीट केलेत.
विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप
राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे नेते जयकुमार गोरे यांच्यावर अधिवेशन काळात काही गंभीर आरोप करण्यात आले होते. एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याचा आरोप करुन विरोधकांनी अधिवेशन काळात त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता. 2016 मधलं ते काँग्रेसमध्ये असतानाच हे प्रकरण आहे. 2019 मध्ये या प्रकरणाचा निकाल लागला होता. त्या निकालाची प्रत माझ्याकडे आहे, असं ते म्हणाले.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा मुलगा आदित्यराज हा सातारा कोल्हापूर रोडवर जीवघेणे स्टंट करून स्वतः सोबत इतर लोकांच्या जिविताला धोका निर्माण करत आहे. या स्टंटचे रील्स लाईव्ह स्वतःच्या सोशल मीडियावर टाकून अशा बेकायदेशीर गोष्टीला प्रोत्साहित केले जात आहे.सदर बाईकला नंबर… pic.twitter.com/kAHXZH74y3
— Bhaiya Patil (@BhaiyaPatil) March 31, 2025
महिलेला खंडणी प्रकरणात अटक
मला या प्रकरणात न्यायालयाने निर्दोष मुक्त केल्याचा दावा जयकुमार गोरे यांनी केला होता. मात्र, तरीही विरोधकांकडून सातत्याने त्यांच्यावर या प्रकरणी आरोप सुरु आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटींची खंडणीची रक्कम स्वीकारताना अटक केली.