AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय ? आदित्य ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत सांगूनच टाकलं, आणि…

मी आधीच सांगितले आहे, प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. की त्यांचा पुढचा प्रयत्न हा जातीजातीत आणि धर्माधर्मात वाद निर्माण करायचा. याकडे कुणीही लक्ष देऊ नका असं आदित्य ठाकरे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांचा पुढचा प्लॅन काय ? आदित्य ठाकरे यांनी भर पत्रकार परिषदेत सांगूनच टाकलं, आणि...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 3:24 PM

मुंबई : राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील ( Gulabrao Patil ) यांनी मराठा मुख्यमंत्री करण्यासाठी मी गद्दारी केली असल्याचा दावा केला आहे. त्यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांच्याकडे आता आरोप करायला काहीही राहिले नाही म्हणून धर्माधर्मात आणि जातीजातीत वाद निर्माण करण्याचे काम ते करत राहतील. निवडणूक आल्यावर त्यांच्याकडे बोलायला काहीही शिल्लक राहिले नाही म्हणून जोरदार हल्लाबोल केला आहे. याशियाय मध्यावधी निवडणुका लागण्याची कारणं काय आहे ? आणि पुढील काळात महाविकास आघाडीचा प्लॅन काय यावरही मोठं भाष्यं आदित्य ठाकरे यांनी केले आहे.

गुलाबराव पाटील यांच्या विधानावर आदित्य ठाकरे म्हणाले, मी आधीच सांगितले आहे, प्रत्येक सभेत सांगत आलो आहे. की त्यांचा पुढचा प्रयत्न हा जातीजातीत आणि धर्माधर्मात वाद निर्माण करायचा. याकडे कुणीही लक्ष देऊ नका.

महाराष्ट्र म्हणून आपण अंधारात चाललो आहोत, महाराष्ट्रात कृषी केंद्र आणि उद्योग क्षेत्र कोलमडत चालले आहे. गुलाबराव पाटील यांचे पाईपलाइनचे विषय आमच्याकडे आले आहेत. ते मी अधिवेशनात बोलणार आहे.

हे सुद्धा वाचा

गुलाबराव पाटील यांच्या विधानाकडे लक्ष देऊ नका असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी जोरदार टीका केली. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी मध्यावधी निवडणुका लागतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले, 40 आमदार अपात्र होतील. पोटनिवडणूक लागेल किंवा मध्यवती निवडणुका लागतील. मग महाविकास आघाडी सत्तेत येऊ शकते असं भाकीतही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

आदित्य ठाकरे यांनी महाविकास पुढील काळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकार पुन्हा येईल असा विश्वासही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर आदित्य ठाकरे महाराष्ट्रात भविष्यातील काय करणार आहे. याबाबत अंदाज व्यक्त करत पुढील काळात महाविकास आघाडी सरकार नक्की सत्तेत येईल असाही  विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह चाळीस आमदारांना गद्दार म्हणत आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला आहे. गुलाबराव पाटील यांच्या मराठा मुख्यमंत्री विधानावर आदित्य ठाकरे यांनी प्रश्नाला बगल देत टीका केली आहे. त्यामुळे आदित्य यांच्या टीकेला भविष्यात गुलाबराव पाटील काय उत्तर देतात हे पाहणं देखील महत्वाचे ठरणार आहे.

अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला....
पाकड्यांची तंतरली, पाकच्या नौदल प्रमुखांचं मोठं वक्तव्य, आपल्याला.....
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला...
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी; आता अमेरिका भारताला....
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी...
पाकड्यांच्या LOC वर कुरापती काही थांबेना, सलग सातव्या दिवशी....
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली
पाकचे धाबे दणाणले; पाकिस्तानने हाफिज सैदच्या सुरक्षेत वाढ केली.