शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; ही अवस्था ठाकरे पिता-पुत्रांमुळे; नारायण राणेंनी शिवसेनेच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले

नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, त्यांना संजय राऊत यांच्या अटक वॉरंटबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी काही तरी गुन्हा केला असणार म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तसेच संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असा जहरी टीकाही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली. 

शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही; ही अवस्था ठाकरे पिता-पुत्रांमुळे; नारायण राणेंनी शिवसेनेच्या जखमेवर पुन्हा मीठ चोळले
केंद्रीय मंत्री नारायण राणेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 09, 2022 | 12:00 AM

सावंतवाडीः शिवसेनेचे (Shivsena) अस्तित्व संपले असून आता शिवसेना उठणार नाही असा घणाघात केंद्रीयमंत्री नारायण राणे (Minister Narayan Rane) यांनी लगावला आहे. गोव्यावरून सिंधुदुर्ग येते असताना त्यांनी काही वेळ थांबून सावंतवाडीतील (Sawantvadi) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे. नारायण राणे यांनी ज्याप्रकारे शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे,त्याप्रमाणेच त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केली. संजय राऊत यांना आज अटक वॉरंट निघाल्यावर त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांनी सांगतितले  की, संजय राऊत यांनी काही तरी काही तरी गुन्हा केला असेल म्हणूनच त्यांच्यावर केस दाखल झाली असेल. नारायण राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, मी ज्योतिषी असून हे सरकार पडणार असल्याचे भाकीत केले होते असंही त्यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेवर राणे पिता पुत्रांकडून जोरदार टीका करण्यात आली होती.

राणेंचा जोरदार हल्लाबोल

बंडखोरी नाट्य, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची घेतलेली शपथ, त्यानंतर बहुमत चाचणीवेळीही शिवसेनेला आपले वर्चस्व सिद्ध करता आले नव्हते. त्यामुळे राणे पिता पुत्रांकडून शिवसेनेवर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतरही त्यांनी शिवसेनेवर व उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.

राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत

नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करताना, त्यांना संजय राऊत यांच्या अटक वॉरंटबद्दल विचारले असता त्यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी काही तरी गुन्हा केला असणार म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तसेच संजय राऊत हे काही धुतल्या तांदळासारखे नाहीत असा जहरी टीकाही त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

 गप्प बसून आराम करावे

शिवसेनेचे सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी गप्प बसून आराम करावे असा सल्लाही त्यांनी या ठाकरे आणि राऊत यांना दिला आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, शिवसेनेवर उद्भवलेल्या परिस्थितीला उद्धव ठाकरे आणि त्यांचे चिरंजीव जबाबदार आहेत. आज शिवसेनेचे अस्तित्व संपले असून उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना पुन्हा उभी राहणार नाही. अशी जोरदार टीका नारायण राणे यांनी केली आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.