AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे

मुंबई : पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचं भाजप आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केलं. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं होतं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुमारे सव्वा तीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे […]

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 5:00 PM

मुंबई : पक्षामध्ये गुन्हेगारांना प्रवेश द्यायचा नाही आणि धुळे महापालिका निवडणूक आपल्या नेतृत्वाखाली लढल्या जाव्यात या दोन अटींवर आपण राजीनामा मागे घेतल्याचं भाजप आमदार अनिल गोटे यांनी जाहीर केलं. धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सुमारे सव्वा तीन तास झालेल्या चर्चेत आपल्या दोन अटी मान्य केल्यामुळे राजीनामा मागे घेतल्याचं अनिल गोटे यांनी सांगितलं. संरक्षणमंत्री सुभाष भामरे, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यावर गंभीर आरोप करत गोटे यांनी राजीनामा दिला होता. पक्षाने दगाफटका केला तर त्याचे गंभीर परिणाम त्यांना भोगावे लागतील, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये अंतर्गत बंडाळीने टोक गाठलं आहे. धुळे शहराचे भाजप आमदार अनिल गोटे यांनी संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची सभा उधळल्यानंतर, स्वत:च महापौरपदाचे उमेदवार असल्याचं घोषित केलं. त्यानंतर त्यांनी भाजपलाही रामराम करणार असल्याचं जाहीर केलं. शिवाय अनिल गोटे यांनी पत्रक काढून पक्षाबद्दल नाराजी व्यक्त केली. गोटे यांनी भाजपच्या आमदारांना उद्देशून हे पत्र लिहिलं होतं.

सध्या पालिका निवडणुकीसंदर्भात डॉ सुभाष भामरे गटाकडून पक्षात गुंडांना खुलेआम प्रवेश दिला जात असल्याचा आरोप अनिल गोटे यांनी केला.

मी भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता असूनही मला दानवेंच्या सभेत डावललं, मला अपमानास्पद वागणूक दिली. विधानपरिषद निवडणुकीत मी मतदान केलं. त्यावेळी विनोद तावडे यांनी मला पैशांची ऑफर केली होती.  नाथाभाऊंच्या बंगल्यावरुन फोन आला. तावडे बोलत होते, तुमचे पैसे कुठे पाठवू. त्यांना मी खाडकन उत्तर दिलं, आपण भाजपच्या आमदारांना पैसे दिले का? मला असा प्रश्न विचारण्याचं धाडस तुम्ही कसे करता? माझ्या मतदारांनी एकही पैसा न घेता 3 वेळा मला निवडून दिलं आहे, माझ्या मतदारांशी मी गद्दारी करणार नाही. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे, असं अनिल गोटे यांनी पत्रात म्हटलं होतं.

इतकंच नाही तर आपण 19 नोव्हेंबरला विधीमंडळाच्या पहिल्या दिवशी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचं गोटे यांनी पत्रात नमूद केलं होतं. पण अनिल गोटे यांची नाराजी दूर करण्यात भाजपला काही प्रमाणात यश आलं आहे. त्यामुळे धुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

संबंधित बातम्या :

अनिल गोटे भाजपची वाट लावणार, 7 पानी पत्र लिहून पैशाचा व्यवहार जाहीर

भाजप दुटप्पी, राजीनामा देतोय : आमदार अनिल गोटे

महापौरपदाचा उमेदवार मीच: आमदार अनिल गोटे

भाजपच्या अनिल गोटेंनी दानवे, महाजनांची सभा उधळली

भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले
भारत - पाकिस्तान अटारी सीमेवरील दरवाजे पुन्हा उघडले.
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त
LPG Gas : मे महिन्याच्या सुरुवातीलाच Good News... गॅस सिलिंडर स्वस्त.
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना
रायगडचं पालकमंत्रिपद गावगुंडाकडे नको, राऊतांचा नाव न घेता गोगावलेंना.
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले
चुन चुन के नंतर मारा,आधी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्या; संजय राऊत बरसले.
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार
अखेर सत्य उघड! पहलगाम हल्ल्याचा कट पाकिस्तानचाच? एनआयएचा अहवाल तयार.
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई
हंडाभर पाण्यासाठी वणवण पायपीट; इगटपुरीत भीषण पाणी टंचाई.
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी
एजाज खानच्या 'हाऊस अरेस्ट' शो वर बंदी घालण्याची चित्रा वाघ यांची मागणी.
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा
भारताचा श्वास बंद करणार, म्हणणाराच घाबरला...हाफीज सईदला पुरवली सुरक्षा.
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी
'पुष्पा'मुळे ओळख...अल्लू अर्जुनच्या आयुष्याला ‘पुष्पा 2’ नंतर कलाटणी.
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले
मिस्टर इंडिया 2 बद्दल शेखर कपूरांचा दावा, ChatGPTचा उल्लेख करत म्हणाले.