Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोहमयी सोनं होतंय स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!

तुम्हाला माहितंय का, मोहमयी सोनं स्वस्त होतंय. नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले.

मोहमयी सोनं होतंय स्वस्त, जाणून घ्या नाशिक सराफातील भाव!
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Oct 30, 2021 | 3:32 PM

नाशिकः तुम्हाला माहितंय का, मोहमयी सोनं स्वस्त होतंय. नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले.

नाशिकच्या सराफा बाजारात 1 सप्टेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर 48,810, तर बावीस कॅरेट सोन्याचे दर हे 45,590 होते. त्या नंतर या दरात घसरणच पाहायला मिळाली. मात्र, आता या दरात किरकोळ चढ-उतार होताना दिसत आहे. सराफा बाजारात मंगळवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 49850 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 68000 रुपये नोंदवले गेले. बुधवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47800 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46300 रुपये नोंदवले गेले. चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 48400 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46500 रुपये, तर चांदी किलोमागे 67500 रुपये नोंदवली गेली. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 65000 रुपये नोंदवले गेले, अशी माहिती दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली.

किमती वाढणार

पुढच्या काही वर्षांत सोन्याच्या किमती आभाळाला टेकणार असल्याचा असा अंदाज बहुतांश जाणकारांनी वर्तविला आहे. एचडीएफसी सिक्योरिटीजच्या तज्ज्ञांच्या मते, पुढच्या 3 ते 5 वर्षांत सोन्याचा दर आताच्या तुलनेत दुप्पट होऊ शकतो. तर पुढच्या 5 वर्षांत 10 ग्रॅम सोन्याचा दर 90 हजारांवर जाऊन पोहोचेल, असे संकेत क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून देण्यात आले आहेत. याच काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्याचा दर प्रतिऔंस 3000 ते 5000 डॉलर्स इतका असू शकतो. कोरोनाच्या पार्श्वभूमवीर अनेक देशांमध्ये आर्थिक पॅकेजेस दिली जात आहेत. मात्र, त्यामुळे मध्यवर्ती बँकांची अवस्था बिकट होऊ शकते. परिणामी आगामी काळात सोन्याचे दर अक्षरश: गगनाला भिडू शकतात, असे क्‍वाड्रिगा इग्नियो फंडकडून सांगण्यात आले आहे.

आता दिवाळीचे वेध

नाशिकच्या सराफा बाजारात गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवात मोठी उलाढाल झाली. अनेकांनी गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून सोने गुंतवणुकीस प्राधान्य दिले. दसऱ्याचा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक समजला जातो. या दिवशी कोट्यवधी रुपयांची उलाढाल नाशिकमध्ये झाली. आता काही दिवसांवर दिवाळीचा सण आला आहे. दिवाळीच्या पाडव्यादिवशी अनेकजण सोने खरेदी करायला प्राधान्य देतात. दिवाळीच्या चारी दिवसांतही सराफा बाजारात मोठी गर्दी असते. ते पाहता आता व्यापाऱ्यांचे डोळे येणाऱ्या दिवाळी सणाकडे लागले आहेत. सोबतच येत्या काळात सोन्याचे भाव वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

‘गुगल पे’वर खरेदी करा

सोने खरेदी करण्यासाठी आता तुम्हाला दुकानात जाण्याची गरज नाही. कारण आपण दररोज पैसे ट्रान्सफर करण्यासाठी वापरत असलेल्या ‘गुगल पे’ वरुनही आता सोनं खरेदी करता येईल. एवढेच नव्हे तर ‘गुगल पे’वर सोने साठवून ठेवण्याचीही सुविधा असेल. त्यामुळे तुम्हाला घरात सोनं ठेवण्याची जोखीमही पत्करावी लागणार नाही.

नाशिकच्या सराफा बाजारात शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 47900 रुपये नोंदवले गेले, तर 22 कॅरेट सोन्याचे दर 10 ग्रॅमच्या मागे 46400 रुपये नोंदवले गेले. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन

इतर बातम्याः

नॅशनल चॅम्पियन स्पर्धेतील विजयी खेळाडूंच्या पाठीवर पालकमंत्र्यांकडून कौतुकाची थाप

नाशिककरांनो मतदार नाव नोंदणी, दुरुस्ती करायची असल्यास ही कागपत्रे करा सादर!

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.