Nashik Gold: सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार; आगामी आठवड्यातही भाव स्थिर राहण्याची शक्यता
नाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले.
नाशिकः नाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या दरात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. आगामी आठवड्यातही मोठी भाववाढ अपेक्षित नाही.
दी नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे म्हणाले की, गेल्या सोमवारपासून आज शनिवारपर्यंत सोन्याच्या भावात किरकोळ चढ आणि उतार सुरू आहे. त्यात आज 24 कॅरेट सोन्याचे भाव 48300 रुपये नोंदवले गेले. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 62000 नोंदवले गेले. (सोन्या-चांदीच्या या भावावर 3 टक्के जीएसटी अतिरिक्त असेल.) सोमवारी 5 डिसेंबर रोजी 24 कॅरेट सोन्याचे दर हे 48800 रुपये होते. त्यानंतर मंगळवारी सोने पुन्हा तीनशे रुपयांनी स्वस्त झाले. बुधवारी आणि गुरुवारीही सोन्याच्या दरात दोनशे ते तीनशे रुपयांची चढ-उतार पाहायला मिळाली. येणाऱ्या आठवड्यातही सोन्याचे भाव खूप वाढणार नाहीत, अशी शक्यता नवसे यांनी वर्तवली. चांदीच्या दरात आठवड्यात साधरणातः किलोमागे दोन हजार रुपयापर्यंतची चढ-उतार आहे. 5 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान चांदीचे भाव किलोमागे 61200 रुपये नोंदवले गेले. मात्र, आज शनिवारी 11 डिसेंबर रोजी या दरात जवळपास बाराशे रुपयांची भाववाढ पाहायला मिळाली. दरम्यान, आता ग्राहकांनी चक्क घरात बसूनही सोन्याचे भाव कळणार आहेत. त्यासाठी फक्त आपल्याला 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल. त्यानंतर आपल्या फोनवर मेसेज येईल, ज्यात ताजे भाव तपासता येतील.
शुद्धता तपासणारे अॅप
आपल्याला सोन्याची शुद्धता तपासायची असल्यास सरकारनं एक अॅप बनवले आहे. ‘BIS Care App’ हे ग्राहकांना सोन्याच्या शुद्धतेची खात्री पटवून देते. या अॅपच्या माध्यमातून फक्त सोन्याची शुद्धताच नव्हे, तर तुम्हाला तक्रारही करता येणार आहे. या अॅपमध्ये जर लायसन्स, रजिस्ट्रेशन आणि हॉलमार्क नंबर चुकीचा आढळल्यास ग्राहक त्याची तक्रार करू शकतात. या अॅपद्वारे ग्राहकांना तात्काळ तक्रार करण्याची सुविधा आणि माहिती मिळते.
नाशिकच्या सराफा बाजारपेठेत सोन्याच्या भावात किरकोळ चढ-उतार पाहायला मिळत आहे. शनिवारी 24 कॅरेट सोन्याचे भाव 48,300 रुपये नोंदवले गेले, तर तर 22 कॅरेट सोन्याचे दर 46500 नोंदवले गेले. चांदीचे दर किलोमागे 62000 नोंदवले गेले. यावर तीन टक्के जीएसटी अतिरिक्त असेल. आगामी आठवड्यातही मोठी भाववाढ अपेक्षित नाही. आता लगीनसराई सुरू झाली आहे. मात्र, तूर्तास तरी ग्राहकांना दिलासा आहे. – गिरीश नवसे, अध्यक्ष, दी नाशिक सराफा असोसिएशन
इतर बातम्याः