” देशातील 2 हजारच्या नोटा गायब नाहीत, गहाण ठेवल्या”; राष्ट्रवादीच्या आमदाराकडून भाजपवर गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सांगितले की, 2 हजारच्या नोटा गायब झाल्या नसून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने राखून ठेवल्या असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
अकोला : देशातील राजकारण वेगवेगळ्या मुद्यांनी गाजत आहे. देशात कधी बेरोजगारीचा प्रश्न, महागाईचा प्रश्न समोर येतो आहे. त्यामुळे आता विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. राज्यात आणि केंद्रात भाजपचेच सरकार आहे. बेरोजगारीचाही प्रश्न गंभीर झाला असून अनेक नागरिक आता आर्थिक संकटात सापडले असल्याची टीका आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील 2 हजारांच्या नोटा कुठं गायब झाल्या असतील असा सवाल सर्वसामान्य वर्गातून येत आहे तर दुसरीकडे समाजातील अनेक लोकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. त्यामुळे आता लोकांनी अर्थमंत्र्यांना जाब विचारण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील विरोधकांनी आता 2 हजारच्या नोटांवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळेच विरोधकांकडून आता 2 हजारच्या नोटा नेमक्या कुठे आहेत असा सवाल त्यांनी सरकारला केला आहे. 2 हजारच्या नोटा कुठे गायब झाल्या असा सवाल करतानाच विरोधकांनी तो सारा पैसा सरकारच्या निकटवर्तीय उद्योजकांकडे गेल्याचा आरोप केला आहे.
तर यावरुन काल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं की 2 हजारांच्या नोटा एटीएममध्ये न देण्याचे आदेश केंद्रानं दिलेले नाहीत तर हा पूर्णपणे बँकांचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले होते.
त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी सांगितले की, 2 हजारच्या नोटा गायब झाल्या नसून येणाऱ्या 2024 च्या निवडणुकीसाठी भाजपने राखून ठेवल्या आहेत.
कदाचित 2 हजारांच्या नोटांची जबाबदारी किरीट सोमय्या यांच्याकडे असू शकते.नाही तर नेमक्या या नोटा गेल्या कुठे की भाजप ने आपल्या सहकाऱ्यांकडे दिल्या आहेत असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
2 हजारच्या नोटा मोहित कंबोजच्या घरी ठेवल्या आहेत. की किरिट सोमय्यांच्या घरी आहेत, की टिल्लूच्या घरी आहेत…याचा एकदार तपास शासकीय यंत्रनेने करावा अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे.
अमोल मिटकरी यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यावरही टीका केली आहे. त्यांच्याविषयी त्यांनी म्हटले आहे की, केंद्रीय मंत्र्यांनी दिलेलं स्पष्ठीकरण हे हास्यासपद असून. 2 हजाराच्या नोटा कुठेही गायब झाल्या नसून त्या भारतीय जनता पार्टीच्या सघ्या सोयऱ्यांकडे गहाण ठेवल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे.