दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास करण्याचा निर्णय जवळपास निश्चित !

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत (Minister Vijay Wadettiwar big statement on ssc and HSC exam).

दहावीचे विद्यार्थी बिनापरीक्षा पास करण्याचा निर्णय जवळपास निश्चित !
Student
Follow us
| Updated on: Feb 26, 2021 | 4:56 PM

मुंबई : राज्यातील दहावी आणि बारावीच्या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत, असे संकेत आता दिसत आहेत. यामागे कोरोनाचा संसर्ग हेच कारण आहे. राज्यातील विविध भागांमध्ये शाळा सुरु केल्यानंतर शेकडो विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्य सरकार आता खबरदारी म्हणून दहावी-बारावीची लेखी परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे तामिळनाडू राज्यात दहावीच्या परीक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अगदी त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि मदत व पूनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी याबाबत सूचक वक्तव्य केलं आहे.

शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड काय म्हणाल्या?

“आम्ही दोन दिवसांपासून राज्यातील प्रत्येक भागाचा आढावा घेतला. प्रत्येक जिल्हाधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. पण सोलापूर, वाशिम किंवा इतर ठिकाणी असेल, आम्ही शिक्षक, विद्यार्थ्यांची सुरक्षितता ठेवणं याला प्राधान्य दिलेलं आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने शाळा सुरु करण्याबाबत निर्णय घ्यावे, असं आम्ही सांगितलं आहे”, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

“गेल्यावर्षी कोरोनामुळे आठवीपर्यंत तसेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपल्याला घेता आली नव्हती. त्यांचं वर्षभरातील जो परफॉर्मन्स होता तो काऊंट करुन त्यांना पुढच्या इयत्तेसाठी उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला होता. तसंच भविष्यातही आपण करु शकतो”, असं त्यांनी सांगितलं.

“दहावी आणि बरावी बोर्डाच्या परीक्षा महत्त्वाच्या आहेत. कारण ते महत्त्वाचं वर्ष आहे. पुढच्यावर्षी विद्यार्थ्यांना अॅडमिशन वगैरे घ्यावे लागतील. त्यामुळे येणाऱ्या काळात याबाबत विचार करु आणि तुम्हाला त्याबाबतच लवकरच निर्णय सांगू”, अशीदेखील माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली.

विजय वडेट्टीवार यांचं सूचक विधान

राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन सरकार काही महत्त्वाचे पाऊलं उचणार असल्याचे संकेत राज्याचे मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणं हे आर्थिक दृष्टीकोनाने राज्याला परवडणारं नाही. त्यामुळे सरकार पर्यायी मार्ग काढण्यावर भर देत असल्यांचं वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. राज्यात पुढच्या दोन महिन्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षा येऊ घातल्या आहेत. या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट आहे. मात्र, सध्या या परीक्षांवर कोरोनाचं सावट आहे. या परीक्षांवर योग्य पर्यायी मार्ग काढणार असल्याचं वडेट्टीवार यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना सांगितलं (Minister Vijay Wadettiwar big statement on ssc and HSC exam).

वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं?

“महाराष्ट्र सरकार वाढती आकडेवारीची स्थिती गांभीर्यानं घेतली आहे. राज्याला आणि एकूण अर्थकारणाला लॉकडाऊन परवडणारे नाही. मात्र लॉकडाऊन टाळण्यासाठी लोकलच्या फेऱ्या कमी करणे, एसटी बसेसमधील गर्दी कमी करणे आदी शक्यतांची पडताळणी केली जात आहे. सिनेमागृहे- मंगल कार्यालयात होणाऱ्या गर्दीवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. मत्हत्वाच्या दहावी-बारावीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना सरसकट पास करणे आणि ऑनलाईन परीक्षा घेणे याबाबतही चाचपणी सुरू आहे”, असं वडेट्टीवार यांनी सांगितलं. त्याचबरोबर येत्या काळात हे निर्णय अपेक्षित असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले (Minister Vijay Wadettiwar big statement on ssc and HSC exam).

तामिळनाडूत 9 वी ते 11 वी इयत्तेच्या विद्यार्थी परीक्षेविनाच पास होणार

तामिळनाडूचे मुख्यमंत्री के. पलनीस्वामी यांनी काल (25 फेब्रुवारी) 9 वी ते 11 वी इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी घोषणा केली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या लेखी परीक्षा घेणं शक्य नाही. त्यामुळे 2020-21 या वार्षिक वर्षातील विद्यार्थ्यांची कोणतीही लेखी परीक्षा न घेता त्यांना पास घोषित करण्यात येईल, अशी घोषणा तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्रातीही तसे पावलं उचलली जाण्याची शक्यात असू शकते. कारण विजय वडेट्टीवार यांनी त्याचप्रकारचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्रातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना कोरोना

राज्यात गेल्या दोन महिन्यांमध्ये मिशिन बिगीन अंतर्गत विविध भागात शाळा उघडण्यात आल्या. मात्रा, शाळा उघडल्यानंतर काही दिवसांमध्येच अनेक शाळांमधील शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित झाल्याची माहिती समोर आली आहे. काही शाळांमध्ये तर कोरोनाचा स्फोट झाल्याचं बघायला मिळालं आहे.

वाशिममध्ये चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वाशिम जिल्ह्याच्या रिसोड तालुक्यातील देगावमधील निवासी शाळेतील चार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि वसतिगृहात राहणारे 229 विद्यार्थी दोन दिवसात कोरोनाबाधित (Washim School Students Corona Positive) आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी तातडीने निवासी शाळेला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबाधित विद्यार्थ्यांना योग्य उपचार आणि इतर आवश्यक सुविधा पुरवण्याबाबत सूचना केल्या.

लातूरमध्ये 40 विद्यार्थी बाधित

लातूर शहरातल्या एकाच शाळेत तब्बल 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 40 विद्यार्थ्यांना कोरोना झाल्याचं समोर आल्याने 320 विद्यार्थी, 10 शिक्षक, 20 कर्मचारी क्वारंटाईन झाले आहेत. एमआयडीसी भागात असलेल्या पब्लिक शाळेच्या वसतिगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे विद्यार्थी शिक्षणासाठी लातूरच्या या शाळेच्या वसतिगृहात रहायला आहेत. या विद्यार्थ्यांवर लातूरच्या शासकीय वसतिगृहात असलेल्या क्वारंटाईन सेंटरमध्ये उपचार सुरु आहे.

वर्ध्यात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील निवासी वसतिगृहात 75 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्यामुळे येथे खळबळ उडाली आहे. सातेफळ मार्गावर असलेल्या एका खासगी संस्थेच्या निवासी वसतिगृहातील एका विद्यार्थ्याला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांनतर येथे तब्बल 75 विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. या सर्व विद्यार्थ्यांना वसतीगृहातच विलगिकरणात ठेवतण्यात आले असून त्यांच्यावर आरोग्य विभागाकडून उपचार केले जात आहेत. या प्रकारामुळे शासकीय तसेच खासगी वसतीगृह सुरु करणे योग्य आहे का?, असा प्रश्न विचारला जात आहे

हेही वाचा : मराठी राजभाषा दिनाला राज ठाकरेंचं महाराष्ट्राला विनम्र आवाहन, वाचा त्यांचं पत्र जसंच्या तसं !

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.