वीजनिर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई, तातडीने उपाययोजना करा, उर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश

पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिले.

वीजनिर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई, तातडीने उपाययोजना करा, उर्जामंत्री नितीन राऊत यांचे निर्देश
नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत
Follow us
| Updated on: Sep 21, 2021 | 11:24 PM

मुंबई : पावसाळ्यामुळे ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये महाजेनकोच्या वीज निर्मिती केंद्रामध्ये कोळशाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे त्वरीत योग्य प्रमाणात कोळसा उपलब्ध होण्यासाठी तातडीने उपाययोजना करा असे निर्देश राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज महाजेनकोला दिले. केंद्र सरकारच्या वेस्टर्न कोलफिल्डस लिमिटेडसह अन्य कोळसा कंपन्यांकडून ठरल्याप्रमाणे कोळसा मिळत नसल्याने निर्माण झालेल्या टंचाईवर मात करण्यासाठी वेकोलीकडे नियमित कोळसा पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा, असे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले. (Minister Nitin Raut instructs to take immediate action to avoid coal short for electricity generation)

केंद्रीय कोळसा मंत्र्यांना बैठकीतून थेट फोन 

वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने थेट बैठकीतूनच डॉ. राऊत यांनी केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांना दूरध्वनी केला. तसेच नियमित व योग्य प्रमाणात कोळसा पुरविण्याची विनंती केली. वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या राज्यातील खाणीतला कोळसा इतर राज्याच्या तुलनेने महागड्या दराने महाजनकोला विकत असल्याने ते माफक दराने देण्याची विनंतीही त्यांनी यावेळी जोशी यांना केली.

कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करा  

भविष्यात कोळसा टंचाई होऊ नये यासाठी कोळसा मंत्रालययासोबत सतत पाठपुरावा करून अधिकचा कोळसा साठविण्यासाठी योग्य तरतूद करण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीज टंचाईच्या काळात महावितरणला महागड्या दराने वीज खरेदी करावी लागत असल्याने कोळसा खरेदीसाठी महावितरणने अधिकची तरतूद करून ती रक्कम महाजनकोला दिल्याने महाजनकोला कोळसा खरेदी करणे सोपे जाईल, असे या बैठकीत रऊत म्हणाले. यासाठी वेकोलि, केंद्रीय ऊर्जा मंत्रालय, केंद्रीय कोळसा मंत्रालय यांच्याकडे प्रत्यक्ष जाऊन पाठपुरावा करण्याचे निर्देश डॉ. राऊत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

कोळसा उपलब्धता

20  सप्टेंबरच्या आकडेवारीनुसार सध्या महानिर्मितीकडे 1 लाख 63 हजार 550 मेट्रिक टन कोळसा सध्या उपलब्ध आहे. वीज निर्मितीसाठी रोज किमान 1 लाख 46 हजार 550 मेट्रिक टन कोळसा लागतो. केंद्र सरकारच्या वेकोलीसह अन्य कंपन्याकडून ठरल्याप्रमाणे कोळसा पुरवठा होत नसल्याने ही गंभीर स्थिती ओढवल्याचे यावेळी सांगण्यात आले. ऑगस्ट महिन्याच्या 1 तारखेला महाजनकोकडे 14 लाख मेट्रिक टन एवढा साठा उपलब्ध होता. परंतु कोळसा कंपन्यांकडून मागील दीड महिन्यात कमी पुरवठा झाल्याने जेमतेम एक दिवस पुरेल एवढा म्हणजे 1 लाख 63 हजार 895 मेट्रिक टन एवढाच साठा 20 सप्टेंबरला उपलब्ध आहे.

2216 मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित मिळाला फक्त 873 मेट्रिक टन

केंद्र सरकारच्या या कंपन्यांकडून जुलै महिन्यात अपेक्षित कोळसा पुरवठ्याच्या केवळ 47.95टक्केच कोळसा प्राप्त झाला. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ 52.64 टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात 19 तारखेपर्यंत अपेक्षित पुरवठ्याच्या केवळ 45.16 टक्केच कोळसा पुरवठा करण्यात आला. सप्टेंबर महिन्यात वेकोलीकडून 2216 मेट्रिक टन कोळसा मिळणे अपेक्षित असताना केवळ 873 मेट्रिक टन कोळसा म्हणजे केवळ 45.16 टक्के कोळसा प्राप्त झाला.

कोळसा पुरवठा केला जात नसल्याबद्दल वेळोवेळी तक्रार

वीज निर्मिती कंपन्यांना नियमित कोळसा मिळावा म्हणून केंद्र सरकारने स्थापन केलेल्या आंतर-मंत्रालयीन गटाच्या बैठकीत ऑगस्ट महिन्यापासून महानिर्मितीकडून ऑर्डर बुकिंग प्रोग्रामनुसार कोळसा पुरवठा केला जात नसल्याबद्दल वेळोवेळी तक्रार करण्यात आली. मात्र या गटाच्या बैठकीत कोळसा पुरवठ्याचे आश्वासन देऊनही अपेक्षित कोळसा पुरवला जात नसल्याकडे यावेळेस सादरीकरणाद्वारे लक्ष वेधण्यात आले.

इतर बातम्या :

महाराष्ट्र विरुद्ध मुंबई, चंदू बोर्डे कप्तान, साताऱ्यात झालेल्या सामन्याची रंजक गोष्ट जी पवारांनी सांगितली

मोठी बातमी! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, अमित शाहांसोबतही बैठक, नेमकं कारण काय?

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांमध्ये लेटर वॉर, पवारांचा पत्रकारांच्या प्रश्नावर षटकार !

(Minister Nitin Raut instructs to take immediate action to avoid coal short for electricity generation)

आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात
आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून शाहांची कोंडी, अडकले वादाच्या भोवऱ्यात.
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत
'फडणवीस तुम्हाला सरपंचाच्या...',देशमुखांच्या हत्येचे पडसाद विधानसभेत.
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.